शेतमाल सोलापूरसह पुणे, मुंबईच्या सोसायट्यांत; आत्माचा पुढाकार
शेतमाल सोलापूरसह पुणे, मुंबईच्या सोसायट्यांत; आत्माचा पुढाकार

शेतमाल सोलापूरसह पुणे, मुंबईच्या सोसायट्यांत; आत्माचा पुढाकार

आम्ही तालुकास्तरावर संबंधित शेतकरी गट, शेतकरी कंपन्यांकडून माहिती घेत आहोत. प्राथमिक माहितीनुसार भाजीपाला आणि फळभाज्या पुरेशा प्रमाणात उपलब्ध आहेत. आता त्याच्या पुरवठ्याचे नियोजन करत आहोत. - मदन मुकणे, उपसंचालक, आत्मा, सोलापूर

सोलापूर : कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाच्या शहरांतील सोसायट्यांत पुरविण्यासाठी कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणेने (आत्मा) पुढाकार घेतला आहे. जिल्ह्यातील शेतकरी, शेतकरी गट, शेतकरी कंपनी यांच्याकडे उपलब्ध भाजीपाला, फळभाज्यांच्या नोंदी करून आधी सोलापूर आणि त्यानंतर प्रमुख बाजारपेठा असलेल्या पुणे, मुंबईकडे पुरवठा करण्याचे नियोजन केले आहे.    गेल्या दोन दिवसांपासून पुणे, मुंबईच्या बाजार समितीतील व्यवहार विस्कळीत झाले आहेत. सोलापुरातही अशीच स्थिती आहे. शिवाय गर्दीही होऊ द्यायची नाही, अशी परिस्थिती असल्याने सोलापुरातून सोलापूरसह पुणे, मुंबईतील प्रमुख सोसायट्यांमध्ये शेतकरी गट, शेतकरी कंपन्याकंडून थेट भाजीपाला आणि फळभाज्या पुरवठा करता येऊ शकतो, याचे नियोजन करण्यात येत आहे.  जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बसवराज बिराजदार, आत्माचे प्रकल्प उपसंचालक मदन मुकणे यांनी त्यासाठी तालुकास्तरावरील आत्माचे व्यवस्थापक आणि सहायक व्यवस्थापकांना त्यांच्या त्यांच्या भागातील शेतकरी गट, शेतकरी कंपन्यांशी संपर्क करून उपलब्ध भाजीपाला, फळे, फळभाज्यांची यादी करण्याचे काम सुरू केले आहे. शेतकरी गट, कंपनी, पुरवठा होऊ शकणारा भाजीपाला, फळभाज्या, त्याचा दर यासंबंधीची माहिती असणारा फॅार्मच शेतकरी गट आणि कंपन्यांना दिला आहे. या माध्यमातून शेतकऱ्यांना शेतमाल विक्रीची व्यवस्था निर्माण झाली आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com