जळगाव जिल्ह्यातील ६७ शाळांना सौर प्रकल्प

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

जळगाव  ः  जिल्हा परिषद शाळांमधील वीजप्रश्‍न अनेकदा निर्माण होतो. शाळा डिजिटल झाल्यानंतर वीजबिलांच्या थकीत रकमेमुळे वीजजोडणी (कनेक्‍शन) कट करण्याची नामुष्की येते. त्यावर पर्याय म्हणून शाळांना सौरऊर्जा प्रकल्प बसविण्याचे प्रयत्न सुरू होते. त्यानुसार जिल्ह्यातील ६७ शाळांवर सौर प्रकल्प बसविण्यात येणार आहेत.  

महावितरण’च्या थकित वीजबिलांमुळे बहुतांश शाळांची वीजजोडणी कट करण्यात येते. जिल्ह्यातील एक हजार ८३२ शाळांपैकी एक हजार ६३० शाळा डिजिटल झाल्या आहेत. वीजपुरवठा नसल्याने शाळा डिजिटल करण्यालाही उपयोग होत नाही. अर्थात डिजिटल शाळेकरिता घेण्याचे किट पडून असते. यामुळे वीजबिल आणि वारंवार होणाऱ्या भारनियमनाचा प्रश्‍न सोडविण्यासाठी सौरऊर्जा प्रकल्प बसविण्यासाठी जिल्हा नियोजन समितीकडून तरतूद करण्यात आली होती. यातून जिल्ह्यातील ६७ शाळांना पारेषण विरहित सौर वीज प्रकल्प बसविण्यास मान्यता मिळाली आहे.

आणखी शंभर शाळांसाठी प्रयत्न जिल्हा नियोजन समितीकडून ६७ शाळांसाठी प्रकल्प बसविण्यास मंजुरी मिळाली असून, आणखी शंभर शाळांना सौर प्रकल्प बसविण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन. पाटील प्रयत्नशील आहेत. हे सौर वीज प्रकल्प बसविण्यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, मुंबई यांच्याकडून ‘सीईआर’अंतर्गत निधी मिळविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. यास मंजुरी मिळाल्यास आणखी शंभर शाळांचा वीजप्रश्‍न सुटणार आहे.   ३०७ शाळांनी भरले थकीत बिल थकीत बिलामुळे शाळेचा वीजपुरवठा तोडला जातो. ‘महावितरण’ची शाळांकडे कोट्यवधीच्या घरात थकबाकी आहे. यामुळे वीजपुरवठा नियमित होण्यासाठी गावातील ग्रामपंचायतीचे १४ व्या वित्त आयोगातील निधीतून शाळेचे थकित बिल भरण्याच्या सूचना होत्या. त्यानुसार जिल्हा परिषदेच्या ३०७ शाळांकडून १० लाख ९८ हजार ७५० रुपये थकित वीजबिल भरणा केला आहे. यात धरणगाव तालुक्‍यातून १९ शाळा, बोदवड- २१, पारोळा- ४४, चोपडा- १०३, अमळनेर- ५९, मुक्‍ताईनगर- ३५ आणि भुसावळ तालुक्‍यातील २६ शाळांनी भरणा केला आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com