सोलापुरात दोन लाख ५९ हजार शेतकऱ्यांनी भरला पीकविमा

पीक विमा भरण्यासाठी ३१ जुलै ही शेवटची मुदत दिल्याने शेतकऱ्यांची शेवटच्या दिवसापर्यंत धावाधाव सुरू होती. पण या धावपळीतूनही जिल्ह्यातून शेवटच्या दिवसापर्यंत सर्वाधिक २ लाख ५९ हजार ८३७ शेतकऱ्यांनी पीक विमा भरला. यंदा पहिल्यांदाच पीकविम्यासाठी शेतकऱ्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला आहे.
In Solapur, two lakh 59 thousand farmers paid crop insurance
In Solapur, two lakh 59 thousand farmers paid crop insurance

सोलापूर ः यंदाच्या खरीप हंगामासाठी पीक विमा भरण्यासाठी ३१ जुलै ही शेवटची मुदत दिल्याने शेतकऱ्यांची शेवटच्या दिवसापर्यंत धावाधाव सुरू होती. पण या धावपळीतूनही जिल्ह्यातून शेवटच्या दिवसापर्यंत सर्वाधिक २ लाख ५९ हजार ८३७ शेतकऱ्यांनी पीक विमा भरला. यंदा पहिल्यांदाच पीकविम्यासाठी शेतकऱ्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला आहे.

खरीप आणि रब्बी या दोन्ही हंगामात शेतकऱ्यांना पीक विम्यासाठी कृषी विभागाकडून दरवर्षी आवाहन करण्यात येते. सोलापुरात खरिपापेक्षा रब्बीमध्ये सर्वाधिक विमा उतरला जातो. पण यंदा खरिपात मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी विमा भरण्यास पसंती दिली आहे. कोणत्याही परिस्थितीत विम्याची मुदत वाढवणार नसल्याचे शासनाकडून स्पष्ट करण्यात आल्यानंतर शेतकऱ्यांनी रांगेत उभे राहून शेवटच्या दिवसापर्यंत विमा भरला. तूर, सोयाबीन, मूग, उडीद या पिकासाठी हा विमा होता. त्यात सर्वाधिक तूर आणि सोयाबीनसाठी शेतकऱ्यांनी विमा भरला आहे.

पावणेदोन लाख हेक्टर क्षेत्र विमा संरक्षित जिल्ह्यात शेवटच्या दिवशी ३१ जुलैपर्यंत २ लाख ४४ हजार ९९६ शेतकऱ्यांनी १ लाख ८१ हजार ६९६ हेक्टरवरील पिकांसाठी पीक विमा भरला आहे. त्यामुळे जवळपास पावणेदोन लाख हेक्टर क्षेत्र विमा संरक्षित झाले आहे. यामध्ये कर्जदार फक्त ७७१ शेतकऱ्यांनी विमा भरला आहे. बाकी उर्वरित सर्व २ लाख ५९ हजार ६६ शेतकऱ्यांमध्ये बिगर कर्जदारांचा समावेश आहे. यंदा कर्जदारांना ही योजना ऐच्छिक ठेवण्यात आली होती. त्यामुळे त्यांचा फारसा प्रतिसाद मिळाला नाही.

शेतकऱ्यांचा हिस्सा दहा कोटी सोलापुरातील पीक विमा भरण्यासाठी भारती एक्सा कंपनीकडे जबाबदारी आहे. पीक विमा भरताना शेतकऱ्यांनी त्यांच्या विमा हप्त्यापोटी ९.९१ कोटी रुपये कंपनीकडे जमा केले आहेत. याशिवाय केंद्र शासन व राज्य शासनाचा प्रत्येकी ५१.७१ कोटी रुपयांचा हिस्सा राहणार आहे.

विमा भरण्यासाठी आधीच शेतकऱ्यांना महिनाभर मुदत देण्यात आली होती. त्यामुळे पुरेसा वेळ शेतकऱ्यांना मिळाला. पण शेवटच्या दिवशी शुक्रवारी (ता. ३१) एका दिवसात सर्वाधिक १४ हजार ८३७ शेतकऱ्यांनी पीक विमा भरला. यंदा विमा योजनेला मोठा प्रतिसाद शेतकऱ्यांनी दिला. - बसवराज बिराजदार, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, सोलापूर

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com