Agriculture news in marathi In Solapur, due to Pitripandharvadya, Guar and Okra are raised | Agrowon

सोलापुरात पितृपंधरवड्यामुळे गवार, भेंडीला उठाव

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 22 सप्टेंबर 2020

सोलापूर ः पितृपंधरवड्यामुळे सोलापूर कृषि उत्पन्न बाजार समितीच्या आवारात गतसप्ताहात गवार, भेंडीला चांगला उठाव मिळाला. 

सोलापूर ः पितृपंधरवड्यामुळे सोलापूर कृषि उत्पन्न बाजार समितीच्या आवारात गतसप्ताहात गवार, भेंडीला चांगला उठाव मिळाला. त्यांचे दरातही त्यामुळे सुधारणा राहिली, असे बाजार समितीच्या सूत्रांकडून सांगण्यात आले.

बाजार समितीच्या आवारात गतसप्ताहात गवार, भेंडीची आवक अत्यंत कमी राहिली. गवारची रोज २ ते ४ क्विंटल आणि भेंडीची १० ते २५ क्विंटल आवक झाली. गवार आणि भेंडीची सर्व आवक स्थानिक भागातूनच झाली.

पितृपंधरवड्यामध्ये पूर्वजांना दिल्या जाणाऱ्या नैवेद्यामध्ये गवार आणि भेंडीचा समावेश प्राधान्याने केला जातो. तशी परंपरा आहे. साहजिकच, गवार आणि भेंडीला मागणी वाढते. या आठवड्यात आणि या आधीच्या आठवड्यात असा पितृपंधरवडा साजरा झाला. त्यात गवारीला प्रतिक्विंटलला किमान २००० रुपये,  सरासरी ३००० रुपये आणि सर्वाधिक ५००० रुपये, तर भेंडीला किमान ३०० रुपये, सरासरी २००० रुपये आणि सर्वाधिक ३००० रुपये असा दर मिळाला.  

किरकोळ चढ-उतार वगळता दर टिकून राहिले. त्यातही देशी गवारला सर्वाधिक उठाव राहिला. त्याला प्रतिक्विंटलमागे २०० रुपयांनी जादा दर होते. त्याशिवाय हिरवी मिरची, लिंबू आणि काकडीलाही बऱ्यापैकी मागणी राहिली. त्यांची आवकही तशी जेमतेम राहिली. हिरव्या मिरचीची रोज ५० क्विंटल, काकडीची ५ ते १० क्विंटल आणि लिंबांची १० ते १५ क्विंटल अशी आवक राहिली.

हिरव्या मिरचीला प्रतिक्विंटलला किमान १००० रुपये, सरासरी १५०० रुपये आणि सर्वाधिक २५०० रुपये, काकडीला किमान २००० रुपये, सरासरी ३००० रुपये आणि सर्वाधिक ४००० रुपये, तर लिंबांना किमान १०० रुपये, सरासरी १५०० रुपये आणि सर्वाधिक २५०० रुपये असा दर मिळाला. 

टोमॅटो, वांग्यांच्या दरातील तेजीही पुन्हा टिकूनच राहिली. टोमॅटोला प्रतिक्विंटलला किमान १००० रुपये, सरासरी १५०० रुपये आणि सर्वाधिक २८०० रुपये, तर वांग्यांना किमान ५०० रुपये, सरासरी १८०० रुपये आणि सर्वाधिक २५०० रुपये असा दर मिळाला.


इतर बाजारभाव बातम्या
उत्पादन घटल्याने झेंडूच्‍या फुलांनी...नाशिक : दसरा सणाच्या पार्श्वभूमीवर झेंडू फुलांना...
नाशिकमध्ये वालपापडी, घेवड्याची आवक वाढलीनाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
नगरमध्ये गवार, वांग्याच्या दरात तेजीनगर ः नगर येथील दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न...
सोलापुरात घेवडा, वांग्याचे दर पुन्हा...सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
सोयाबीनमध्ये तेजीचाच कलअकोला ः या हंगामातील सोयाबीन काढणी जोरात सुरू...
पुण्यात दसऱ्यानिमित्त फुलबाजार फुलला पुणे ः कोरोना संकटामुळे मार्चपासून सलग पाच...
औरंगाबादमध्ये कांदा सरासरी ३५०० रुपये औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार...
परभणीत रताळी १३५० रूपये प्रतिक्विंटलपरभणी ः येथील पाथरी रस्त्यावरील फळे,...
राज्यात केळी ४०० ते ११०० रुपये क्विंटलनाशिकमध्ये ४०० ते १००० रूपये प्रतिक्विंटल...
नाशिकमध्ये दोडका सरासरी ४१६५ रूपये नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
नगरमध्ये भाजीपाल्याच्या दरात सुधारणा नगर : येथील दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न बाजार...
कोल्हापुरात भाजीपाल्याच्या दरात वाढकोल्हापूर :  येथील बाजार समितीत या सप्ताहात...
सोलापुरात गवार, घेवडा, भेंडीतील तेजी...सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
नाशिकमध्ये डाळिंबाची आवक सर्वसाधारण; दर...नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
नागपुरात सोयाबीन दरातील तेजीबाबत...नागपूर : संततधार पावसाचा फटका बसल्याने सोयाबीनची...
पुणे बाजारात कांदा दरात सुधारणापुणे ः राज्यात सर्वदूर झालेल्या पावसाचा फटका...
नवरात्रोत्सवामुळे फूल बाजाराला `रंग`पुणे: कोरोना संकटाचा सर्वाधिक फटका बसलेल्या फूल...
परभणीत आवळ्यांना सरासरी ११०० रुपये दरपरभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे, भाजीपाला...
राज्यात वांगी सरासरी १५०० ते ८००० रूपयेनाशिकमध्ये ३००० ते ५५०० रुपये नाशिक : येथील...
नाशिकमध्ये वांग्यांना ५५०० सरासरी रूपये...नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...