सोलापूर फेस्ट आता होणार ठाण्यात

सोलापूर फेस्ट आता होणार ठाण्यात
सोलापूर फेस्ट आता होणार ठाण्यात

सोलापूर : मुंबई, पुण्याच्या यशस्वितेनंतर सोलापूर सोशल फाउंडेशनतर्फे सोलापूर फेस्ट आता १७ ते १९ मे या कालावधीत ठाण्यात होणार आहे. सोलापूरचे ब्रॅंडिंग करण्यासाठी हा उपक्रम होत असल्याची माहिती राज्याचे सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी दिली. 

सोलापूर सोशल फाउंडेशनतर्फे ठाण्यात होणाऱ्या सोलापूर फेस्टची माहिती देण्यासाठी आयोजिलेल्या पत्रकार परिषदेत देशमुख बोलत होते. या वेळी सोलापूर सोशल फाउंडेशनचे ब्रॅंड ॲम्बेसिडर आणि ज्येष्ठ अभिनेते राहुल सोलापूरकर उपस्थित होते. 

मुंबई व पुण्यात मिळालेल्या यशामुळे स्टॉलधारकांनी ठाण्यामध्ये फेस्ट घेण्याची  मागणी केली होती. त्यामुळे याचे आयोजन केले आहे. सोलापूर शहर-जिल्ह्यात उत्पादित झालेल्या मालाला बाजारपेठ उपलब्ध व्हावी, यासाठी या फेस्टचे आयोजन केले आहे. यापूर्वीच्या फेस्टमध्ये स्टॉलधारकांचे आलेले अनुभव अतिशय सकारात्मक असल्याचेही देशमुख यांनी सांगितले. 

या फेस्टमध्ये सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी सर्वांना केले आहे. यापूर्वीच्या फेस्टमध्येही तसे आवाहन केले होते. कोणताही पक्ष न पाहता त्यांना सहभागी होण्याचे निमंत्रण स्वतः दिले असल्याचेही देशमुख यांनी सांगितले. 

ठाणे येथे होणाऱ्या सोलापूर फेस्टमध्ये सोलापुरातील जवळपास १०० स्टॉल्स सहभागी होतील, असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला. १०० स्टॉल्समध्ये जवळपास ३३ टक्के स्टॉल्स हे महिलांसाठी राखीव आहेत. त्याचबरोबर महिला बचत गटाच्या स्टॉल्सना दरामध्ये ३३ टक्के सूटही देण्यात येणार आहे. या फेस्टमध्ये जास्तीत जास्त लोकांनी सहभागी होण्याचे आवाहन मंत्री देशमुख यांनी केले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com