नवी दिल्ली : प्रजासत्ताक दिनी ट्रॅक्टर संचलनाद्वारे कृषी कायद्यांविरोधात शक्तीप्रदर्शनावर
बाजारभाव बातम्या
सोलापुरात हिरवी मिरची, गवार, घेवड्याला उठाव
सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात गतसप्ताहात हिरवी मिरची, गवार, घेवड्याला चांगला उठाव मिळाला. त्यांचे दरही टिकून राहिल्याचे बाजार समितीच्या सूत्रांकडून सांगण्यात आले.
सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात गतसप्ताहात हिरवी मिरची, गवार, घेवड्याला चांगला उठाव मिळाला. त्यांचे दरही टिकून राहिल्याचे बाजार समितीच्या सूत्रांकडून सांगण्यात आले.
बाजार समितीच्या आवारात गतसप्ताहात प्रतिदिन हिरव्या मिरचीची आवक २० ते ४० क्विंटल, गवार आणि घेवड्याची आवक मात्र अगदीच ५ ते १० क्विंटल अशी राहिली. ही सर्व आवक स्थानिक भागातूनच झाली.
आवकेच्या तुलनेत मागणी अधिक राहिल्याने दरातही तेजी आहे. हिरव्या मिरचीला प्रतिक्विंटलला किमान १५०० रुपये, सरासरी २००० रुपये आणि सर्वाधिक २५०० रुपये, घेवड्याला किमान ७०० रुपये, सरासरी १५०० रुपये आणि सर्वाधिक २००० रुपये, तर गवारीला प्रतिक्विंटलला किमान १००० रुपये, सरासरी १५०० रुपये आणि सर्वाधिक ३००० रुपये असा दर मिळाला.
वांगी, टोमॅटो यांचे दर काहीसे स्थिर राहिले. त्यांची आवकही रोज ४० ते ७० क्विंटलपर्यंत राहिली. वांग्यांना प्रतिक्विंटलला किमान १००० रुपये, सरासरी २००० रुपये आणि सर्वाधिक ३००० रुपये आणि टोमॅटोला किमान २०० रुपये, सरासरी ७०० रुपये आणि सर्वाधिक १५०० रुपये दर मिळाला. भाजीपाल्यामध्ये मेथी, शेपू, कोथिंबीर यांचे दरही पुन्हा स्थिर राहिले. मेथीला शंभर पेंढ्यांसाठी ४०० ते ५०० रुपये, शेपूला २५० ते ३०० रुपये, कोथिंबिरीला ३०० ते ४०० रुपये दर मिळाला.
सोयाबीन, कांद्याला उठाव
कांद्याची आवक काहीशी कमीच आहे. रोज १० ते ३० गाड्यांपर्यंत आवक आहे. कांद्याला प्रतिक्विंटलला किमान २०० रुपये, सरासरी २५०० रुपये आणि सर्वाधिक ७००० रुपये, तर भुसार बाजारात सोयाबीनलाही चांगला उठाव मिळतो आहे.
सोयाबीनची आवकही स्थानिक भागातूनच होते आहे. सोयाबीनची रोज ५० क्विंटलपर्यंत आवक आहे. सोयाबीनला प्रतिक्विंटलला किमान ३००० रुपये, सरासरी ४००० रुपये आणि सर्वाधिक ४३०० रुपये असा दर मिळाला.
- 1 of 65
- ››