नगर ः कोरोना व्हायरस संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्यात चिकन, अंड्याला मागणी वाढली आहे.
ताज्या घडामोडी
सोलापूर बाजार समितीत तपासणीशिवाय प्रवेश नाहीच
सोलापूर ः किरकोळ भाजीविक्रेत्यांना सकाळी नऊपर्यंतच आवारात थांबण्याचे आणि कांद्याचे लिलाव सकाळी दहा नंतर करण्याचा निर्णयही या वेळी
झाला.
सोलापूर ः कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीतील गर्दी नियंत्रित ठेवण्यासाठी योग्य ती खबरदारी म्हणून बाजार समितीच्या मुख्य प्रवेशद्वारात तपासणी करुन शेतकरी आणि व्यापाऱ्यांना प्रवेश देण्याचा निर्णय बाजार समितीने घेतला आहे. तसेच किरकोळ भाजीविक्रेत्यांना सकाळी नऊपर्यंतच आवारात थांबण्याचे आणि कांद्याचे लिलाव सकाळी दहा नंतर करण्याचा निर्णयही या वेळी
झाला.
कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने जिल्हा उपनिबंधक कुंदन भोळे यांच्या उपस्थितीत बाजार समितीचे सचिव अंबादास बिराजदार, व्यापारी संघाचे सर्व अध्यक्ष, अडत व्यापारी, खरेदीदार यांची बैठक घेण्यात आली. त्यात हे निर्णय झाले. महापालिकेच्या वतीने उपाययोजना करण्यात येत आहेत. गर्दीची ठिकाणे निश्चित करून तेथे लक्ष ठेवण्यात येत आहे. त्याचाच भाग म्हणून बाजार समितीत तपासणी मोहीम सुरू करण्यात येणार आहे. बाजार समितीच्या आवारात किरकोळ भाजीविक्रेत्यांना सकाळी ९ पर्यंत वेळ दिली आहे. त्यानंतर निर्जंतुकीकरण करण्यात येईल.
त्यानंतर लगेच सकाळी १० वाजल्यापासून कांद्याचे लिलाव सुरू होतील. सध्या सकाळी आठपासून कांद्याचे लिलाव सुरू होते, शिवाय याचवेळी किरकोळ भाजीविक्रेते आणि खरेदीदार यांचीही मोठी गर्दी होत होती. त्यामुळे हे निर्णय घेण्यात आले.
आवारात पाणी टाक्यांची व्यवस्था
बाजार समितीत हात धुण्यासाठी ठिकठिकाणी पाण्याच्या टाकीची व्यवस्था करण्यात येणार आहे. महापालिका व पोलिस प्रशासनाच्या सहकार्याने शेतकरी, व्यापारी, हमाल, तोलार तसेच नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात येणार आहे.
दंडात्मक कारवाई सुरू
दरम्यान, बाजार समिती परिसरात १२ जणांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. मास्क न वापरल्याने नागरिकांना १० हजार रुपये, शारीरिक अंतर न ठेवल्याने पाच हजार रुपये, तर सार्वजनिक ठिकाणी घाण केल्याने १९५० रुपये दंडात्मक कारवाई करण्यात आली.