agriculture news in marathi Solapur Sanction of 970 revised schemes of Jaljivan Mission in the district | Agrowon

सोलापूर जिल्ह्यात जलजीवन मिशनच्या सुधारित ९७० योजनांना मंजुरी

टीम अॅग्रोवन
रविवार, 14 नोव्हेंबर 2021

सोलापूर जिल्ह्याच्या विविध भागांतील लोकप्रतिनिधींच्या मागणीनुसार जल जीवन मिशनचा आराखडा सुधारित केला असून, या सुधारित आराखड्याप्रमाणे ९७० योजनांना मंजुरी देण्यात आली आहे.

सोलापूर ः जिल्ह्याच्या विविध भागांतील लोकप्रतिनिधींच्या मागणीनुसार जल जीवन मिशनचा आराखडा सुधारित केला असून, या सुधारित आराखड्याप्रमाणे ९७० योजनांना मंजुरी देऊन हा प्रस्ताव अंतिम मंजुरीसाठी शासनाकडे सादर करण्यात आल्याची माहिती पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी शुक्रवारी (ता. १२) दिली. 

पालकमंत्री भरणे यांनी जल जीवन मिशनची आढावा बैठक घेतली. त्यानंतर त्यांनी ही माहिती दिली. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता दीपक कोळी व अन्य अधिकारी उपस्थित होते.

पालकमंत्री भरणे म्हणाले, ‘‘जलजीवन मिशन हे आपल्यासाठी मिशन आहे. त्याच्या मंजुरीनंतर वेळेत ही कामे पूर्ण होतील, यासाठी त्या त्या अधिकाऱ्यांनी लक्ष दिले पाहिजे,’’ असे सांगितले. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी स्वामी यांनी जल जीवन मिशन अंतर्गत जिल्ह्यातील ३८६० शाळा पैकी ६५९९ शाळांना व ४१८० पैकी ४१४६ अंगणवाडी बालवाडी यांना नळजोडणी दिली असून, त्यामुळे शाळा अंगणवाडी व बालवाड्यांना नवीन नळजोडणी देण्याबाबत जिल्हा महाराष्ट्रात अग्रेसर असल्याचे सांगितले.  जिल्ह्यातील जनजीवन मिशन अंतर्गत ८७४ योजनांचे आराखडे मंजूर आहेत. त्यापैकी ५८ योजनांची प्रशासकीय मंजुरी प्राप्त झाली असून, त्या ५८ योजनांची निविदा प्रक्रिया सुरू आहे व ही कामे लवकरच सुरू होणार असल्याची माहिती ग्रामीण पाणीपुरवठा योजनांचे कार्यकारी अभियंता कोळी यांनी दिली.


इतर ताज्या घडामोडी
खानदेशात कांदा पिकाची दहा हजार हेक्टरवर...जळगाव ः खानदेशात कांदा पिकाची लागवड सुरूच आहे....
‘गिरणा’चे वस्त्रहरण करणाऱ्यांवर कारवाई...चाळीसगाव, जि. जळगाव ः जळगाव जिल्ह्याची जीवनवाहिनी...
चांदवडमध्ये कांदा लिलाव सुरूनाशिक : अकरा जानेवारीपासून सोमवार (ता. १७) पर्यंत...
ग्रामपंचायतींना इंटरनेट सेवा त्वरित...सोलापूर : जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायतींना...
ऊस तोडणीस विलंब; शेतकऱ्यांत चिंतासातारा ः अवेळी झालेल्या पाऊस, अनेक कारखान्यांची...
पुणे जिल्हा परिषदेवर प्रशासक?पुणे ः जिल्हा परिषदेसह जिल्ह्यातील विविध पंचायत...
गाव कोरोनामुक्त ठेवून ५० लाख जिंकापुणे ः कोरोनाच्या प्रादुर्भावापासून गावमुक्तीसाठी...
पाच जिल्ह्यांत १४ लाख हेक्‍टरवर रब्बीची...लातूर : विभागातील लातूर, उस्मानाबाद, परभणी,...
मिनी विधानसभेच्या निवडणुका मार्चमध्ये...मिनी विधानसभा समजल्या जाणाऱ्या राज्यातील १४...
गरज असलेल्या भागाला प्राधान्याने पाणी ः...नाशिक : मोठ्या प्रकल्पांमधील २०२१-२२ करिता...
पंचनामे झाले, नुकसान भरपाई कधी मिळणार?सांगली ः जिल्ह्यात डिसेंबर महिन्याच्या पहिल्या...
औरंगाबादमध्ये टोमॅटो १६०० रुपये क्विंटलऔरंगाबाद ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
नारळ पिकावर बोंडर नेस्टिंग पांढरी...डिसेंबर २०११ मध्ये फ्लोरिडा विद्यापीठातील ...
युवकांनी ग्रामीण विकासाचे शिलेदार... नाशिक : ‘‘आधुनिक काळातील युवकांनी उच्च...
पदोन्नतीतील कृषिसहसंचालकात सोलापूरच्या...सोलापूर ः राज्याच्या कृषी विभागाने वर्ग एकमधील...
‘पांडुरंग’चे भालेकर यांना सर्वोत्कृष्ट ...सोलापूर ः मांजरीच्या वसंतदादा शुगर...
नाशिक : डांगसौंदाणे येथे उपबाजार आवार...नाशिक : सटाणा बाजार समितीच्या कार्यक्षेत्रातील...
पाइप कालव्याद्वारे ६० टक्के पाणी बचत...मालेगाव, जि. नाशिक : दहिकुटे लघू पाटबंधारे...
जळगाव ः भरडधान्य खरेदी खानदेशात रखडतच जळगाव ः  खानदेशात भरडधान्य खरेदी मागील २०...
नांदेडमध्ये खरेदीदारांविरोधात अडत्यांचा...नांदेड : हळद खरेदीदार अडत्यांना दोन...