सोलापूर रेल्वे मंडलातील कामांना गती देणार : खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर

सोलापूर रेल्वे मंडलातील कामांना गती देणार : खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर
सोलापूर रेल्वे मंडलातील कामांना गती देणार : खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर

पंढरपूर, जि. सोलापूर  : सोलापूर मंडलातील प्रवासी आणि जनतेच्या सोयीसाठी रेल्वे प्रशासनाकडून सर्व सुविधा मिळाव्यात यासाठी आवश्यक व प्रलंबित कामांना गती देणार असल्याचे खासदार रणजीतसिंह नाईक-निबांळकर यांनी सांगितले. माढा लोकसभा मतदारसंघातील रेल्वे बाबतच्या समस्याबांबत पंढरपुरात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीस जिल्हा परिषद अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे, आमदार बबनराव शिंदे, आमदार प्रशांत परिचारक, अकलूजचे सरपंच शिवतेजसिंह मोहिते- पाटील, रेल्वेचे महाप्रबंधक संजीव मित्तल, मंडल रेलप्रबंधक शैलेश गुप्ता, अप्पर मंडल रेल्वे प्रबंधक सहर्ष वाजपेयी, वरिष्ठ वाणिज्य प्रबंधक प्रदीप हिरडे, वरिष्ठ मंडल प्रबंधक पी. के चतुर्वेदी, मंडल सुरक्षा आयुक्त मिथुन सोनी यांच्यासह रेल्वे प्रशासनातील अधिकारी उपस्थित होते. खासदार नाईक- निबांळकर म्हणाले, नागरिकांचा रेल्वेचा प्रवास सुखकर व्हावा, यासाठी रेल्वे प्रशासनाकडून सोयी, सुविधा मिळण्याबाबतच्या सूचना संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. तसेच फलटण-पंढरपूर नव्याने प्रस्तावित रेल्वेमार्गासाठी ५० टक्के रक्कम देण्याबाबतचे केंद्रीय रेल्वे मंत्रालयाकडून राज्य शासनाकडे मागणी करण्यात आली आहे. रेल्वेच्या काही अंडरग्राऊंड ब्रीज आहेत, त्याठिकाणी पावसाळ्यात पाणी साठते. वाहतूक व्यवस्थेला अडचणी निर्माण होतात, यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना या वेळी खासदार नाईक-निंबाळकर यांनी दिल्या. मुंबई-पंढरपूर रेल्वे सांगोल्यापर्यंत आणा यावेळी आमदार बबनराव शिंदे यांना कुर्डूवाडी येथील रेल्वे गेटवर ओव्हर ब्रीज, रेल्वे अंडर ग्राउंड आदींबाबतच्या समस्या मांडून निवेदन दिले. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अनिरुध कांबळे, आमदार प्रशांत परिचारक यांनी ही आपल्या मागण्यांचे निवेदन दिेले. या बैठकीत करमाळा, माढा, सांगोला, माळशिरस तसेच पंढरपूर येथील रेल्वे प्रवाशांनीही मागण्यांचे निवेदन दिले. त्यामध्ये मुंबई-पंढरपूर रेल्वे सांगोला रेल्वे स्टेशन येथून सुरू करावी, तसेच रेल्वे थांबे, जादा गाड्या याबाबत मागणी करण्यात आली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com