agriculture news in marathi In Solapur with fenugreek, cilantro Eggplant, pick up the ghee | Page 3 ||| Agrowon

सोलापुरात मेथी, कोथिंबिरीसह वांगी, घेवड्याला उठाव

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 10 ऑगस्ट 2021

सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात गतसप्ताहात मेथी, कोथिंबिरीसह वांगी, घेवड्याला चांगला उठाव मिळाला. त्यामुळे त्यांच्या दरातही तेजी राहिली, असे बाजार समितीच्या सूत्रांकडून सांगण्यात आले.

सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात गतसप्ताहात मेथी, कोथिंबिरीसह वांगी, घेवड्याला चांगला उठाव मिळाला. त्यामुळे त्यांच्या दरातही तेजी राहिली, असे बाजार समितीच्या सूत्रांकडून सांगण्यात आले.

बाजार समितीच्या आवारात गतसप्ताहात मेथी आणि कोथिंबिरीच्या प्रत्येकी ८ ते १० हजार पेंढयांपर्यंत रोजची आवक राहिली. तर वांग्यांची २० ते ४० क्विंटल आणि घेवड्याची १० ते १५ क्विंटल अशी आवक राहिली. गेल्या पंधरवड्यापासून त्यांच्या आवकेत आणि दरात चढ-उतार होत आहे.

या सप्ताहात मात्र काहीशी तेजी राहिली. मेथीला शंभर पेंढ्यांसाठी ८०० ते १३०० रुपये, कोथिंबिरीला ९०० ते १५०० रुपये आणि वांग्यांना प्रतिक्विंटलला किमान १००० रुपये, सरासरी २००० रुपये आणि सर्वाधिक ३००० हजार रुपये, तर घेवड्याला किमान ३००० रुपये, सरासरी ३५०० रुपये आणि सर्वाधिक ४००० रुपये असा दर मिळाला.

त्याशिवाय हिरवी मिरची, काकडीलाही मागणी वाढली. 
हिरव्या मिरचीला प्रतिक्विंटलला किमान १००० रुपये, सरासरी १५०० रुपये आणि सर्वाधिक २५०० रुपये, तर काकडीला प्रतिक्विंटलला किमान १००० रुपये, सरासरी २००० रुपये आणि सर्वाधिक ८००० रुपये असा दर मिळाला.

टोमॅटो आणि सिमला मिरचीचे दर पुन्हा स्थिर राहिले. त्यांची आवकही तशी जेमतेम राहिली. टोमॅटोला प्रतिक्विंटलला किमान २०० रुपये, सरासरी ७०० रुपये आणि सर्वाधिक १३०० रुपये, तर सिमला मिरचीला प्रतिक्विंटलला किमान ६०० रुपये, सरासरी ८०० रुपये आणि सर्वाधिक १५०० रुपये असा दर मिळाला. 

कांद्याचे दर स्थिर

कांद्याची आवक आणि दर या सप्ताहात पुन्हा जैसे थेच राहिले. कांद्याची आवक प्रतिदिन ५० ते ६० गाड्यांपर्यंत राहिली. परंतु मागणीच्या तुलनेत कमीच आवक राहिली. त्यामुळे दर काहीसे स्थिर राहिले. कांद्याला प्रतिक्विंटलला किमान २०० रुपये, सरासरी १००० रुपये आणि सर्वाधिक २३०० रुपये असा दर मिळाल्याचे सांगण्यात आले.


इतर बाजारभाव बातम्या
केळीला १२२० रुपये प्रतिक्विंटल दरजळगाव : केळी दरात गेल्या दोन दिवसात किरकोळ घसरण...
पुण्यात पालेभाज्यांची आवक स्थिर पुणे : गुलेटकडी येथील पुणे कृषी उत्पन्न बाजार...
बऱ्हाणपूरला केळीला हंगामातील सर्वाधिक दरजळगाव :  खानदेशात केळीचे दर टिकून आहेत. मध्य...
राज्यात सीताफळ १००० ते १४००० रुपये...सोलापुरात प्रतिक्विंटलला २००० ते ५००० रुपये...
नगरमध्ये हिरवी मिरची, भेंडी, दोडक्याला...नगर : नगर येथील दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न...
पुण्यात पालेभाज्यांच्या दरात वाढ पुणे : खरीप हंगामानंतर भाजीपाल्याचे रब्बीचा हंगाम...
राज्यात सोयाबीन ३००० ते ६७०० रुपये...अकोल्यात प्रतिक्विंटलला ४५०० ते ५५०० रुपये...
बेदाण्याला उठाव असल्याने दर स्थिरसांगली ः सणांमुळे बेदाण्याला चांगली मागणी आहे....
दोन आठवडे अगोदरच खरीप कांदा बाजारातनाशिक : जिल्ह्यातील चांदवड,देवळा, मालेगाव, येवला...
सोलापुरात डाळिंबाला उठाव; दरात सुधारणासोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
नाशिकमध्ये वाटाण्याच्या आवेकसह दरातही...नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये ...
नगरमध्ये फ्लॉवर, दोडक्याच्या दरात तेजीनगर : ः नगर येथील दादा पाटील शेळके कृषी...
उडदाचा दर ६ हजार; सोयाबीन ८ हजाराच्या...लातूर : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गत...
राज्यात उडीद ३३०१ ते ७०१० रुपयेहिंगोलीत प्रतिक्विंटल ५५९५ रुपयांचा दर हिंगोली...
नाशिकमध्ये हिरव्या मिरचीच्या आवकेत घट...नाशिक : नाशिक बाजार समितीत गत सप्ताहात हिरव्या...
नगरमध्ये हिरवी मिरची, टोमॅटोची आवक...नगर  ः नगर येथील दादा पाटील शेळके कृषी...
सोलापुरात गवार, भेंडी, वांग्यांना...सोलापूर ः सोलापूर बाजार समितीच्या आवारात...
पुण्यात  दोडका, फ्लॉवर, मटार तेजीत पुणे : पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये रविवारी...
राज्यात टोमॅटो प्रतिक्विंटल ४०० ते १५५०...औरंगाबाद येथे सरासरी ४५० रुपये प्रतिक्विंटल...
खानदेशात केळी दरांवर दबावजळगाव : खानदेशात केळीची आवक गेल्या पाच-सहा...