Agriculture news in marathi Solar pump to run five drainage schemes in Solapur district | Agrowon

सोलापूर जिल्ह्यातील पाच नळपाणी योजना चालणार सौरपंपावर

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 18 फेब्रुवारी 2020

सोलापूर : प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेचे पाणी विद्युतपंपाऐवजी सौरपंपाने उचलण्यात येईल. जिल्ह्यातील पाच प्रादेशिक पाणीपुरवठा योजनांसाठी ३४ लाख ७० हजार रुपयांच्या निधीतून सौरसंच बसविण्यात येणार आहेत. जिल्हा परिषदेच्या नुकत्याच झालेल्या जलव्यवस्थापन समितीच्या बैठकीत सौरपंपावर पाणीपुरवठा योजना कार्यान्वित करण्याबाबत चर्चा झाली.

सोलापूर : प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेचे पाणी विद्युतपंपाऐवजी सौरपंपाने उचलण्यात येईल. जिल्ह्यातील पाच प्रादेशिक पाणीपुरवठा योजनांसाठी ३४ लाख ७० हजार रुपयांच्या निधीतून सौरसंच बसविण्यात येणार आहेत. जिल्हा परिषदेच्या नुकत्याच झालेल्या जलव्यवस्थापन समितीच्या बैठकीत सौरपंपावर पाणीपुरवठा योजना कार्यान्वित करण्याबाबत चर्चा झाली.

प्रादेशिक पाणीपुरवठा योजनांमधील काही ग्रामपंचायतींनी पाण्याची पर्यायी व्यवस्था केली आहे. पण, उन्हाळ्यात पाणीटंचाई वाढल्यावर प्रादेशिक पाणीपुरवठा योजनांचा वापर मोठ्या प्रमाणात वाढतो. पण, थकीत वीजबिलांमुळे प्रादेशिक पाणीपुरवठा योजना बंद राहतात. थकीत वीजबिलासाठी शासनाकडे मदतीची मागणी करणे, पैशांची जुळवाजुळव करण्यातच ग्रामपंचायतींची धावपळ होते. त्यावर सौरऊर्जा हा प्रभावी उपाय ठरू शकतो. 

वीजबिलावर होणाऱ्या खर्चातून योजनेची देखभाल दुरुस्तीतही वेळेत होईल, या उद्देशाने सौरऊर्जेचा वापर करण्याचा निर्णय झाला. त्यानुसार पंढरपूर तालुक्यातील नांदुरे, मंगळवेढा तालुक्यांतील निंबोणी, मोहोळ तालुक्यांतील शेटफळ, अक्कलकोट तालुक्यांतील जेऊर व उत्तर सोलापूरमधील राळेरास या पाच प्रादेशिक पाणीपुरवठा योजनांचे विद्युतपंप सौरऊर्जेवर करण्यात येणार आहेत.

दुरुस्तीसाठीही दिला निधी

शेटफळ (ता. मोहोळ) येथील प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेतील पंप मशिनरीच्या दुरुस्तीसाठी दोन लाख ९९ हजार रुपयांच्या खर्चास मंजुरी देण्यात आली. कुंभारी प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेला हिप्परगा तलावातून पाणीपुरवठा करण्यात येतो. यापूर्वी तलावात पाणी नसल्याने योजना बंद होती. पण, सध्या तलाव भरला आहे. त्यामुळे दक्षिण सोलापूर तालुक्यातील मुळेगाव तांडा येथील पंप मशिनरी दुरुस्तीसाठी १४ लाख १० हजार ६११ रुपयांच्या निधी खर्चाला समितीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली.


इतर ताज्या घडामोडी
विनाकारण बाहेर फिरणाऱ्यांची ओवाळली आरतीअकोला ः ग्रामीण भागात ‘कोरोना’ची धास्ती वाढलेली...
नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यात केळी...नांदेड : लॅाकडाऊनमुळे वाहतुकीवर परिणाम झाला आहे....
मुंबई बाजार समितीत फळांची आवक वाढली मुंबई : जीवनावश्यक वस्तूंचा योग्य पुरवठा व्हावा,...
आंब्याची वाहतूक, वितरण व्यवस्थेतील...मुंबई : एप्रिलपासून आंब्याचा हंगाम सुरू झाला आहे...
कोल्हापुरात वाहतुक बंदीचा रेशीम कोषाला...कोल्हापूर : वाहतूक बंद असल्यामुळे शेतकऱ्यांचे...
मुख्यमंत्री साहायता निधीसाठी ‘कृषी’च्या...नाशिक: कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे...
खानदेशात कडब्याच्या दरांवर दबाव जळगाव : खानदेशातून परराज्यासह इतर जिल्ह्यांत कडबा...
मदत व पुनर्वसन मंत्री देणार ४० हजार...चंद्रपूर ः खऱ्या अर्थाने पालकत्वाची जबाबदारी पार...
खानदेशात धान्याची शिवार खरेदी, मार्केट...जळगाव : खानदेशात धान्याची शिवार खरेदी बंद आहे....
भंडारा बॅंक देणार १५ एप्रिलपासून...भंडारा ः ‘कोरोना’ विषाणूचा प्रादुर्भाव...
नंदुरबार जिल्ह्यात पपईची कवडीमोल दराने...नंदुरबार : लॉकडाऊनचा फटका सर्वसामान्य...
जळगाव जिल्ह्यातील बॅंका पीक कर्ज...जळगाव : जिल्ह्यात अपवाद वगळता बॅंकांनी नव्याने...
हिंगोलीत एका व्यक्तीचा कोरोना चाचणी...हिंगोली : हिंगोली येथील जिल्हा रुग्णालयात भरती...
शब-ए-बारात, डॉ. आंबेडकर जयंतीला घरुनच...मुंबईः सध्या ‘कोरोना’ने सर्वत्र धुमाकूळ घातला...
खासगी डेअरीची संकलन यंत्रणा तोकडी;...नांदेड ः ‘कोरोना’ विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी...
नाशिक बाजार समितीमध्ये केवळ लिलावाला...नाशिक : ‘कोरोना’ विषाणूच्या वाढत्या...
पुणे, मुंबईत भाजीपाल्याची घरपोच सुविधा पुणे ः शहरातील नागरिकांसाठी भाजीपाला पुरवठा...
पुसदमध्ये शेतकरी कंपन्यांतर्फे...यवतमाळ : ‘लॉकडाऊन’च्या पार्श्‍वभूमीवर पुसद येथे...
लातूर जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादक...चापोली, जि. लातूर : ‘कोरोना’चा फैलाव...
कोरोना’च्या संकटामुळे माळेगावचे गाळप...माळेगाव, जि. पुणे ः माळेगाव सहकारी साखर...