agriculture news in marathi, Solapur new 111 Talathi convicts; 19 Mandalans Approval | Agrowon

सोलापुरात नव्या १११ तलाठी सजा; १९ मंडलांस मंजुरी
टीम अॅग्रोवन
रविवार, 29 जुलै 2018

सोलापूर : जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यात १११ तलाठी सजा आणि १९ नव्या मंडलांचा प्रस्ताव शासनाकडे पाठवला होता. या प्रस्तावाला महसूल विभागाने मंजुरी दिली आहे. त्यामुळे आता नव्याने या १११ तलाठी सजा आणि १९ मंडलांची भर पडणार आहे. याबरोबरच प्रशासनाचे कामही आणखी सुलभ होण्यास मदत होणार आहे. सुमारे दोन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर हा निर्णय शासनाने जाहीर केला आहे.

सोलापूर : जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यात १११ तलाठी सजा आणि १९ नव्या मंडलांचा प्रस्ताव शासनाकडे पाठवला होता. या प्रस्तावाला महसूल विभागाने मंजुरी दिली आहे. त्यामुळे आता नव्याने या १११ तलाठी सजा आणि १९ मंडलांची भर पडणार आहे. याबरोबरच प्रशासनाचे कामही आणखी सुलभ होण्यास मदत होणार आहे. सुमारे दोन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर हा निर्णय शासनाने जाहीर केला आहे.

दरम्यान, शासनाने यासंबंधी प्रातांधिकाऱ्यांची सोमवारी (ता.३१) बैठक बोलावण्यात आली आहे. त्याशिवाय १५ ऑगस्टपर्यंत पदमान्यतेसाठी पुन्हा प्रस्ताव
पाठवण्यात येणार आहे. सोलापूर शहरात सर्वाधिक १० तलाठी सजा तर ४ मंडल निर्मिती करण्यात येणार आहे. सध्या शहरात एक मंडल व तीन तलाठी सजा आहेत. मंजुरी मिळालेल्या १११ तलाठी सजामध्ये महापालिका व नगरपालिका क्षेत्रातील ४१, तर ग्रामीण क्षेत्रातील ७० तलाठी सजांचा समावेश आहे. आजही एका तलाठ्यांकडे दोन ते तीन गावे आहेत.

आपत्ती काळात शेतीपिकांच्या झालेल्या नुकसानीचे पंचनामे करणे,
सात-बारावरील विविध नोंदी या कामासाठी तलाठ्यांवर ताण येत
होता. ही पदे मंजूर झाल्याने हा ताण कमी होऊन कामेही वेगाने आणि वेळेत होतील.

तालुकानिहाय तलाठी सजा, मंडल संख्या

तालुका  तलाठी सजा  मंडल
उत्तर सोलापूर    २५    ४
बार्शी     ७  ...
पंढरपूर    १२   २
मोहोळ    ८   
सांगोला    १   ...
दक्षिण सोलापूर    ३   
अक्कलकोट    ६   १
मंगळवेढा   ३    १
माळशिरसला    ५   १
माढा    १२    २
करमाळा    ३०    ५

 

 

इतर ताज्या घडामोडी
मराठवाड्यातील चार जिल्ह्यांत पाऊसऔरंगाबाद / जालना : औरंगाबाद, जालना या दोन...
सोलापुरातील कांदा उत्पादकांच्या...सोलापूर : राज्यातील कांदा उत्पादक...
कोयना धरणात ४४.७० टीएमसी उपयुक्त...सातारा  ः कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात...
पुणे जिल्ह्यातील पूर्व भागात पावसाची...पुणे  : जवळपास आठवडाभराच्या विश्रांतीनंतर...
`कुकडी`तून घोड धरणात पाणी सोडण्याची...न्हावरे, जि. पुणे   ः पावसाळा सुरू होऊन...
विद्राव्य खतांना अनुदान देण्याची मागणीकापडणे, जि. धुळे   ः विद्राव्य खतांना...
नगर जिल्ह्यात पाचशे वैयक्तिक पाणीयोजना...नगर  ः पावसाळा सुरू होऊन दीड महिना उलटला;...
सोलापुरात कृषी विभाग शेतकऱ्यांना देणार...सोलापूर : जिल्हा परिषदेच्या कृषी समितीने...
जळगाव बाजार समितीत ज्वारी, बाजरी,...जळगाव  : कृषी उत्पन्न बाजार समितीत...
नाणार रिफायनरी प्रकल्पाच्या समर्थनासाठी...रत्नागिरी  ः नाणार येथे ग्रीन रिफायनरी...
मुख्यमंत्री कोण होणार हे जनता ठरवेल ः...नाशिक  : मुख्यमंत्री कोण होणार हे जनता ठरवेल...
द्राक्ष शेतीत संघटनात्मक कार्यपद्धती...नाशिक : जागतिक द्राक्ष निर्यातीत नाशिक जिल्ह्याचा...
बुलडाणा जिल्ह्यात दुष्काळी स्थितीचा...नांदुरा, जि. बुलडाणा   ः तालुक्यात...
नांदेड, परभणी, हिंगोलीत पाऊसनांदेड : नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील २८...
सांगली जिल्ह्यातील ४६८ गावांमधील...सांगली  : जिल्ह्यात ४६८ गावांमधील गावठाणांचा...
लातूर, उस्मानाबाद, जालना, बीड...लातूर : लातूर, उस्मानाबाद, जालना आणि बीड...
अकोला जिल्ह्यात दुबार पेरणीचे संकटअकोला ः पावसाचा खंड आणि त्यातच दिवसाचे...
जलसंधारण कामासाठी जलशक्ती योजना :...वाल्हे, जि. पुणे  : राज्यात जलयुक्त...
अनधिकृत बंधारे काढण्यासाठी ‘स्वाभिमानी’...नगर  : भंडारदरा धरणापासून ते ओझर...
बचत गटांना प्रोत्साहनासाठी ‘हिरकणी...सोलापूर  : राज्याच्या औद्योगिक आणि आर्थिक...