Agriculture news in marathi, Of solar energy pump scheme Website down | Page 2 ||| Agrowon

सौरऊर्जा पंप योजनेचे संकेतस्थळ डाउन

टीम अॅग्रोवन
रविवार, 26 सप्टेंबर 2021

औरंगाबाद : सौरऊर्जेद्वारे कृषिपंप विद्युतीकरणासाठी पंतप्रधान कुसुम योजना आली खरी, परंतु या योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी ताटकाळण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.

औरंगाबाद : सौरऊर्जेद्वारे कृषिपंप विद्युतीकरणासाठी पंतप्रधान कुसुम योजना आली खरी, परंतु या योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी ताटकाळण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. योजनेसाठीचे संकेतस्थळ चालत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना अर्जच भरता येत नाही. त्यामुळे संकेतस्थळ चालू झाले का, याची विचारणा करण्यापलीकडे शेतकऱ्यांच्या हाती काहीच नाही, अशी स्थिती आहे. 

पंतप्रधान कुसुम योजनेतून कृषिपंपासाठी सौरऊर्जेची सोय व्हावी म्हणून पैठण तालुक्‍यातील देवगावचे सदाशिव उत्तमराव गिते यांची पाच ते सहा दिवसांपासून धडपड सुरू आहे. दररोज गावावरून रजापूरला येणे तिथे सुविधा केंद्रावर तासन्‌तास बसणे आणि सौरऊर्जेसाठीच्या योजनेचे संकेतस्थळ सुरू होण्याची वाट पाहणे, हा त्यांचा नित्यक्रम झाला आहे. मात्र अजूनही त्यांना आपला अर्ज भरता आलेला नाही. 

या संदर्भात शेतकरी सुविधा केंद्राचे चालक ज्ञानेश्‍वर कोठुळे यांना विचारणा केली. ते म्हणाले, ‘‘संकेतस्थळ चालत नाही. सुरू झाले तरी पाच मिनिटे चालते. पुन्हा बंद पडते. दररोज किमान ५० शेतकरी विचारणा करतात. परंतु संकेतस्थळ सुरळीत चालण्याची वाट पाहण्यापलीकडे आपल्याकडे पर्याय नाही. संकेतस्थळ सुरू झाले, तरी सुरवातीला नोंदणी, त्यानंतर यूजर आयडी व पासवर्ड मिळाल्यानंतर तो वापरून ९ टप्प्यांत योजनेअंतर्गत अर्ज भरण्याची सोय. तेवढी प्रक्रिया होईपर्यंत संकेतस्थळ चालणे आवश्‍यक आहे. आठवडाभरात केवळ एक अर्ज आमच्या कुटुंबांतील तोही मध्यरात्री भरू शकलो, जो प्रतीक्षा यादीत गेला आहे.’’

महाकृषी ऊर्जा अभियानांतर्गत राज्यातील कृषिपंपांचे सौरऊर्जेद्वारे विद्युतीकरण करण्यासाठी पंतप्रधान सौर कुसुम योजना आणली गेली. १४ सप्टेंबरला दुपारी २ वाजेपासून या योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी ऑनलाइन संकेतस्थळ सुरू करण्यात आले. ३४ जिल्ह्यांत जवळपास ३८०० सौर कृषिपंप स्थापित करणे अपेक्षित आहे. ३ एचपी, ५ एचपी, साडेसात एचपी व त्यापेक्षा जास्त अश्‍वशक्‍ती डीसी सौरपंप योजनेद्वारे उपलब्ध होणार आहेत.

सर्वसाधारण वर्गवारीच्या लाभार्थ्यांना कृषी पंप किमतीच्या १० टक्‍के, तर अनुसूचित जाती अथवा जमातीच्या लाभार्थ्यांना ५ टक्‍के लाभार्थी हिस्सा भरून योजनेचा लाभ घेता येईल. परंतु ऑनलाइन अडचणींमुळे इच्छुक शेतकऱ्यांच्या अपेक्षांवर पाणी फेरले आहे. 

पाच सहा दिवसांपासून देवगाव ते रजापुरातील शेतकरी सुविधा केंद्र, अशा वाऱ्या करतो. तासन्‌तास बसलो, पण कुसुम योजनेचे संकेतस्थळ काही चालले नाही. काही वेळा तर रात्री अकरापर्यंत संकेतस्थळ चालू होण्याची वाट पाहिली. पण व्यर्थ ठरलो. संकेतस्थळ चालले तर शेतकऱ्याला योजनेच्या लाभासाठी अर्ज करता येईल.
- सदाशिव गिते, देवगाव, ता. पैठण, जि. औरंगाबाद.


इतर बातम्या
नांदेड जिल्ह्यात रब्बीची पेरणी सुरुनांदेड : जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून थंडी...
तापमानातील तफावत वाढलीपुणे : राज्यात थंडीची चाहूल लागली असतानाच...
शेतकऱ्यांना तत्काळ कर्जासाठी कृषी कर्ज...नगर : राज्यातील शेतकऱ्यांना वेळेत व सुलभरीत्या...
तलाठ्यांच्या संपामुळे कामे खोळंबली नगर : तलाठ्यांच्या कामकाजासंदर्भात समन्वय...
तेलबिया आणा अन् खाद्यतेल घेऊन जापुणे : महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या शिवाजीनगर...
पूर्व विदर्भात करडईची होणार चार हजार...नागपूर ः देशाची खाद्यतेलाची गरज भागविण्याकरिता...
सोयाबीनच्या आवकेसह मागणीही वाढणारपुणे : देशभरातील बाजारात चालू सप्ताहात दैनंदिन...
परभणी कृषी विद्यापीठाकडून कुशल...परभणी ः वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ यंदा...
पुणे : रब्बीसाठी ३३,५०० क्विंटल...पुणे : पुणे जिल्ह्यात रब्बी हंगामाची तयारी सुरू...
परभणी : सव्वा लाखावर पंचनामे प्रलंबित परभणी : जिल्ह्यातील पंतप्रधान पीकविमा...
हिंगोलीत सोयाबीनचे दर  ४६५० ते ४८५०...हिंगोली : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गत...
 कांदा दरात पुन्हा झाली घसरण नगर : दर मिळेल या आशेने गत वर्षीचा उन्हाळी,...
नागपुरात १९ हजार हेक्टरवरील पिके नष्ट नागपूर : ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यादरम्यान झालेली...
कांद्याचे भाव वाढल्यावरच  का पाडले...येवला, जि. नाशिक : उन्हाळ कांद्याचे भाव वाढून...
पीक नुकसानी भरपाई मिळणार वाढीव दराने  येवला, जि. पुणे : निसर्गाच्या आपत्तीत अतिवृष्टी व...
राष्ट्रीय स्तरावरील साखर उद्योगातील...कोल्हापूर : नवी दिल्लीच्या राष्ट्रीय सहकारी साखर...
दहा वर्षांवरील हरभरा वाणांना अनुदान नाहीपुणे ः राज्यात रब्बी हंगामासाठी शेतकऱ्यांना हरभरा...
यंदा कापूस तेजीतच राहणारपुणे : महाराष्ट्र, गुजरात आणि मध्य प्रदेशात...
पावसाने वाढली सोयाबीनची आवक नागपूर ः मध्य प्रदेशात पावसाच्या शक्‍यतेमुळे...
ड्रायपोर्टमुळे संत्रा निर्यातीला चालनानागपूर : वर्धा जिल्ह्यातील सिंधी रेल्वे येथे...