Agriculture news in marathi Solapur in Keep up with the essential supplies: Guardian Minister Walase-Patil | Agrowon

जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सुरळीत ठेवा ः पालकमंत्री वळसे-पाटील 

टीम अॅग्रोवन
शनिवार, 28 मार्च 2020

सोलापूर : ‘कोरोना’ विषाणूंच्या प्रार्दुभावाला प्रतिबंध करण्याबरोबरच जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सुरळीत करण्याकडेही लक्ष द्या, अशा सूचना पालकमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी दिल्या.

सोलापूर : ‘कोरोना’ विषाणूंच्या प्रार्दुभावाला प्रतिबंध करण्याबरोबरच जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सुरळीत करण्याकडेही लक्ष द्या, अशा सूचना पालकमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी दिल्या.

पालकमंत्री वळसे-पाटील यांनी ‘कोरोना’ विषाणूच्या प्रतिबंधासाठी जिल्ह्यात केल्या जाणाऱ्या उपाययोजनांचा व्हिडीओ कॅान्फरन्सव्दारे आढावा घेतला. त्यावेळी त्यांनी या सूचना दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयातून जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, पोलिस आयुक्त अंकुश शिंदे, महापालिका आयुक्त दीपक तावरे, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश वायचळ, अतिरिक्त पोलिस अधीक्षक अतुल झेंडे, अतिरिक्त जिल्हाधिकारी संजीव जाधव आदी उपस्थित होते.

प्रारंभी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी जिल्ह्यातील परिस्थितीबाबत पालकमंत्री दिलीप वळसे पाटील यांना माहिती दिली. त्यामध्ये संचारबंदीची अंमलबजावणी, ‘कोरोना’ विषाणूचा प्रसार होऊ नये यासाठी केलेली उपाययोजना, जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सुरळीत व्हावा, यासाठी केलेले उपाय यांची माहिती दिली. यावर पालकमंत्री वळसे पाटील यांनी संचारबंदीची अंमलबजावणी करा. मात्र, नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा होईल याची काळजी घ्यावी. शहरातील घरपोच धान्ये पुरविणाऱ्या दुकानदारांची यादी, संपर्क क्रमांक प्रसिद्ध करा जेणेकरून लोकांना घरपोच धान्ये मिळतील आणि गर्दी होण्यास अटकाव होईल, असे सांगितले.

‘कोरोना’ प्रतिबंधासाठी आवश्यक असणारी साधन सामग्री तत्काळ खरेदी करावी. त्यासाठी स्थानिक परिस्थितीनुसार निर्णय घेतले जावेत. त्यावर आवश्यक कार्यवाही तत्काळ करण्यात यावी, अशा सूचना पालकमंत्री वळसे पाटील यांनी दिल्या. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक ढेले यांनी क्वारंटाईन कक्ष, आयसोलेशन कक्ष याची क्षमता वाढविण्यासाठी केलेल्या उपायांची माहिती दिली. 

यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी अजित देशमुख, जिल्हा पुरवठा अधिकारी उत्तम पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी भिमाशंकर जमादार, महानगरपालिकेचे आरोग्य अधिकारी संतोष नवले आदी उपस्थित होते.  
 


इतर ताज्या घडामोडी
बार्शी तालुक्यात सहा स्वस्त धान्य...सोलापूर : बार्शी तालुक्यातील सहा स्वस्त...
फालसापासून जाम, जेली, चटणीफालसा हा एक रानमेवा आहे. फालसा फळामध्ये प्रथिने,...
सोलापूर जिल्ह्यात पिकांच्या...सोलापूर : जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून सलग...
परभणी, हिंगोलीत सोयाबीन, तुर, कपाशीचे...परभणी : परभणी, हिंगोली जिल्ह्यातील मंडळांत...
परभणी जिल्ह्यात पावसाचा सोयाबीन पिकाला...परभणी : जिल्ह्यात दीर्घ खंडानंतर पावसाचे आगमन...
विष्णुपुरी प्रकल्पाचे सहा दरवाजे उघडलेनांदेड : गोदावरी नदीवरील विष्णुपुरी...
खानदेशात नुकसानीबाबत सोयाबीनचेही...जळगाव ः मूग, उडीद नुकसानीसंबंधी गेल्या...
जळगाव जिल्ह्यात बाजार समित्यांकडून...जळगाव ः जिल्ह्यात काही बाजार समित्यांचा...
परजिल्ह्यातील कारखान्यांची खानदेशातील...जळगाव ः खानदेशात उसाचे क्षेत्र यंदा...
पंजाब, हरियानात शेतकऱ्यांची आंदोलने नवी दिल्ली : केंद्र सरकारने आणलेल्या कृषिविषयक...
चक्रीवादळाची शेतकऱ्यांना नुकसान भरपाई...सिंधुदुर्ग ः निसर्ग चक्रीवादळातील नुकसानीकरिता...
नगर जिल्ह्यात मूग उत्पादकतेत यंदा...नगर ः नगर जिल्ह्यात यंदा चांगला पाऊस झाल्याने...
मुळा धरणातून वीस हजार क्युसेक विसर्गनगर ः नगर जिल्ह्यात गेल्या आठ दिवसांपासून जोरदार...
पावसाने सोयाबीनला फुटले कोंबवाशीम ः जिल्ह्यात काही भागात सततच्या पावसामुळे...
औरंगाबाद, लातूरमध्ये पावसाचा धुमाकूळऔरंगाबाद : मराठवाड्यात पावसाचा धुमाकूळ सुरूच...
पोषणयुक्त आहार घेण्यावर भर द्या : पाटीलनाशिक : ‘‘कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रत्येकाने...
कांदा निर्यातबंदी विरोधात ‘सोशल मीडिया...नाशिक : २०१३-१४ मध्ये सोशल मीडियाचा मोठ्या...
कारखान्यांना २५ बेडचे हॉस्पिटल बंधनकारकसोलापूर : राज्यातील ऊस गाळप हंगाम १५ ऑक्‍...
निर्यात अडथळे, बियाणे दराचा कांदा...जळगाव ः खानदेशात प्रतिकूल वातावरणामुळे खरिपातील...
परभणीत भेंडी १००० ते १५०० रूपये क्विंटल परभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला...