सौरकृषी पंपाच्या  कुसुम योजनेला अखेर प्रारंभ 

उच्च न्यायालयाने स्थगिती दिल्यामुळे गेली अनेक दिवस रखडलेली सौर कृषी पंपासाठी असणाऱ्या कुसुम योजनेला अखेर प्रारंभ झाला आहे.
 सौरकृषी पंपाच्या  कुसुम योजनेला अखेर प्रारंभ  Of solar pumps Kusum scheme finally started
 सौरकृषी पंपाच्या  कुसुम योजनेला अखेर प्रारंभ  Of solar pumps Kusum scheme finally started

पुणे : उच्च न्यायालयाने स्थगिती दिल्यामुळे गेली अनेक दिवस रखडलेली सौर कृषी पंपासाठी असणाऱ्या कुसुम योजनेला अखेर प्रारंभ झाला आहे. राज्यात महाऊर्जाद्वारे राबविण्यात येणाऱ्या या योजनेसाठी १४ हजार अर्ज प्राप्त झाले असून, लाभार्थी हिश्‍श्‍याचे १० टक्के रक्कम पहिल्यांदा भरणाऱ्या लाभार्थ्यास प्रथम पंपाचे वाटप होणार आहे. दरम्यान केंद्र सरकारने अद्याप स्पर्धात्मक दर जाहीर न केल्याने ही योजना पूर्ण क्षमतेने सुरू होण्यास विलंब होण्याची शक्यता आहे. दर वर्षी एक लाख कृषीपंप वाटपाचे उद्दिष्ट आहे.  या पंपाच्या केंद्र सरकार ३० टक्के, राज्य सरकारच ६० टक्के अनुदान देणार आहे, तर लाभार्थी हिस्सा १० टक्के असणार आहे. या योजनेसाठी राज्य सरकारने सुमारे २ हजार कोटींची तरतूद केली आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून रडलेली योजना सुरू करण्यासाठी काही विक्रेत्यांनी स्वारस्य दाखवून जुन्याच दराने काम करण्याची तयारी दर्शविल्यानंतर महाऊर्जाने योजनेसाठीची नाव नोंदणी सुरू केली आहे. ९ वितरकांकडून ३ हजार ८०० सौरपंप वितरणाची तयारी दर्शविली आहे. तर महाऊर्जाकडे १४ हजार दाखल झाल्याने स्पर्धा निर्माण झाली आहे. यामुळे प्रथम पैसे भरणाऱ्या लाभार्थ्याला पंपाचे वाटप होणार आहे.  दरम्यान केंद्र सरकारकडून नव्याने स्पर्धात्मक दर जाहीर झाल्यानंतर वितरक पुढे येतील आणि पूर्ण क्षमतेने योजना राज्यात राबविली जाईल, असे महाऊर्जाचे महासंचालक सुभाष डुंबरे यांनी स्पष्ट केले आहे. दर वर्षी १ लाख सौर पंपाचे उद्दिष्ट असून, आगमी ५ वर्षांत राज्यात ५ लाख सौरपंप वाटपाचे उद्दिष्ट असल्याचे डुंबरे यांनी सांगितले. तर इच्छुकांनी महाऊर्जाच्या संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज करण्याचे आवाहन महाऊर्जाकडून करण्यात आले आहे.  असे आहेत दर  अश्‍वशक्ती --- दर रुपयांमध्ये  ३ --- १ लाख ८५ हजार  ५ --- २ लाख ५८ हजार  ७.५ --- ३ लाख ५८ हजार 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com