सोलापुरात बेदाण्याला प्रतिकिलोला २६५ रुपये दर 

सोलापूर बाजारात या सप्ताहात गुरुवारी (ता. ८) लिलावात ३९ टन बेदाण्याची आवक झाली. त्यापैकी १९ टन बेदाण्याचा लिलाव झाला. त्यात बेदाण्याला सर्वाधिक २६५ रुपये प्रतिकिलोचा दर मिळाला. तर सरासरी १८० रुपये इतका दर मिळाला.
In Solapur, the price of raisins is Rs. 265 per kg
In Solapur, the price of raisins is Rs. 265 per kg

सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये या सप्ताहात गुरुवारी (ता. ८) लिलावात ३९ टन बेदाण्याची आवक झाली. त्यापैकी १९ टन बेदाण्याचा लिलाव झाला. त्यात बेदाण्याला सर्वाधिक २६५ रुपये प्रतिकिलोचा दर मिळाला. तर सरासरी १८० रुपये इतका दर मिळाला. 

कुंभारी येथील श्रीहरी कनकुंटला या शेतकऱ्यांस २६५ रुपये दर मिळाला. दर गुरुवारी आठवड्यातून एकदाच बेदाण्याचे लिलाव होतात. या आठवड्यात झालेल्या या बेदाणा लिलावातून या दिवशी ३ कोटी ५१ लाख रुपयांची उलाढाल झाल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांकडून देण्यात आली. 

पंडित अंबारे यांच्याकडे ६६८५ किलो बेदाणा आवक झाला असून ३३४० किलोची विक्री झाली. ४० ते २२० रुपयांचा दर मिळाला. रक्षा ट्रेडिंग कंपनीकडे ६१०५ किलो आवक झाली असून ३ हजार ४० किलोची विक्री झाली. ६० ते २३५ रुपयांचा दर मिळाला. विश्वजित हेले यांच्याकडे २७४४ किलो आवक झाली असून १३७२ किलोची विक्री झाली असून ४० ते २६५ रुपयांचा दर मिळाला. बसवेश्वर ट्रेडर्सकडे ४४२४ किलो आवक असून २२१२ किलो विक्री झाली. ५० ते २३३ रुपये किलोचा दर मिळाला. व्ही. आर. बिराजदार यांच्याकडे ४९९० किलो आवक असून २४९५ किलो विक्री झाली. ६० ते २४६ किलोस दर मिळाला. रावसाहेब बिराजदार यांच्याकडे ११२४ किलो आवक असून ५६० किलोची विक्री झाली असून ४० ते २३२ रुपयाचा दर मिळाला.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com