Agriculture news in Marathi In Solapur, the price of Ghewda and eggplant went up again | Agrowon

सोलापुरात घेवडा, वांग्याचे दर पुन्हा वधारले

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 27 ऑक्टोबर 2020

सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात गतसप्ताहात वांगी, घेवड्याने पुन्हा एकदा दराची उसळी घेतली. गेल्या काही आठवड्यांपासून त्यांना चांगला उठाव मिळतो आहे. या सप्ताहातही तीच परिस्थिती राहिली. वांग्याला सर्वाधिक ८००० रुपये क्विंटल आणि घेवड्याला ५००० हजार रुपये इतका दर मिळाल्याचे बाजार समितीच्या सूत्रांकडून सांगण्यात आले.

सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात गतसप्ताहात वांगी, घेवड्याने पुन्हा एकदा दराची उसळी घेतली. गेल्या काही आठवड्यांपासून त्यांना चांगला उठाव मिळतो आहे. या सप्ताहातही तीच परिस्थिती राहिली. वांग्याला सर्वाधिक ८००० रुपये क्विंटल आणि घेवड्याला ५००० हजार रुपये इतका दर मिळाल्याचे बाजार समितीच्या सूत्रांकडून सांगण्यात आले.  

गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या आवक आणि दरात सातत्याने चढ-उतार होतो आहे. पण यासप्ताहात वांग्याच्या दराने चांगलाच उच्चांक केला. वांगी, घेवड्याची सर्वाधिक आवक स्थानिक भागातूनच झाली. बाहेरील आवक अगदीच कमी राहिली. वांग्याला प्रतिक्विंटलला किमान २५०० रुपये, सरासरी ५००० रुपये आणि सर्वाधिक ८००० रुपये तर घेवड्याला किमान २००० रुपये, सरासरी ३००० रुपये आणि सर्वाधिक ५००० रुपये असा दर मिळाला. त्याशिवाय बटाटा, सिमला मिरची यांचेही दर काहीसे स्थिर राहिले.

बटाट्याला प्रतिक्विंटलला किमान १८०० रुपये, सरासरी ३००० रुपये आणि सर्वाधिक ४००० रुपये तर सिमला मिरचीला किमान १८०० रुपये, सरासरी २००० रुपये आणि सर्वाधिक ३००० रुपये दर मिळाला. गवार, भेंडी, हिरवी मिरचीलाही बऱ्यापैकी दर राहिले. गवारला प्रतिक्विंटलला किमान ३५०० रुपये, सरासरी ४००० रुपये आणि सर्वाधिक ६००० रुपये, भेंडीला किमान ७०० रुपये, सरासरी ४००० रुपये आणि सर्वाधिक ६५०० रुपये तर हिरव्या मिरचीला किमान १५०० रुपये, सरासरी २००० रुपये आणि सर्वाधिक २८०० रुपये असा दर मिळाला.

कांदाही वधारलेलाच
या सप्ताहात कांद्यालाही सर्वाधिक ७५०० रुपयांपर्यंत दर मिळाला. कांद्याची आवक मात्र जेमतेम २० ते ३० गाड्या प्रतिदिन अशी राहिली. शिवाय ही सर्व आवक बाहेरील जिल्ह्यातून झाली. गेल्या दोन आठवड्यापासून कांद्याच्या दरात मोठी सुधारणा झाली आहे. कांद्याला प्रतिक्विंटलला किमान २०० रुपये, सरासरी २५०० रुपये आणि सर्वाधिक ७५०० रुपये असा दर मिळाला.


इतर ताज्या घडामोडी
नाशिकमध्ये ‘स्वाभिमानी’चा रात्रभर...नाशिक  : दिल्लीत गेल्या सात दिवसांपासून...
सोलापूर जिल्ह्यातील ६५८...सोलापूर : जिल्ह्यातील मुदत संपलेल्या ६५८...
कसमादेत बायोगॅस संयंत्र उभारण्यास पसंती देवळा, जि. नाशिक : मृत कोंबडी पक्षांची...
नांदेडमध्ये ‘पणन’कडून कापसाची २६ हजार...नांदेड : महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादक...
कृषी कायद्यांविरोधात जागरण आंदोलनपुणे ः केंद्र सरकारच्या नवीन कृषी आणि पणन...
परभणीत केंद्र सरकारविरुद्ध निदर्शनेपरभणी : शेतकरीविरोधी कायदे रद्द करण्याच्या...
निम्न दुधनाच्या दोन्ही कालव्यात पाणीपरतूर, जि. जालना ः ‘‘रब्बी हंगामातील...
औरंगाबादमध्ये `स्वाभिमानी’चे...औरंगाबाद : दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला पाठिंबा...
सोलापुरात ‘स्वाभिमानी’चा जागर सोलापूर : दिल्ली येथे सुरू असलेल्या शेतकरी...
धुळे- नंदुरबार मतदारसंघात पटेलांपुढे...धुळे ः विधान परिषदेच्या धुळे- नंदुरबार...
आश्वासनानंतर शेतकरी संघटनेचे आंदोलन...पुणे ः राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये...
साताऱ्यात स्वाभिमानी संघटनेचे रात्रभर...सातारा : कृषी विधेयकाविरोधात पंजाब आणि हरियाना...
सिंचनासाठी ‘वान’वरून जलवाहिनी उभारावीतेल्हारा, जि. अकोला ः शासनाने अगोदर सिंचनासाठी...
वहितीदारांना ‘गोपीनाथ मुंडे शेतकरी...नांदेड : ‘‘शेती करताना विविध कारणांनी शेतकऱ्यांचा...
बीड जिल्ह्यात अडीच लाखांवर शेतकरी...बीड ः महाविकास आघाडी सरकारच्या महत्वकांक्षी...
काँग्रेसने ५८ वर्षांनी भेदला भाजपचा गडनागपूर : नागपूर पदवीधर मतदारसंघात ५८ वर्षांनी...
लाडांच्या घरात ५८ वर्षांनंतर आमदारकीसांगली : तास धरून काम करणाऱ्या हाडाच्या...
जमिनीची सुपीकता जपण्यासाठी जैवविविधतेचे...परभणी ः मातीची पर्यायाने शेत जमिनीची सजीवता,...
आघाडीने चारली भाजपला धूळपुणे ः महाविकास आघाडी म्हणून एकत्रित लढलेल्या...
रत्नागिरीत जमिनीमध्ये नत्र, स्फुरदचे...रत्नागिरी ः जिल्ह्यातील जांभ्या जमिनीत नत्रासह...