agriculture news in marathi, Solapur in lady finger Uprising | Agrowon

सोलापुरात गवार, भेंडी, वांग्याला उठाव

सुदर्शन सुतार
मंगळवार, 28 ऑगस्ट 2018

सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात गतसप्ताहात गवार, भेंडी, वांग्याला उठाव मिळाला. त्यांची आवकही जेमतेम झाली; पण मागणी असल्याने दरातील तेजी टिकून राहिल्याचे बाजार समितीच्या सूत्रांकडून सांगण्यात आले.

बाजार समितीच्या आवारात गतसप्ताहात गवारची रोज १५ ते २० क्विंटल, भेंडीची ३० क्विंटल आणि वांग्याची ५० ते १०० क्विंटलपर्यंत आवक राहिली. गवार, भेंडी, वांग्याची सगळी आवक ही स्थानिक भागातूनच झाली. गेल्या दोन-अडीच महिन्यांपासून त्यांच्या आवक आणि दरात सातत्याने चढ-उतार होतो आहे; पण मागणी असल्याने दर टिकून आहेत.

सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात गतसप्ताहात गवार, भेंडी, वांग्याला उठाव मिळाला. त्यांची आवकही जेमतेम झाली; पण मागणी असल्याने दरातील तेजी टिकून राहिल्याचे बाजार समितीच्या सूत्रांकडून सांगण्यात आले.

बाजार समितीच्या आवारात गतसप्ताहात गवारची रोज १५ ते २० क्विंटल, भेंडीची ३० क्विंटल आणि वांग्याची ५० ते १०० क्विंटलपर्यंत आवक राहिली. गवार, भेंडी, वांग्याची सगळी आवक ही स्थानिक भागातूनच झाली. गेल्या दोन-अडीच महिन्यांपासून त्यांच्या आवक आणि दरात सातत्याने चढ-उतार होतो आहे; पण मागणी असल्याने दर टिकून आहेत.

गवारला प्रतिक्विंटलसाठी किमान ५०० रुपये, सरासरी १८०० रुपये आणि सर्वाधिक ३००० रुपये, भेंडीला किमान १००० रुपये, सरासरी २००० रुपये आणि सर्वाधिक ३५०० रुपये तर वांग्याला किमान ५०० रुपये, सरासरी १७०० रुपये आणि सर्वाधिक २५०० रुपये असा दर मिळाला. त्याशिवाय ढोबळी मिरची, काकडी, गाजराचे दरही बाजारात टिकून राहिले.

ढोबळी मिरचीला प्रतिक्विंटल किमान ५०० रुपये, सरासरी १२०० रुपये आणि सर्वाधिक १८०० रुपये तर काकडीला किमान ५०० रुपये, सरासरी १५०० रुपये आणि सर्वाधिक २५०० रुपये तर गाजराला किमान ८०० रुपये, सरासरी १३०० रुपये आणि सर्वाधिक १६०० रुपये असा दर मिळाला. कांद्याच्या दरातही काहीशी घसरण झाली. कांद्याची प्रत्येकी ३० ते ५० गाड्या आवक झाली. कांद्याला प्रतिक्विंटल किमान ३०० रुपये, सरासरी ७५० रुपये आणि सर्वाधिक १४०० रुपये असा दर मिळाला.

भाज्याही टिकून
बाजार समितीच्या आवारात गतसप्ताहात मेथी, शेपू, चुका, कोथिंबीर या भाज्यांची आवक जेमतेम झाली. प्रत्येकी ५ ते १० हजार पेंढ्यांपर्यंत त्यांची आवक होती. स्थानिक भागातूनच ही सगळी आवक झाली. पण या सप्ताहात भाज्यांना फारसा उठाव नसल्याचे दिसून आले. मेथीला शंभर पेंढ्यांसाठी ५०० ते ७०० रुपये, शेपूला ३०० ते ४५० रुपये आणि कोथिंबिरीला ४०० ते ७०० रुपये आणि चुक्‍याला ३००  ते २५० रुपये असा दर मिळाला.


इतर ताज्या घडामोडी
पुणे विद्यापीठात पश्चिम विभागीय औषधी...पुणे  ः केंद्र सरकारच्या आयुष...
शिर्डीतील सामुदायिक विवाह सोहळ्यासाठीची...शिर्डी, जि. नगर  : साई सिद्धी चॅरिटेबल...
माळेगाव कारखान्यात सत्तापरिवर्तन;...माळेगाव, जि. पुणे  ः राज्यात लक्षवेधी...
नगर जिल्ह्यातील सहा केंद्रांवर तूर...नगर  ः जिल्ह्यात हमीभावाने तूर खरेदीसाठी आठ...
कर्जमाफीवरून विरोधक दुसऱ्या दिवशीही...मुंबई  ः भाजपने शेतकरी कर्जमाफी आणि महिला...
सातारा जिल्ह्यात ९० टक्के क्षेत्रावर...सातारा  ः जिल्ह्यात पोषक वातावरणामुळे रब्बी...
मसाला, सुगंधी वनस्पतीवर्गीय पिकांची...अकोला  ः ‘‘आपल्याकडील हवामान, जमीन हे मसाला...
मराठवाड्यात यंदा तुती लागवडीसाठी...औरंगाबाद : मराठवाड्यात गतवर्षी दुष्काळाचा...
संपूर्ण कर्जमुक्तीसाठी भाजपचे आंदोलन अकोला  : राज्यातील महाविकास आघाडी सरकारने...
`म्हैसाळ`च्या उन्हाळी आवर्तनाकडे...सलगरे, जि. सांगली : म्हैसाळ पाणी योजनेचे कालवे...
अकोला झेडपी देणार आत्महत्याग्रस्त...अकोला  ः नापिकी, कर्जबाजारीपणामुळे जिल्ह्यात...
लातूर विभागात १४ लाख हेक्‍टरवर रब्बी...लातूर : विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयांतर्गत...
अमरावती जिल्ह्यात निवडणुकांचा बिगुलअमरावती  ः जिल्ह्यात एप्रिल ते जून या...
वऱ्हाडातील चार लाख शेतकरी...अकोला  ः राज्य शासनाने जाहीर केलेल्या...
मराठवाडा, खानदेशातील नऊ कारखान्यांची...औरंगाबाद  : येथील साखर सहसंचालक...
नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यात ३३११...नांदेड : महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती...
जळगाव : कर्जमाफीसाठी ११३ शेतकऱ्यांचे...जळगाव  : महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी...
कराडी येथे रेंजअभावी कर्जमाफी लाभार्थी...पारोळा, जि. जळगाव ः राज्य सरकारच्या महात्मा...
पुष्पोत्सव अधिक मोठ्या स्वरूपात साजरा...नाशिक : ‘नाशिक महापालिका राबवत असलेला...
नाशिक जिल्ह्यात गव्हाच्या पेऱ्यात वाढनाशिक : जिल्ह्यात रब्बीच्या एकूण १ लाख १३ हजार...