Agriculture news in marathi, Solapur Zilla Parishad four crore and more funds for Agriculture Conservation Fund | Page 2 ||| Agrowon

सोलापूर जिल्हा परिषदेकडून कृषी विभागासाठी सव्वाचार कोटींचा निधी

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 10 सप्टेंबर 2019

सोलापूर : जिल्हा परिषदेच्या सेस फंडातून कृषी विभागासाठी चार कोटी २५ लाख रुपयांच्या निधीची तरतूद केली आहे. कृषी विभागाने ज्या योजनांचा समावेश केला आहे, त्या योजनांचा आढावा नुकत्याच झालेल्या कृषी समितीच्या बैठकीत घेण्यात आला, अशी माहिती समितीचे सभापती मल्लिकार्जुन पाटील यांनी दिली. 

सोलापूर : जिल्हा परिषदेच्या सेस फंडातून कृषी विभागासाठी चार कोटी २५ लाख रुपयांच्या निधीची तरतूद केली आहे. कृषी विभागाने ज्या योजनांचा समावेश केला आहे, त्या योजनांचा आढावा नुकत्याच झालेल्या कृषी समितीच्या बैठकीत घेण्यात आला, अशी माहिती समितीचे सभापती मल्लिकार्जुन पाटील यांनी दिली. 

कृषी विभागाकडून सेस फंडाच्या माध्यमातून गोबर गॅससाठी आठ हजार ५०० रुपयांचे अनुदान दिले जाते. याशिवाय या योजनेसाठी केंद्र शासनाने १२ हजारांचे अनुदान द्यावे. सेस फंडातून यासाठी ४० लाखांची तरतूद केली आहे. पीक संरक्षक घटकांसाठी ४० लाख, ट्रॅक्‍टर व इतरांसाठी एक कोटी ३० लाख, विद्युत पंप, डिझेल इंजिन यासारख्या घटकांसाठी ९० लाख, कडबाकुट्टी, ताडपत्रीसाठी एक कोटी २० लाख रुपयांची तरतूद केल्याची माहिती पाटील यांनी दिली. 

त्याचबरोबर पशुसंवर्धन समितीची बैठकही सोमवारी झाली. त्यात सर्व योजनांचा आढावा घेण्यात आला. या विभागासाठी तीन कोटी रुपयांची तरतूद सेस फंडातून केली आहे. चार शेळ्या व एक बोकड लाभार्थींना देण्यासाठी ७५ लाखांची तरतूद केली आहे.

याशिवाय दवाखान्यांच्या दुरुस्तीसाठी ३० लाख, दवाखान्यांत फ्रिज, संगणक, फर्निचर खरेदीसाठी १० लाख, जनावरांच्या शिबिराकरिता आवश्‍यक औषध खरेदीसाठी, जंतनाशक, गोचिडनाशक या प्रत्येकासाठी २५ लाख, पावडरयुक्त औषधांसाठी २० लाख, खनिज मिश्रणांच्या पुरवठ्यासाठी ४५ लाख, वंध्यत्व निवारणासाठी ३० लाख, गोपालक पुरस्कारासाठी तीन लाखांची तरतूद केली आहे, असे पाटील यांनी सांगितले. 

ग्रामीण भागातील लोकांना देण्यात येणाऱ्या साहित्याच्या याद्या तयार आहेत. थोडा तांत्रिक मुद्दा नाहीसा झाल्यास पुढील प्रक्रिया सुरू होईल, असेही पाटील म्हणाले.


इतर बातम्या
कडेगाव तालुक्यातील पाच तलावांच्या पाणी...कडेगाव, जि. सांगली ः  तालुक्यात उन्हाळ्याची...
आजपासून ‘पूर्वमोसमी’ची शक्यतापुणे : विदर्भ ते केरळदरम्यान कमी दाबाचे क्षेत्र...
सोयाबीन बियाणे निर्बंध मध्य प्रदेशकडून...पुणे ः परराज्यांत सोयाबीन बियाणे विक्रीवर निर्बंध...
‘महाबीज’चे सोयाबीन बियाणे दर ‘जैसे थे’अकोला : खरीप हंगामासाठी ‘महाबीज’ने सोयाबीन...
द्राक्ष हंगामाच्या सांगतेला दराची गोडीनाशिक : गतवर्षी एप्रिल महिन्यात कोरोनाच्या पार्श्...
देशाच्या तुलनेत निम्मी साखर एकट्या...कोल्हापूर : देशाच्या साखरनिर्यात कोट्यापैकी जवळ...
मराठा आरक्षण सर्वोच्च न्यायालयाकडून रद्दनवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालायाच्या घटनापीठाने...
दूध उत्पादकांना दिलासा देण्याचे नव्या...कोल्हापूर : जिल्ह्यातील आर्थिक महासत्ता असलेल्या...
सांगली बाजार समिती आजपासून सात दिवस बंदसांगली : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी...
खानदेशात पूर्वहंगामीचे क्षेत्र जाणार...जळगाव ः खानदेशात पूर्वहंगामी कापूस लागवडीची तयारी...
कांदा काढण्यास मजूर मिळेनातकर्जत, जि. नगर : अनेक अडचणींवर मात करून उत्पादन...
बीजप्रक्रियेचे एकाच दिवशी २६ हजार...जालना : खरीप हंगाम लक्षात घेऊन बुधवारी (ता. ५)...
आदिवासी भागात  ऑक्सिजनचा तुटवडानाशिक : कोरोनाचा रुग्णांसाठी ऑक्सिजनची गरज वाढली...
खानदेशात मका दरात घसरणजळगाव : खानदेशात मका मळणी पूर्ण होत आली आहे. पण...
पीककर्ज वाटपात वाशीम जिल्हा आघाडीवरवाशीम : आगामी खरीप हंगामासाठी पीककर्ज वाटपाची...
मेंढपाळ तांत्रिक कारणांमुळे...अकोला : राज्यातील मेंढपाळ, भटक्या विमुक्त जाती...
भंडारा, गोंदियात मिळणार धानाचे चुकारेगोंदिया : हमीभावाने धान विक्री करणाऱ्या...
मका, ज्वारी, गव्हाच्या आधारभूत खरेदीची...औरंगाबाद : किमान आधारभूत किमतीने मका, ज्वारी, गहू...
साखर कामगारांच्या  वेतनवाढीचा तिढा सोडवानगर ः  राज्यातील साखर कामगारांच्या...
हातखंबा आंबा बाजाराला बसला कोरोनाचा फटकारत्नागिरी : मुंबई-गोवा महामार्गावर हातखंबा (ता....