Agriculture news in marathi Solapuri Gulala Branding Opportunity | Page 3 ||| Agrowon

सोलापुरी गुळाला ब्रॅंडिंगची संधी

टीम अॅग्रोवन
सोमवार, 19 एप्रिल 2021

मधुरतेची वेगळी ओळख असलेला सोलापुरी गुळाच्या ब्रॅडला सेंद्रीय उत्पादन व वाढत्या मागणीने नव्या संधी उभ्या राहिल्या आहेत. 

सोलापूर ः मधुरतेची वेगळी ओळख असलेला सोलापुरी गुळाच्या ब्रॅडला सेंद्रीय उत्पादन व वाढत्या मागणीने नव्या संधी उभ्या राहिल्या आहेत. 

सोलापुरी गुळाची परंपरा अनेक दशकांची आहे. पूर्वीपासून उमरगा तालुक्‍यातील वीस ते चाळीस गावातून गुऱ्हाळाचा गूळ येत असे. सास्तूर, वर्टी, अचले, मुरूड आदी गावातून ततसेच दक्षिण व उत्तर सोलापूर तालुक्‍यात देखील काही गावामध्ये गुऱ्हाळे आहेत. या सर्व गुऱ्हाळातील गूळ बाजारात येतो. विशेष म्हणजे हा गूळ वर्षभर टिकणारा असतो. या गावरान गुळाला आज देखील मोठी मागणी आहे. 

सोलापूर व मराठवाड्याला जोडणाऱ्या भागात होणारी उसाची लागवडीचे वैशिष्ट्य असे आहे, की तेथील गुळाची चवच वेगळ्या गोडव्याची बनते. अनेक वर्ष सहज टिकणारा, मधुरतेची वेगळी चव व रसायनाच्या वापर नसलेल्या सोलापुरी गुळाची ही वैशिष्ट्ये म्हणायला हवीत. 

पुणे व मुंबईच्या बाजारात सोलापुरी गूळ ही ओळख कायम आहे.  सध्याच्या गुऱ्हाळांनी ही सोलापुरी गुळाची परंपरा राखली. मागील काही वर्षात जेव्हा सेंद्रीय गुळाची बाजारपेठ मोठ्या प्रमाणात विकसित झाली. तेव्हा या सोलापुरी गुळाच्या बाजाराच्या नव्या संधी उभ्या झाल्या आहेत.

सोलापुरी गुळाच्या बाजारातील संधी

  •     पुणे व मुंबईत मागणी एवढा पुरवठा व्हावा
  •     सेंद्रिय बाजारात सोलापुरी गुळाची नवी ओळख
  •     साखर कारखान्यापेक्षा उसाचा अधिक मोबदला मिळणे
  •     सामान्य गुळाच्या तुलनेत अधिक भाव

नेमके काय झाले पाहिजे

  •     गूळ निर्मितीची गुणवत्ता व्यवस्थापन, गुऱ्हाळे वाढवण्यास चालना
  •     कृषी उत्पन्न बाजार समितीची निर्णायक भूमिका
  •     उत्पादनपश्‍चात विक्री व्यवस्थापन, गूळ उत्पादकांना वाढीव मोबदला. सोलापुरी गुळाचे ब्रॅंडिंग, पॅकेजींग

प्रतिक्रिया

सोलापुरी गूळ ही ओळख कायम आहे. पण सध्या सोलापुरात जो गूळ येतो त्याचे उत्पादन कमी असल्याने तो स्थानिक बाजाराच्या गरजा भागवण्याईतका येतो. त्यामुळे पुणे व मुंबईत मागणी असूनही माल पाठवता येत नाही. 
- महादेव मठपती, 
गूळ व्यापारी, कृषी उत्पन्न बाजार समिती,

प्रतिक्रिया
नैसर्गिक, सेंद्रिय सोलापुरी गुळाला केवळ दुकाने नव्हे, तर ऑनलाइन बाजारात देखील स्थान आहे. पुढील काळात पून्हा एकदा सोलापुरी गूळ बाजारात ब्रॅंड बनू शकते. जर गुळाला साखरेसारखा एमएसपी मिळाला तर ऊसा संबंधी सर्व अडचणी कमी होतील व गुऱ्हाळघरे वाढतील. त्याचा छोट्या छोट्या शेतकऱ्यांना मोठा फायदा होऊ शकतो 
- अमर लांडे, जलकमल ऑर्गनिक गूळ उत्पादक


इतर ताज्या घडामोडी
सोलापूरच्या कृषी विभागात कोरोनाचा शिरकावसोलापूर ः जिल्ह्यात कोरोना संसर्गाचा विळखा वरचेवर...
पंढरपूरला आणखी २०० बेड वाढवणार ः भरणेसोलापूर : ‘‘पंढरपुरातील वाढत्या कोरोना...
केहाळ येथे भुईमुगाची उन्हाळी हंगामात...परभणी ः जिल्ह्यातील केहाळ (ता. जिंतूर) येथील...
नाशिकच्या उत्तरपूर्व भागात टँकर सुरूनाशिक : जिल्ह्याच्या अनेक भागात समाधानकारक पाऊस...
लातूर कृषी विभागातील पाच जिल्ह्यांत...लातूर : लातूर कृषी विभागातील पाच जिल्ह्यांत...
परभणीत कपाशी क्षेत्र घटण्याची शक्यतापरभणी ः ‘‘जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात...
सोलापुरात माल उतरण्यासाठी भुसार बाजारात...सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
सातारा : कांदा बी सदोष निघाल्याने...विसापूर, जि. सातारा : खासगी कृषी फार्म, व्यापारी...
विमा कंपनी विरोधात शेतकऱ्यांमध्ये रोषगोंदिया : खरीप हंगामात अतिवृष्टी, संततधार पाऊस व...
सोयाबीन बियाण्यांची खरिपासाठी जुळवाजुळवअकोला : येत्या हंगामासाठी शेतकरी घरगुती सोयाबीन...
‘कुरनूर’मधून पाण्याचे दुसरे आवर्तन सोडलेसोलापूर ः अक्कलकोट तालुक्यातील कुरनूर धरणातून...
पंढरपुरातील दोन्ही भक्त निवासे कोरोना...सोलापूर ः पंढरपूर शहर आणि तालुक्यातील कोरोना...
कोरोना सुपरस्प्रेडर रोखण्यासाठी पुणे...पुणे : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ग्रामीण भागात...
सांगलीत साखरेचे उत्पादन १३ लाख...सांगली जिल्ह्यातील साखर कारखान्यांच्या गळीत...
‘पंदेकृवि’चा दीक्षान्त समारंभ अखेर पुढे...अकोला ः डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचा...
ऑक्सिजन, रेमडेसिव्हिरचा पुरवठा करा ः...मुंबई ः महाराष्ट्राला अधिक ऑक्सिजनची गरज असून,...
बाजार समिती कर्मचाऱ्यांना विम्यासाठी ‘...पुणे ः कोरोना संकटात बाजार समिती कर्मचाऱ्यांचा ५०...
डाळिंब प्रक्रिया, मुल्यवर्धन तंत्रज्ञान...औरंगाबाद : डाळिंब पिकापासून जास्त आर्थिक नफा...
वन्यप्राण्यांपासून पीक वाचवण्यासाठी...मंडणगड, जि. रत्नागिरी ः वन्य प्राण्यांच्या...
यंदा कर्तव्य असणाऱ्यांसाठी ६४ मुहूर्त नागपूर : कोरोनामुळे वेळेवर तारखांत बदल करावा लागत...