agriculture news in marathi In Solapur Market Committee No access without inspection | Page 2 ||| Agrowon

सोलापूर बाजार समितीत तपासणीशिवाय प्रवेश नाहीच

टीम अॅग्रोवन
बुधवार, 3 मार्च 2021

सोलापूर ः किरकोळ भाजीविक्रेत्यांना सकाळी नऊपर्यंतच आवारात थांबण्याचे आणि कांद्याचे लिलाव सकाळी दहा नंतर करण्याचा निर्णयही या वेळी 
झाला. 

सोलापूर ः कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीतील गर्दी नियंत्रित ठेवण्यासाठी योग्य ती खबरदारी म्हणून बाजार समितीच्या मुख्य प्रवेशद्वारात तपासणी करुन शेतकरी आणि व्यापाऱ्यांना प्रवेश देण्याचा निर्णय बाजार समितीने घेतला आहे. तसेच किरकोळ भाजीविक्रेत्यांना सकाळी नऊपर्यंतच आवारात थांबण्याचे आणि कांद्याचे लिलाव सकाळी दहा नंतर करण्याचा निर्णयही या वेळी 
झाला. 

कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने जिल्हा उपनिबंधक कुंदन भोळे यांच्या उपस्थितीत बाजार समितीचे सचिव अंबादास बिराजदार, व्यापारी संघाचे सर्व अध्यक्ष, अडत व्यापारी, खरेदीदार यांची बैठक घेण्यात आली. त्यात हे निर्णय झाले. महापालिकेच्या वतीने उपाययोजना करण्यात येत आहेत. गर्दीची ठिकाणे निश्‍चित करून तेथे लक्ष ठेवण्यात येत आहे. त्याचाच भाग म्हणून बाजार समितीत तपासणी मोहीम सुरू करण्यात येणार आहे. बाजार समितीच्या आवारात किरकोळ भाजीविक्रेत्यांना सकाळी ९ पर्यंत वेळ दिली आहे. त्यानंतर निर्जंतुकीकरण करण्यात येईल.

त्यानंतर लगेच सकाळी १० वाजल्यापासून कांद्याचे लिलाव सुरू होतील. सध्या सकाळी आठपासून कांद्याचे लिलाव सुरू होते, शिवाय याचवेळी किरकोळ भाजीविक्रेते आणि खरेदीदार यांचीही मोठी गर्दी होत होती. त्यामुळे हे निर्णय घेण्यात आले. 

आवारात पाणी टाक्यांची व्यवस्था

बाजार समितीत हात धुण्यासाठी ठिकठिकाणी पाण्याच्या टाकीची व्यवस्था करण्यात येणार आहे. महापालिका व पोलिस प्रशासनाच्या सहकार्याने शेतकरी, व्यापारी, हमाल, तोलार तसेच नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात येणार आहे. 

दंडात्मक कारवाई सुरू

दरम्यान, बाजार समिती परिसरात १२ जणांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. मास्क न वापरल्याने नागरिकांना १० हजार रुपये, शारीरिक अंतर न ठेवल्याने पाच हजार रुपये, तर सार्वजनिक ठिकाणी घाण केल्याने १९५० रुपये दंडात्मक कारवाई करण्यात आली.


इतर ताज्या घडामोडी
खरीप हंगामाच्या तोंडावर ...यवतमाळ : गेल्या दशकात जिल्ह्यातील शेतकरी कधी...
अमरावतीत शासकीय दूध योजनेच्या संकलनात ...अमरावती : कोरोनामुळे हॉटेल आणि दुग्धजन्य पदार्थ...
‘आंबेओहोळ’ची घळभरणी अंतिम टप्यात उत्तूर, जि. कोल्हापूर : आरदाळ-उत्तूर (ता. आजरा)...
म्हैसाळ योजनेतून सांगोल्यासाठी पाणी...सांगोला, जि. सोलापूर : सांगोला वितरिका क्रमांक...
सहा कारखान्यांनी उरकले गाळप; ९७ लाख ३८... सातारा : जिल्ह्यातील साखर हंगाम अंतिम टप्प्यात...
खरिपासाठी नगरमध्ये साडेसहा लाख हेक्टर...पुणे नगर : नगर जिल्ह्यात यंदा खरिपासाठी यंदा ६...
परभणीतील शेतकऱ्यांना ८३ कोटींचा विमा...परभणी : पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गंत सन...
ग्रामसभा करणार तेंदुपत्याची विक्री गडचिरोली : पेसा (पंचायत एक्स्टेंशन टू शेडूल...
ग्रामीण रुग्णांसाठी जिल्हा परिषद...सोलापूर ः जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये कोरोनाचा...
कृषी पणन मंडळाकडून आॅनालाइन आंबा...पुणे ः कोरोना संकटातही आंबा उत्पादक शेतकऱ्यांच्या...
अखेर मोसंबी उत्पादकांना विमा परतावा...जालना : जिल्ह्यातील सहा हजारांवर मोसंबी...
राहीबाई पोपेरे यांची वनस्पती संरक्षण...नाशिक : भारत सरकारच्या कृषी व शेतकरी कल्याण...
डाळिंब अंबिया बहरातील कीड- रोग...डाळिंब बागेत विविध कीड-रोगांचा प्रादुर्भाव मोठ्या...
कोरोनाबाबत डाॅ. सिंग यांनी सूचवलेला...नांदेड : कोरोनाविरूद्ध लढण्यासाठी माजी पंतप्रधान...
कोरोना व्हॅक्सिनसाठी वयाची अट शिथिल...कोल्हापूर : भाजीपाला, दूध उत्पादक तसेच...
पुणे बाजार समितीत गर्दीला बसणार लगामपुणे : शहरात कोरोना संसर्गामुळे लावण्यात आलेल्या...
गोसीखुर्द धरणाच्या पाण्याचे ...चंद्रपूर : प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या...
पुणे जिल्ह्यातील धरणांत ७८ टीएमसी...पुणे : गेल्या दीड महिन्यापासून उन्हाच्या झळा...
कोट्यवधींच्या कर्जवसुलीसाठी स्थापन...नांदेड : जिल्हा मध्यवर्ती बँकेची आर्थिक परिस्थिती...
पालखेडच्या आवर्तनाने शेतीसह पिण्याच्या...येवला, जि. नाशिक : पालखेड डाव्या कालव्यातून...