Agriculture news in marathi In Solapur, pickup tomatoes, brinjals and green chillies | Agrowon

सोलापुरात टोमॅटो, वांगी, हिरव्या मिरचीला उठाव

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 7 जुलै 2020

सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात गतसप्ताहात टोमॅटो, वांगी, हिरव्या मिरचीची आवक कमी राहिली. पण, मागणी असल्याने  चांगला उठाव मिळाला. त्याशिवाय मेथी, कोथिंबिरीचे दरही तेजीत राहिले. 

सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात गतसप्ताहात टोमॅटो, वांगी, हिरव्या मिरचीची आवक कमी राहिली. पण, मागणी असल्याने  चांगला उठाव मिळाला. त्याशिवाय मेथी, कोथिंबिरीचे दरही तेजीत राहिले. 

बाजार समितीत आद्यापही शेतकरी ते ग्राहक अशी विक्री सुरू आहे. गतसप्ताहात रोज वांग्यांची ३० ते ५० क्विंटलपर्यंत आणि हिरव्या मिरचीची १० ते १५ क्विंटलपर्यंत आवक झाली. त्यांची सर्व आवक स्थानिक भागातूनच झाली. वांग्यांना प्रतिक्विंटलाला किमान १००० रुपये, सरासरी २००० रुपये आणि सर्वाधिक ३००० रुपये दर मिळाला. हिरव्या मिरचीला किमान १००० रुपये, सरासरी २००० रुपये आणि सर्वाधिक २५०० रुपये असा दर मिळाला. त्याशिवाय टोमॅटो, दोडका यांचे दरही काहीसे तेजीत राहिले. टोमॅटोला किमान १५०० रुपये, सरासरी २००० रुपये आणि सर्वाधिक ३५०० रुपये, तर दोडक्याला किमान ७०० रुपये, सरासरी १५०० रुपये आणि सर्वाधिक १८०० रुपये असा दर मिळाला. 

भाज्यांमध्ये मेथी, कोथिंबीर आणि शेपूला उठाव मिळाला. त्यांची आवकही रोज प्रत्येकी ५ ते ७ हजार पेंढ्यांपर्यंत झाली. मेथीला शंभर पेंढ्यांसाठी ६०० ते १५०० रुपये, कोथिंबिरीला ८०० ते १२०० रुपये आणि शेपूला ५०० ते ८०० रुपये दर मिळाला. कांद्यांची आवक आणि लिलाव सप्ताहातून फक्त सोमवार आणि गुरुवार दोनच दिवस होतात. त्यातही कांद्याची आवक तुलनेने कमीच आहे. कांद्यांना प्रतिक्विंटलला किमान २०० रुपये, सरासरी ७०० रुपये आणि सर्वाधिक १००० रुपये असा दर मिळाला.


इतर बाजारभाव बातम्या
नाशिकमध्ये हिरव्या मिरचीची मागणी, दर...नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
नगरमध्ये घेवडा, वांग्यांच्या दरात...नगर ः नगर कृषी उत्पन्न बाजार समितीत मागील...
सोलापुरात भाज्यांना उठाव, वांगी,...सोलापूर ः कोरोनामुळे दहा दिवसांचा लॅाकडाऊन आहे....
पुण्यात भाजीपाल्याचा पुरवठा संतुलित; दर...पुणे ः गुलटेकडी येथील पुणे कृषी उत्पन्न बाजार...
खानदेशात केळी दरांवर दबावजळगाव  ः खानदेशात केळी दरांवर दबाव कायम आहे...
परभणीत भेंडी ८०० ते १२०० रुपये...परभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे, भाजीपाला...
राज्यात कांद्याला १०० ते १००० रूपये दर सोलापुरात कांद्याला सर्वाधिक १००० रुपये दर...
सणासुदीदरम्यान फुलांना मागणी वाढण्याचा...पुणे  : मार्चपासून राज्यात ‘कोरोना’चे संकट...
नाशिकमध्ये वांगी प्रतिक्विंटल २००० ते...नाशिक : ‘‘येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
जळगावात आले २८०० ते ४४०० रुपये...जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मंगळवारी (...
अंदरसुल उपबाजारात कांदा विक्रीसाठी...नाशिक : येवला कृषी उत्पन्न बाजार समितीचा मुख्य...
नगरला फ्लॉवर, वांग्यांच्या दरात सुधारणा नगर : नगर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
नागपुरात तुरीच्या दरातील सुधारणा कायमनागपूर ः कळमणासह विदर्भातील बहूतांश बाजार...
पुण्यात सर्वच भाजीपाल्यांचे दर स्थिरपुणे ः गुलटेकडी येथील पुणे कृषी उत्पन्न बाजार...
औरंगाबादमध्ये लसूण ३६०० ते ५२०० रूपये...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
खानदेशात बाजरी दरात सुधारणाजळगाव  ः खानदेशातील बाजार समित्यांमध्ये...
परभणीत दोडका २५०० ते ४००० रुपये...परभणी  ः येथील पाथरी रस्त्यावरील फळे...
राज्यात हिरवी मिरची १००० ते ५००० हजार...औरंगाबादेत प्रतिक्विंटल १००० ते १५०० रुपये...
नाशिकमध्ये ढोबळी मिरची सरासरी ५६२५ रुपयेनाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
नारायणगांव बाजारात टोमॅटो दरात सुधारणा पुणे: कोरोना संकटात राज्यात विविध ठिकाणी सुरु...