Agriculture news in Marathi, Solapur in green chilli, tomato cost improvement | Agrowon

सोलापुरात हिरवी मिरची, टोमॅटोच्या दरात सुधारणा
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 18 जून 2019

सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात गतसप्ताहात हिरवी मिरची, टोमॅटो, कोथिंबिरीचे दर वधारलेलेच राहिले. गेल्या पंधरवड्यापासून त्यांच्या आवकेत सातत्याने घट होत आहे. त्याचा परिणाम दरावर झाल्याचे दिसून आले. तसेच कांद्याचे दरही या सप्ताहात पुन्हा टिकून राहिल्याचे बाजार समितीच्या सूत्रांकडून सांगण्यात आले.

सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात गतसप्ताहात हिरवी मिरची, टोमॅटो, कोथिंबिरीचे दर वधारलेलेच राहिले. गेल्या पंधरवड्यापासून त्यांच्या आवकेत सातत्याने घट होत आहे. त्याचा परिणाम दरावर झाल्याचे दिसून आले. तसेच कांद्याचे दरही या सप्ताहात पुन्हा टिकून राहिल्याचे बाजार समितीच्या सूत्रांकडून सांगण्यात आले.

बाजार समितीच्या आवारात गतसप्ताहात हिरव्या मिरचीची आवक रोज ५० ते ८० क्विंटल, टोमॅटोची ४०० ते ५०० क्विंटल आणि कोथिंबिरीची आवक १० ते १२ हजार पेंढ्यापर्यंत राहिली. ही सगळी आवक स्थानिक भागातून झाली. पण गेल्या पंधरवड्यापासून त्यांच्या या आवकेत सातत्य नाही. शिवाय ती कमी-जास्त होत आहे. पण दुसरीकडे बाजारात मागणी वाढत असल्याने पुरवठा आणि मागणीत तुटवडा निर्माण होत असल्याने त्यांचे दर पुन्हा वधारलेलेच राहिले. 

हिरव्या मिरचीला प्रतिक्विंटलला किमान २००० रुपये, सरासरी ३००० रुपये आणि सर्वाधिक ४००० रुपये, टोमॅटोला किमान ७०० रुपये, सरासरी १५०० रुपये आणि सर्वाधिक ३००० रुपये दर मिळाला. कोथिंबिरीला शंभर पेंढ्यासाठी किमान ७०० रुपये, सरासरी १५०० रुपये आणि सर्वाधिक २००० रुपये असा दर मिळाला. त्याशिवाय वांगी, कोबी आणि गवारलाही चांगली मागणी वाढली. त्यांचे दरही काहीसे तेजीतच पण टिकून होते. त्यांची आवकही प्रत्येकी ५ ते ६० क्विंटलपर्यंत राहिली. 

वांग्याला प्रतिक्विंटलला किमान ४०० रुपये, सरासरी १५०० रुपये आणि सर्वाधिक २५०० रुपये, कोबीला किमान ९०० रुपये, सरासरी ११०० रुपये आणि सर्वाधिक १५०० रुपये तर गवारला किमान २००० रुपये, सरासरी ३००० रुपये आणि सर्वाधिक ४००० रुपये असा दर मिळाला. 

भाजीपाल्यामध्ये कोथिंबिरीशिवाय मेथी, चुका आणि पालकालाही चांगला उठाव मिळाला. त्यांचे दरही टिकून होते. त्यांची आवकही प्रत्येकी ५ ते दहा हजार पेंढ्यांपर्यंत राहिली. मेथीला शंभर पेंढ्यांसाठी १००० ते १२०० रुपये, चुक्याला ४०० ते ५०० रुपये, शेपूला ४०० ते ७०० रुपये आणि पालकाला ३०० ते ४०० रुपये असा दर मिळाला. कांद्याची आवक पुन्हा कमीच राहिली. रोज १० ते ३० गाड्यापर्यंत राहिली. पण कांद्याच्या दरातील सुधारणा बाजारावर परिणाम करणारी ठरली. सध्या कांद्याचे दर आणि मागणीही टिकून आहे. कांद्याला प्रतिक्विंटलला किमान १०० रुपये, सरासरी ९०० रुपये आणि सर्वाधिक १८०० रुपये असा दर मिळाला. 
 

इतर ताज्या घडामोडी
रत्नागिरी जिल्ह्याला पावसाने झोडपलेरत्नागिरी ः मुसळधार पावसाने जिल्ह्याला चांगलेच...
गोसे खुर्दमधून होणार चार हजार हेक्‍टरवर...चंद्रपूर ः धानपट्ट्यात पावसाअभावी अस्वस्थता आहे....
नाशिक जिल्ह्यात धरणांच्या तपासणीसाठी...नाशिक : जिल्ह्यातील धरणांच्या सुरक्षितेतसाठी...
पेठ तालुक्यात जमिनीतून निघताहेत...नाशिक : पेठ तालुक्यातील निरगुडे गावात दोन...
जळगावात लाल कांद्याचे दर आणि आवक टिकूनजळगाव ः जिल्ह्यातील प्रमुख बाजार, उपबाजारांमध्ये...
नाशिकमध्ये हिरवी मिरची प्रतिक्विंटल...नाशिक ः नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये चालू...
पुणे, नगर जिल्ह्यात पावसाअभावी चारा...पुणे  : पावसाळ्यात जनावरांसाठी चाऱ्याची अडचण...
`स्वाभिमानी`चे नाशिक जिल्हा बॅंकेसमोर...नाशिक : जिल्हा बँक ही शेतकऱ्यांची बँक आहे. ती...
आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वाखाली...मुंबई   : युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे...
नवती केळी दरात सुधारणाजळगाव  ः खानदेशात दर्जेदार नवती केळीच्या...
रत्नागिरीत भात लागवड अंतिम टप्प्यातरत्नागिरी   ः जिल्ह्यात उशिरा पण...
रत्नागिरी जिल्ह्यातील आठ हजार शेतकरी...रत्नागिरी : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान...
नगर जिल्ह्यातील ४८२ गावांमध्ये...नगर  ः पावसाळ्याचा एक महिना उलटून गेला असला...
नाशिकमध्ये ७९१ कोटींच्या प्रारूप...नाशिक : पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या...
दक्षिण महाराष्ट्रात देशी बेंदूर...कोल्हापूर : वर्षभर काबाडकष्ट करणाऱ्या...
सांडपाणी प्रक्रियेची ‘रीड बेड पद्धती’रीड बेड पद्धतीची सांडपाणी शुद्धीकरणाची...
‘शेतकरी सन्मान’साठी रत्नागिरीतील दीड...रत्नागिरी   : पंतप्रधान शेतकरी सन्मान...
वृक्ष संवर्धनासाठी नागरिक, कर्मचारी...परभणी ः वसंतराव नाईक मराठवाडा कृषी...
नांदेड जिल्ह्यात साडेपाच लाख हेक्टरवर...नांदेड ः नांदेड जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात...
...तर रासायनिक खते, कीटकनाशकांचे ...पुणे  ः  केंद्र सरकारच्या वतीने झिरो...