सोलापूरात कृत्रिम पावसाचा प्रयोग यशस्वी

सोलापूरात कृत्रिम पावसाचा प्रयोग यशस्वी
सोलापूरात कृत्रिम पावसाचा प्रयोग यशस्वी

सोलापूर - सोलापुरात मागील चार दिवसांपासून कृत्रिम पावसाचा प्रयोग करण्यात येत आहे. रडार च्या माध्यमातून आकाशातील पाण्याच्या ढगांचा वेध घेऊन क्षार फवारले जात आहेत. त्या प्रयोगाला बुधवारी, यश आले आणि सोलापूरात तब्बल दोन - अडीच तास हलका पाऊस पडला. त्यामुळे वाया जात असलेल्या खरीप पिकांना दिलासा मिळाला. मागील ३०-३५ दिवसांपासून सोलापूर जिल्ह्यात पावसाने दडी मारली. त्यामुळे अक्कलकोट, माढा, करमाळा, सांगोला, मोहोळ, मंगळवेढा, बार्शी या तालुक्यांतील फुलोऱ्यात आलेली खरीप पिके वाया जात आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने उडीद, मूग, सोयाबीन या पिकांचा समावेश आहे.

सोलापूरच्या २०० किलोमीटर परिसरात सप्टेंबर महिन्यापर्यंत २४० तास कृत्रिम पावसाचा प्रयोग होतोय. त्यातील आता सुमारे ७२ तास संपले आहेत. मात्र, मागील दोन-तीन दिवसांपासून सोलापूर परिसरात पाण्याचे ढग निर्माण होत आहेत. कृत्रिम पाऊस पडण्याची परिस्थिती निर्माण झाल्याने दोन 'एअरक्राफ्ट' विमानांच्या सहाय्याने त्या ढगांवर क्षारांची फवारणी करण्यात येत आहे.

कृत्रिम पावसाच्या सर्व प्रक्रिया पार पाडल्या आहेत. क्षारांची फवारणीही केली असून पडलेला व पडणारा पाऊस कृत्रिम कि नैसर्गिक हे आत्ताच सांगणे कठिण आहे. परंतु, कृत्रिम पावसासाठी बुधवारी, सकाळपासून वातावरण पोषक होते. त्याची माहिती मिळताच अवकाशातील पाण्याच्या ढगांवर सर्व प्रयोग केले.  - डॉ. शिवसाई दिक्षित, वैज्ञानिक

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com