Agriculture news in marathi In Solapur, pick up cilantro, fenugreek and shepu | Agrowon

सोलापुरात कोथिंबीर, मेथी, शेपूला उठाव

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 30 जून 2020

सोलापूर ः  सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात गतसप्ताहात कोथिंबिर, मेथी, शेपू या भाज्यांना चांगला उठाव मिळाला. त्यांचे दरही तेजीत राहिल्याचे बाजार समितीच्या सूत्रांकडून सांगण्यात आले. 

सोलापूर ः  सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात गतसप्ताहात कोथिंबिर, मेथी, शेपू या भाज्यांना चांगला उठाव मिळाला. त्यांचे दरही तेजीत राहिल्याचे बाजार समितीच्या सूत्रांकडून सांगण्यात आले. 

बाजार समितीच्या आवारात गतसप्ताहात भाज्यांची आवक  रोज प्रत्येकी ८ ते १० हजार पेंढ्यांपर्यत राहिली. भाज्यांची सगळी आवक स्थानिक भागातून झाली. संपूर्ण सप्ताहभर भाज्यांना मागणी राहिली. पण, त्या तुलनेत भाज्यांची आवक नसल्याने दर तेजीत राहिले. त्यातही कोथिंबिर, मेथीला सर्वाधिक उठाव राहिला.

कोथिंबिरीला शंभरपेंढ्यासाठी ८०० ते १२०० रुपये आणि मेथीला ७०० ते १००० रुपये, तर शेपूला  ५०० ते ८०० रुपये असा दर मिळाला. त्याशिवाय या सप्ताहात पुन्हा गवार, भेंडी, टोमॅटो आणि वांग्यांच्या दरातील तेजी कायम राहिली. त्यात गवार आणि भेंडीची आवक रोज  १० ते १५ क्विंटलपर्यंत राहिली. तर, वांगी आणि टोमॅटोची आवक मात्र १०० ते २०० क्विंटलपर्यंत राहिली. 

सोलापूरसह उस्मानाबाद आणि लातूर भागातूनही त्यांची आवक झाली. वांग्यांना प्रतिक्विंटलला किमान  १००० रुपये, सरासरी  २००० रुपये आणि सर्वाधिक २५०० रुपये, टोमॅटोला किमान १००० रुपये, सरासरी २००० रुपये आणि सर्वाधिक ३००० रुपये, गवारीला किमान १००० रुपये, सरासरी २२०० रुपये आणि सर्वाधिक ४००० रुपये, तर भेंडीला किमान १००० रुपये, सरासरी २००० रुपये आणि सर्वाधिक २५०० रुपये असा दर मिळाला. 

कांद्याचे दर स्थिर

कांद्याचे लिलाव अद्यापही आठवड्यातून दोनदाच सोमवार आणि गुरुवारी होत आहेत. कांद्याची स्थानिक भागातील आवक कमी आहे. बहुतांश आवक बाहेरील जिल्ह्यातून आहे. या दोन्ही दिवशी कांद्याची साधारण ५० ते १०० गाड्यापर्यंत आवक होते आहे. दर मात्र स्थिर आहेत. कांद्याला प्रतिक्विंटलला किमान १०० रुपये, सरासरी ४०० रुपये आणि सर्वाधिक ११०० रुपये असा दर मिळाला.


इतर ताज्या घडामोडी
कोल्हापूर बाजार समिती नोकर भरतीविरोधात...कोल्हापूर: येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत...
नगर : मक्‍याला हमीभावापेक्षा कमी दर...नगर ः रब्बी हंगामामध्ये शासनाच्या किमान आधारभूत...
सातारा जिल्ह्यात खरिपाच्या ८२.८५ टक्के...सातारा  ः पावसाचा काहीसा जोर वाढल्याने...
पुणे बाजार समितीसह उपबाजार ...पुणे  ः ‘कोरोना’च्या फैलावामुळे शहरातील...
नगर जिल्ह्यात एक लाख १७ हजार हेक्टरवर...नगर  ः जिल्ह्यात यंदा जुलैच्या पहिल्याच...
अमरावतीत बियाणे कंपनीकडून ९०१ बॅग, २२...अमरावती : जिल्ह्यात सोयाबीन बियाणे उगवणीबाबत १...
कोविड-१९ रुग्णांच्या वास, चव संवेदनांवर...कोविड १९ च्या आजारातून बरे झाल्यानंतरही सुमारे ९०...
खानदेशात दुबार पेरणीसाठी ताग, बाजरी,...जळगाव  ः खानदेशात दुबार पेरणी आटोपली आहे....
जळगावमधील सिंचन प्रकल्पांची कामे...जळगाव  ः जिल्ह्यात तापी व गिरणा नदीवर...
निकृष्ट बियाणेप्रकरणी सर्व कंपन्यांवर...नगर: जिल्ह्यात गेल्या एक महिन्याच्या कालावधीत...
बॅंकांनी पीककर्ज प्रकरणे तत्काळ मार्गी...वर्धा  ः जिल्ह्यात पात्र शेतकऱ्यांपैकी एकही...
गोंदिया जिल्ह्यात युरियाची टंचाईगोंदिया  ः पावसामुळे धान रोवणीला वेग आल्याने...
औरंगाबाद जिल्ह्यात खतांचा पुरवठा सुरळीत...औरंगाबाद : जिल्ह्यात ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर...
अकोल्यात तूर सरासरी ५८०० रुपये क्विंटलअकोला  ः  येथील कृषी उत्पन्न बाजार...
सांगली जिल्ह्यातील तीन केंद्रांवर २०२३...सांगली  ः जिल्ह्यात हमीभावाने मका खरेदीसाठी...
रत्नागिरी जिल्ह्यात भात, नाचणी पिकासाठी...रत्नागिरी  : रत्नागिरी जिल्ह्यात भात, नाचणी...
आरोग्यदायी दालचिनीमसाल्यांच्या पदार्थांत, घरात मसाला करताना...
कोकण, कोल्हापूर पट्ट्यात मुसळधार...कोकण व कोल्हापूर भागावर १००२ तर महाराष्ट्रावर...
कोल्हापुरात दिड हजार, खते, बियाणे...कोल्हापूर  : बियाण्यांच्या उगवणीप्रश्नी...
सांगली जिल्ह्यात दोन लाख १९ हजार हेक्‍...सांगली : जिल्ह्यात पावसांचा खंड असला तरी  ...