उत्तर सोलापुरात बाजार समिती निवडणूक प्रचाराला सुरवात

उत्तर सोलापुरात बाजार समिती निवडणुकीच्या प्रचाराला सुरवात
उत्तर सोलापुरात बाजार समिती निवडणुकीच्या प्रचाराला सुरवात

सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीचे चित्र अद्यापही स्पष्ट झालेले नाही. मात्र, उत्तर सोलापूर तालुक्‍यात भाजप व राष्ट्रवादीच्या नेत्यांनी प्रचाराला सुरवात केली आहे. मतदारांच्या भेटी घेऊन त्यांचा काय अंदाज आहे, हे जाणून घेण्याचा प्रयत्न या नेत्यांकडून सुरू आहे.

उत्तर सोलापूर तालुक्‍यात मार्डी, नान्नज, कळमण, पाकणी, हिरज हे गण आहेत. मार्डीवगळता इतर सर्व गण सर्वसाधारण आहेत. त्यामुळे त्या गणातून निवडणूक लढविण्याचा विचार भाजप, राष्ट्रवादीसह कॉंग्रेसच्या नेत्यांनीही सुरू केला आहे. राष्ट्रवादीचे नेते तथा जिल्हा परिषदेतील विरोधी पक्षनेते बळीराम साठे यांनी कॉंग्रेसबरोबर आघाडी करण्याचे संकेत दिले आहेत. जागावाटपामध्ये उत्तरमधील नान्नज, कळमण, मार्डी या तीन व दक्षिणमधील मंद्रूप या जागेची मागणी त्यांनी केली आहे. त्यामुळे जागावाटपामध्ये काय होते, हेही पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

दरम्यान, नान्नज गणातून भाजपकडून माजी पंचायत समिती सदस्य तथा जिल्हाध्यक्ष शहाजी पवार यांचे बंधू इंद्रजित पवार यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. ते याच गणातून निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक आहेत. त्यामुळे त्यांनी या गणातील  शेतकरी मतदारांच्या गाठीभेटी घेण्यास सुरवात केली आहे. बाजार समिती ही शेतकऱ्यांसाठी असते. पण, तिच्या निवडणुकीशी शेतकऱ्यांचा थेट काहीही संबंध नव्हता. मात्र, सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी बाजार समितीच्या निवडणुकीसाठी थेट शेतकऱ्यांना मतदानाचा अधिकार दिल्यामुळे बाजार समितीमधील राजकारण आता शेतकऱ्यांना कळू लागले आहे.

शेतकऱ्यांना मतदानाची संधी देणाऱ्या भाजपला बाजार समितीमध्ये संधी द्यावी, अशी अपेक्षा ते मतदारांकडून व्यक्त करत आहेत. कळमण गणातून राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून श्री. साठे यांचे चिरंजीव जितेंद्र साठे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे त्यांनीही निवडणुकीचा प्रचार सुरू केला आहे. बळीराम साठे यांनी गावनिहाय बैठका घेण्यास सुरवात केली आहे. श्री. साठे यांच्या जिल्हा परिषदेच्या मतदार संघाचाच हा भाग असल्याने त्यांनी आपल्या मुलाचा अर्ज या गणातून भरला आहे. एकंदरीत इच्छुकांनी दौरे सुरू करून चाचपणी सुरू केली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com