सोलापुरात १५ मेपर्यंत कडक लॅाकडाउन

सोलापूर ः कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात लॅाकडाऊन लागलेला असताना आता पुन्हा एकदा ८ मेपासून १५ मेपर्यंत कडक लॅाकडाऊनची घोषणा जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी केली आहे. या कालावधीत बाजार समितीतील व्यवहाराबाबत मात्र संभ्रम आहे.
In Solapur till 15th May Strict lockdown
In Solapur till 15th May Strict lockdown

सोलापूर ः कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात लॅाकडाऊन लागलेला असताना आता पुन्हा एकदा ८ मेपासून १५ मेपर्यंत कडक लॅाकडाऊनची घोषणा जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी केली आहे. या कालावधीत बाजार समितीतील व्यवहाराबाबत मात्र संभ्रम आहे. 

गेल्या तीन आठवड्यांपासून जिल्ह्यात लॅाकडाऊन सुरु आहे. पण, तरीही कोरोनाच्या संसर्गाचा वेग काही केल्या थांबलेला नाही. रोज १८०० ते २००० रुग्णसंख्या आढळते आहे. शिवाय, खासगी आणि सरकारी दवाखान्यातही उपचारासाठी जागा मिळणे मुश्कील झाले आहे. संसर्गाची ही साखळी तोडण्यासाठी आता आणखी कडक निर्बंध आवश्यक आहेत. त्यामुळेच ८ मे रात्री ते १५ मे सकाळी सात वाजेपर्यंत जिल्ह्यात कडक लॅाकडाऊन जाहीर करण्यात येत असल्याचे शंभरकर यांनी सांगितले आहे. 

या कालावधीत केवळ वैद्यकीय सुविधा, औषध दुकाने, बँका या अत्यावश्यक सेवा वगळता सरसकट सर्वच व्यवसाय बंद ठेवण्यात येणार आहेत. यात अगदी बेकरी, भाजीपाला, मटण, किराणा दुकाने आदी सर्व दुकाने बंद राहतील. शिवाय लोकांनाही बाहेर फिरता येणार नाही. अन्यथा कारवाई करण्यात येईल.

प्रशासनाकडून नेमका आदेश नाही 

दरम्यान, या सगळ्या पार्श्वभूमीवर बाजार समितीतील भाजीपाला आणि भुसारचे व्यवहारही पूर्णतः बंद राहणार असल्याचे सांगण्यात येते. पण बाजार समिती प्रशासन वा जिल्हा प्रशासन यांच्याकडून मात्र अद्यापही याबाबत नेमका आदेश काढण्यात आला नसल्याने संभ्रम वाढला आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com