Agriculture news in marathi Solapur grapes, pomegranate prices again stable, demand continuity | Page 2 ||| Agrowon

सोलापुरात द्राक्ष, डाळिंबांचे दर पुन्हा स्थिर, मागणीत सातत्य

सुदर्शन सुतार
मंगळवार, 14 जानेवारी 2020

सोलापूर : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात गतसप्ताहात डाळिंबांच्या आवकेत काहीसा चढ-उतार राहिला. द्राक्षाची आवकही या सप्ताहात बऱ्यापैकी राहिली. या दोन्ही फळांच्या मागणीत सातत्य राहिल्याने त्यांचे दर पुन्हा टिकून आहेत, असे बाजार समितीच्या सूत्रांकडून सांगण्यात आले.

बाजार समितीच्या आवारात गतसप्ताहात डाळिंबांची आवक प्रतिदिन एक ते दीड टनापर्यंत राहिली. ती आवक मुख्यतः सांगोला, मंगळवेढा, माढा, मोहोळ भागांतून झाली. गेल्या काही दिवसांपासून त्याला मागणीही आहे. डाळिंबाला प्रतिक्विंटलला किमान २०० रुपये, सरासरी २२०० रुपये आणि सर्वाधिक ५५०० रुपये इतका दर मिळाला.

सोलापूर : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात गतसप्ताहात डाळिंबांच्या आवकेत काहीसा चढ-उतार राहिला. द्राक्षाची आवकही या सप्ताहात बऱ्यापैकी राहिली. या दोन्ही फळांच्या मागणीत सातत्य राहिल्याने त्यांचे दर पुन्हा टिकून आहेत, असे बाजार समितीच्या सूत्रांकडून सांगण्यात आले.

बाजार समितीच्या आवारात गतसप्ताहात डाळिंबांची आवक प्रतिदिन एक ते दीड टनापर्यंत राहिली. ती आवक मुख्यतः सांगोला, मंगळवेढा, माढा, मोहोळ भागांतून झाली. गेल्या काही दिवसांपासून त्याला मागणीही आहे. डाळिंबाला प्रतिक्विंटलला किमान २०० रुपये, सरासरी २२०० रुपये आणि सर्वाधिक ५५०० रुपये इतका दर मिळाला.

द्राक्षाची आवकही या सप्ताहात चांगली झाली. ती सर्वाधिक स्थानिक भागातूनच बार्शी, पंढरपूर भागांतून झाली. प्रतिदिन ४०० ते ५०० क्विंटलपर्यंत ही आवक राहिली. पण, द्राक्षाला मागणी असल्याने दर मिळाला. द्राक्षाला चार किलोच्या पेटीला किमान ५० रुपये, सरासरी ७५ रुपये आणि सर्वाधिक १०० रुपये असा दर मिळाला.

त्याशिवाय बोर आणि लिंबालाही चांगला उठाव या सप्ताहात मिळाला. बोरांची आवक प्रतिदिन प्रत्येकी ५०० ते ९०० क्विंटलपर्यंत राहिली. बोराला क्विंटलला किमान ३०० रुपये, सरासरी ६०० रुपये आणि सर्वाधिक १२०० रुपये दर मिळाला, तर लिंबाची आवक प्रतिदिन २० ते ४० क्विंटलपर्यंत राहिली. लिंबाला प्रतिक्विंटलला किमान ४०० रुपये, सरासरी ९०० रुपये आणि सर्वाधिक १५०० रुपये असा राहिला.    

कांद्यासह भाज्यांचे दर स्थिर

गेल्या काही दिवसांपासून कांद्यासह शेपू, कोथिंबिर, मेथी या भाजीपाल्यांचे दर काहीसे स्थिर आहेत. या सप्ताहात कांद्याची आवक लक्षणीय वाढली. जिल्ह्यासह बाहेरूनही कांद्याची आवक वाढली. प्रतिदिन २०० ते ३०० गाड्यापर्यंत ही आवक राहिली. कांद्याला प्रतिक्विंटलला किमान २०० रुपये, सरासरी ३५०० रुपये आणि सर्वाधिक ५००० रुपये असा दर मिळाला. तर भाज्यांची आवकही ८ ते १० हजार पेंढ्यापर्यंत राहिली. पण, त्याला फारसा उठाव नसल्याने भाज्यांचे दरही स्थिर राहिले. भाज्यांना प्रत्येकी २०० ते ३०० रुपये असाच दर या सप्ताहातही कायम राहिला.

ताज्या बाजार भावासाठी क्लिक करा


इतर बाजारभाव बातम्या
सातारा : टोमॅटो, ढोबळी, घेवड्याच्या...सातारा : जुलै महिन्यात झालेली अतिवृष्टी, सध्या...
पावसाळी भाजीपाल्यामुळे ठोक बाजारातील दर... नांदेड : जिल्ह्यातील भाजीपाला बाजारात सध्या...
अकोल्यात भाजीपाल्यांची आवक अधिक; उठाव...अकोला : पावसाळ्याच्या काळात भाजीपाल्याला चांगले...
नागपुरात भाज्यांचे दर दबावाखालीनागपूर : मध्य भारतातील मुख्य बाजारपेठ असलेल्या...
पंढरपुरात बेदाण्यास सर्वाधिक ३०५ रुपये...सोलापूर : पंढरपूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
खानदेशात केळी दरात हलकी सुधारणा; आवक...जळगाव : खानदेशात कांदेबाग केळीच्या दरात...
राज्यात मोसंबी १५०० ते ३५०० रुपये...सांगलीत सरासरी ३००० रुपये प्रतिक्विंटल सांगली ः...
नगरमध्ये गवारीला चार ते सहा हजार...नगर ः नगर येथील दादा पाटील शेळके कृषी...
कळमणा बाजारात मोसंबीच्या दरात घटनागपूर ः कळमणा बाजारात मोसंबीची आवक नियमीत आहे....
राज्यात टोमॅटो ३०० ते १४०० रुपये क्विंटलऔरंगाबादमध्ये क्विंटलला ३०० ते १००० रुपये दर...
कळमण्यात मोसंबीच्या दरात काहीशी सुधारणानागपूर ः कळमणा बाजारात मोसंबीची आवक नियमित आहे....
नाशिकमध्ये हिरव्या मिरचीला १४०० ते २५००...नाशिक : नाशिक बाजार समितीमध्ये गत सप्ताहात...
राज्यात केळी ५५० ते १५०० रुपये क्विंटलनाशिकमध्ये क्विंटलला ८५० ते १५०० रुपये नाशिक...
सोलापुरात मेथी, कोथिंबिरीसह वांगी,...सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
पुण्यात भाजीपाला आवक सुरळीत; दर स्थिरपुणे ः पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये रविवारी...
पुणे बाजार समितीत मोसंबीचा आवक सुरू पुणे : मोसंबीच्या आंबिया बहराचा हंगाम सुरू झाला...
राज्यात मिरची १००० ते ३५०० रुपये क्विंटलनांदेडमध्ये क्विंटलला २००० ते २५०० रुपये...
नाशिकमध्ये डाळिंबाच्या आवकेत वाढनाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गत...
नगरला वाटाणा, भेंडीच्या दरात सुधारणा;...नगर ः नगर येथील दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न...
नागपुरात सोयाबीन दरातील घोडदौड कायम नागपूर ः प्रक्रिया उद्योजकांची मागणी वाढल्याने...