agriculture news in Marathi, Solar farming scheme will get pumps soon in Khandesh | Agrowon

खानदेशात सौर कृषिपंप योजनेतून लवकरच पंप मिळणार
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 23 मे 2019

जळगाव ः सौर कृषिपंपासाठी खानदेशातून ८ हजार ९५० शेतकऱ्यांनी अर्ज दाखल केले आहेत. यात आदिवासी भाग असलेल्या नंदुरबार जिल्ह्यातून सर्वाधिक ३ हजार ९७३ शेतकऱ्यांनी अर्ज दाखल केले आहेत. अंदाजपत्रक देण्यात आलेल्या शेतकऱ्यांमधून १७२ जणांनी कृषिपंपासाठी पैसे जमा केले असून, या योजनेतून शेतकऱ्यांना लाभ देण्याची कार्यवाही पुढील महिन्यात सुरू होण्याची शक्‍यता आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. लोकसभा निवडणुकीचे निकाल व आचारसंहितेमुळे या योजनेसंबंधीची कार्यवाही रखडली होती. 

जळगाव ः सौर कृषिपंपासाठी खानदेशातून ८ हजार ९५० शेतकऱ्यांनी अर्ज दाखल केले आहेत. यात आदिवासी भाग असलेल्या नंदुरबार जिल्ह्यातून सर्वाधिक ३ हजार ९७३ शेतकऱ्यांनी अर्ज दाखल केले आहेत. अंदाजपत्रक देण्यात आलेल्या शेतकऱ्यांमधून १७२ जणांनी कृषिपंपासाठी पैसे जमा केले असून, या योजनेतून शेतकऱ्यांना लाभ देण्याची कार्यवाही पुढील महिन्यात सुरू होण्याची शक्‍यता आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. लोकसभा निवडणुकीचे निकाल व आचारसंहितेमुळे या योजनेसंबंधीची कार्यवाही रखडली होती. 

कृषिपंपांसाठी बारा तासांचे भारनियमन असल्याने शेतकऱ्यांना पिकांना पाणी देणे अडचणीचे होते. शिवाय, कृषिपंपासाठी वापरण्यात येणाऱ्या वीजबिलाची वसुलीही ‘महावितरण’ला अडचणीची होत आहे. या दोघांवर पर्याय म्हणून शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेला शेतकऱ्यांचा प्रतिसादही चांगला मिळत असून, खानदेशातून सौरपंपासाठी चार हजारांहून अधिक अर्ज सादर झाले आहेत.

मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजनेच्या लाभासाठी ‘महावितरण’च्या जळगाव परिमंडळातील ८ हजार ९५० पेक्षा अधिक शेतकऱ्यांकडून ऑनलाइन अर्ज सादर करण्यात आले आहेत. लक्ष्यांक कमी व अर्ज अधिक, अशी स्थिती असल्याने अनेक शेतकरी या योजनेपासून वंचित राहण्याची शक्‍यता सद्यःस्थितीत निर्माण झाली आहे. सर्वसाधारण प्रवर्गातील लाभार्थ्यास तीन अश्‍वशक्ती डीसी सौर पंपासाठी १० टक्के म्हणजेच १६ हजार ५६९, तर पाच अश्‍वशक्ती डीसी सौर पंपासाठी २४ हजार ७१० रुपये लाभार्थी हिस्सा भरावा लागेल, असे सांगण्यात आले.

मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजनेंतर्गत जळगाव जिल्ह्यातील ८२७, धुळ्यातील ३९५, तर नंदुरबारमधील ३४९ अशा एकूण १ हजार ४८१ शेतकऱ्यांना लाभार्थी हिस्सा भरण्यासाठी अंदाजपत्रके देण्यात आली आहेत. यातील १७२ जणांनी रक्‍कम अदा केली आहे.ज्या शेतकऱ्यांना केबलद्वारे वीजपुवठा देण्यात आला आहे अशा शेतकऱ्यांची पायाभूत यंत्रणा उभारून कायमस्वरूपी वीजपुरवठा देण्याबाबत मागणी आल्याने त्यांनाही मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजनेत ऑनलाइन अर्ज करून सहभागी करण्याचा निर्णय झाल्याचे सांगण्यात आले. 

इतर ताज्या घडामोडी
हवामान बदलाच्या अभ्यासासाठी नियामक मंडळ...मुंबई : हवामान बदलाचा मानवी आरोग्यावर होणाऱ्या...
शेतकऱ्यांना अनुदानावर सेफ्टी किटचा...यवतमाळ  ः दोन वर्षांपूर्वी जिल्ह्यात...
राष्ट्रीय पशू वाहतूक बंदीचा आर्थिक फटका...इंग्लंडमध्ये लाळ्या खुरकुत (एफएमडी), बोव्हाईन...
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तीन डोंगर...सिंधुदुर्ग : अतिवृष्टीने खचलेल्या डोंगरांपैकी...
कॉंग्रेसच्या आजपासून ‘महापर्दाफाश' सभा...मुंबईः संपूर्ण राज्य भयंकर दुष्काळ आणि...
जानकर साहेबांची ताकत चौकात नाही; शिवाजी...मुंबई : राज्यात राष्ट्रीय समाज पक्षाची ताकत ...
ड्रायझोनमधील वरुडला ठिबक अनुदानातून...अमरावती  ः सर्वाधिक संत्रा लागवड व...
जलसमस्येवरील उपायांच्या प्रयत्नात...औरंगाबाद: मराठवाड्यासह राज्यात निर्माण होणाऱ्या...
नांदेड, हिंगोली, परभणी जिल्ह्यात...नांदेड  : नांदेड, परभणी, हिंगोली...
पुण्यात भाजीपाल्याची आवक, दर स्थिरपुणे  ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
पंतप्रधान शेतकरी मानधन योजनेच्या...वाशीम : केंद्र शासनाने शेतकऱ्यांसाठी सुरू...
झरे परिसरात महावितरणकडून वीजजोडणीस...झरे, जि. सांगली : झरे व परिसरातील घरगुती व...
परभणी जिल्ह्यात पीक कर्जवाटपाच्या गतीला...परभणी : चालू आर्थिक वर्षातील पहिल्या साडेचार...
देवळा तालुक्यातील ‘त्या’...नाशिक : मागील पंधरवड्यात कळवण, सुरगाणा तालुक्यात...
सोलापूर जिल्ह्यात दोन लाख वीज...सोलापूर : घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक...
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या...अकोला  ः भाजपचे ज्येष्ठ नेते व माजी केंद्रीय...
देश, राज्यात बेरोजगारी हेच मोठे आव्हान...नगर : मागील पाच वर्षांत नोटबंदीसारख्या...
साताऱ्यातील भूस्खलन बाधितांचा पुनर्वसन...सातारा  : अतिवृष्टी व भूस्खलनामुळे बाधित...
नगर झेडपीत सहा महिन्यांत माहिती...नगर  ः जिल्हा परिषदेतून विविध योजनांची...
...तर बारामतीची जागाही जिंकता आली असती...नागपूर  ः ‘ईव्हीएम’मध्ये गडबड करायची असती तर...