सोलापूर झेडपी अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीवर २८ला सुनावणी

Solapur ZP Chairman, Hearing front  of Commissioner on February 28
Solapur ZP Chairman, Hearing front of Commissioner on February 28

सोलापूर : जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीसाठी काढण्यात आलेल्या विशेष सर्वसाधारण सभेची नोटीस नियमाप्रमाणे दिलेली नाही. अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीत राष्ट्रवादीने व्हिप बजावलेला असतानाही बंडखोर सदस्यांनी तो डावलून मतदान केले. यासह अन्य मुद्द्यांवर जिल्हा परिषदेचे गटनेते बळिराम साठे यांनी विभागीय आयुक्तांकडे तक्रार दाखल केली. त्यावर शुक्रवारी (ता.७) सुनावणी झाली. त्यात बंडखोर सदस्य व अध्यक्ष, उपाध्यक्षातर्फे म्हणणे मांडण्यासाठी मुदत देण्यात आली आहे.  त्यामुळे या प्रकरणावर आता २८ फेब्रुवारीला सुनावणी होईल. 

जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीनंतर याबाबतची तक्रार दाखल झाली होती. पहिल्या टप्प्यात जिल्हाधिकाऱ्यांकडे दाखल करण्यात आलेल्या प्रकरणावरील कारवाईला उच्च न्यायालयाने स्थगिती दिली. त्यामुळे बंडखोर सदस्यांच्या विरोधातील प्रकरण काही दिवसांसाठी थांबले होते. पण, आता विभागीय आयुक्तांकडे हे प्रकरण सुरू झाले आहे. 

पक्षातंर्गत कायद्याचे हवाले देत गटनेते साठे यांच्या वतीने बाजू मांडण्यात येते आहे. तर, विरोधी गटाकडून आम्ही स्वतंत्र गट आहोत, असे सांगत बाजू मांडण्यात येत आहे. त्यामुळे कायद्याच्या दृष्टीने नेमके कोण खरे, हे लवकरच समजेल. या प्रकरणात गटनेते साठे यांच्या वतीने  ॲड. विनायक नागणे यांनी काम पाहिले. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com