agriculture news in marathi solapur to send vegetables to pune, mumbai | Agrowon

शेतमाल सोलापूरसह पुणे, मुंबईच्या सोसायट्यांत; आत्माचा पुढाकार

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 27 मार्च 2020

आम्ही तालुकास्तरावर संबंधित शेतकरी गट, शेतकरी कंपन्यांकडून माहिती घेत आहोत. प्राथमिक माहितीनुसार भाजीपाला आणि फळभाज्या पुरेशा प्रमाणात उपलब्ध आहेत. आता त्याच्या पुरवठ्याचे नियोजन करत आहोत.
- मदन मुकणे, उपसंचालक, आत्मा, सोलापूर

सोलापूर : कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाच्या शहरांतील सोसायट्यांत पुरविण्यासाठी कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणेने (आत्मा) पुढाकार घेतला आहे. जिल्ह्यातील शेतकरी, शेतकरी गट, शेतकरी कंपनी यांच्याकडे उपलब्ध भाजीपाला, फळभाज्यांच्या नोंदी करून आधी सोलापूर आणि त्यानंतर प्रमुख बाजारपेठा असलेल्या पुणे, मुंबईकडे पुरवठा करण्याचे नियोजन केले आहे.   

गेल्या दोन दिवसांपासून पुणे, मुंबईच्या बाजार समितीतील व्यवहार विस्कळीत झाले आहेत. सोलापुरातही अशीच स्थिती आहे. शिवाय गर्दीही होऊ द्यायची नाही, अशी परिस्थिती असल्याने सोलापुरातून सोलापूरसह पुणे, मुंबईतील प्रमुख सोसायट्यांमध्ये शेतकरी गट, शेतकरी कंपन्याकंडून थेट भाजीपाला आणि फळभाज्या पुरवठा करता येऊ शकतो, याचे नियोजन करण्यात येत आहे. 

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बसवराज बिराजदार, आत्माचे प्रकल्प उपसंचालक मदन मुकणे यांनी त्यासाठी तालुकास्तरावरील आत्माचे व्यवस्थापक आणि सहायक व्यवस्थापकांना त्यांच्या त्यांच्या भागातील शेतकरी गट, शेतकरी कंपन्यांशी संपर्क करून उपलब्ध भाजीपाला, फळे, फळभाज्यांची यादी करण्याचे काम सुरू केले आहे. शेतकरी गट, कंपनी, पुरवठा होऊ शकणारा भाजीपाला, फळभाज्या, त्याचा दर यासंबंधीची माहिती असणारा फॅार्मच शेतकरी गट आणि कंपन्यांना दिला आहे. या माध्यमातून शेतकऱ्यांना शेतमाल विक्रीची व्यवस्था निर्माण झाली आहे. 


इतर बातम्या
पुण्यात पोलिस बंदोबस्तात बाजार समिती...पुणे : कोरोनामुळे शहरात लॉकडाऊन असतानाही...
पुणे बाजार समिती आजपासून सुरु; मात्र...पुणे : कोरोना विषाणूमुळे सुरू असलेल्या...
देशातील रुग्णसंख्या ९०० च्या घरातनवी दिल्ली : महासत्ता अमेरिकेसह संपूर्ण जगात...
देशातील वस्त्रोद्योगाला दोन लाख कोटींचा...जळगाव ः देशात शेतीनंतर रोजगाराचा व आर्थिक...
राज्यातील कोरोना रुग्णाची संख्या १८१;...मुंबई : राज्यात शनिवारी (ता.२९) आणखी २८ कोरोना...
मुंबई बाजार समितीत आज व्यापाऱ्यांचा...मुंबई : राज्य शासनाच्या आदेशामुळे सुरू...
फळे, भाजीपाला पुरवठ्यासाठी राज्यभर...पुणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ग्राहकांना फळे व...
‘कोरोना’चा सामना करण्यासाठी ११ हजार...अकोला  ः कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे...
नगर जिल्हा बॅंकेने दिले कर्जवसुलीचे...नगर ः कोरोना व्हायरसचा संसर्ग कमी करण्यासाठी...
वाशीममधील कृषी निविष्ठा केंद्रे सुरू...वाशीम : ‘कोरोना’ विषाणूच्या पार्श्वभूमीवर...
नगर, पुणे, सोलापूरात हजारवर वाहतूक...पुणे ः शहरांमध्ये भाजीपाला, फळे, दुध अशा...
वऱ्हाडातील ६५ हजारांवर नागरिक गावी परतलेअकोला ः रोजगार, नोकरीच्या निमित्ताने शहरांमध्ये...
अकोल्यातील दिड हजारांवर शेतकऱ्यांची...अकोला ः कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव...
जिल्हा परिषदेचे दीड लाख कर्मचारी देणार...नगर ः कोरोना संसर्गाबाबत उपाययोजना करण्यासाठी...
राज्यात पुर्वमोसमी पावसाचा आजही अंदाज पुणे : गेल्या काही दिवसांपासून राज्यात पुर्वमोसमी...
नगर जिल्ह्यात तिसऱ्या दिवशी पावसाचा...नगर  ः नगर जिल्ह्यामध्ये सलग तिसऱ्या दिवशी...
शेतमाल निर्यातीसाठी वाणिज्य मंत्रालयाने...नागपूर  ः राज्यात जारी करण्यात आलेल्या...
औरंगाबाद, जालना जिल्ह्यात पाऊस औरंगाबाद/जालना: दोन्ही जिल्ह्यातील जवळपास ६७...
कलिंगड, खरबूज उत्पादक शेतकऱ्यांना फटकासोलापूर ः खास उन्हाळी हंगाम डोळ्यासमोर ठेवून...
राज्य तलाठी संघांकडून एक दिवसाचे वेतन...परभणी ः कोरोना बाधितांच्या मदतीसाठी तलाठी, मंडल...