Agriculture News in Marathi Of solar pumps Kusum scheme finally started | Page 2 ||| Agrowon

सौरकृषी पंपाच्या  कुसुम योजनेला अखेर प्रारंभ 

टीम अॅग्रोवन
रविवार, 19 सप्टेंबर 2021

उच्च न्यायालयाने स्थगिती दिल्यामुळे गेली अनेक दिवस रखडलेली सौर कृषी पंपासाठी असणाऱ्या कुसुम योजनेला अखेर प्रारंभ झाला आहे.

पुणे : उच्च न्यायालयाने स्थगिती दिल्यामुळे गेली अनेक दिवस रखडलेली सौर कृषी पंपासाठी असणाऱ्या कुसुम योजनेला अखेर प्रारंभ झाला आहे. राज्यात महाऊर्जाद्वारे राबविण्यात येणाऱ्या या योजनेसाठी १४ हजार अर्ज प्राप्त झाले असून, लाभार्थी हिश्‍श्‍याचे १० टक्के रक्कम पहिल्यांदा भरणाऱ्या लाभार्थ्यास प्रथम पंपाचे वाटप होणार आहे. दरम्यान केंद्र सरकारने अद्याप स्पर्धात्मक दर जाहीर न केल्याने ही योजना पूर्ण क्षमतेने सुरू होण्यास विलंब होण्याची शक्यता आहे. दर वर्षी एक लाख कृषीपंप वाटपाचे उद्दिष्ट आहे. 

या पंपाच्या केंद्र सरकार ३० टक्के, राज्य सरकारच ६० टक्के अनुदान देणार आहे, तर लाभार्थी हिस्सा १० टक्के असणार आहे. या योजनेसाठी राज्य सरकारने सुमारे २ हजार कोटींची तरतूद केली आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून रडलेली योजना सुरू करण्यासाठी काही विक्रेत्यांनी स्वारस्य दाखवून जुन्याच दराने काम करण्याची तयारी दर्शविल्यानंतर महाऊर्जाने योजनेसाठीची नाव नोंदणी सुरू केली आहे. ९ वितरकांकडून ३ हजार ८०० सौरपंप वितरणाची तयारी दर्शविली आहे. तर महाऊर्जाकडे १४ हजार दाखल झाल्याने स्पर्धा निर्माण झाली आहे. यामुळे प्रथम पैसे भरणाऱ्या लाभार्थ्याला पंपाचे वाटप होणार आहे. 

दरम्यान केंद्र सरकारकडून नव्याने स्पर्धात्मक दर जाहीर झाल्यानंतर वितरक पुढे येतील आणि पूर्ण क्षमतेने योजना राज्यात राबविली जाईल, असे महाऊर्जाचे महासंचालक सुभाष डुंबरे यांनी स्पष्ट केले आहे. दर वर्षी १ लाख सौर पंपाचे उद्दिष्ट असून, आगमी ५ वर्षांत राज्यात ५ लाख सौरपंप वाटपाचे उद्दिष्ट असल्याचे डुंबरे यांनी सांगितले. तर इच्छुकांनी महाऊर्जाच्या संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज करण्याचे आवाहन महाऊर्जाकडून करण्यात आले आहे. 

असे आहेत दर 
अश्‍वशक्ती --- दर रुपयांमध्ये 
३ --- १ लाख ८५ हजार 
५ --- २ लाख ५८ हजार 
७.५ --- ३ लाख ५८ हजार 


इतर अॅग्रो विशेष
हडपलेला शेतकरीवाटा जमा करण्यासाठी नोटिसापुणे ः राज्यात शेती अवजारे न वाटताच कोट्यवधी...
शेतकरी आंदोलक नव्या रणनीतीच्या तयारीतनवी दिल्ली : तीन कृषी कायद्यांविरोधातील १०...
अॅपलबेरचे निर्यातक्षम उत्पादन. पुणे जिल्ह्यातील खानापूर (ता. जुन्नर) येथील...
सुयोग्य व्यवस्थापनातून हरभरा पिकात तयार...बुलडाणा जिल्ह्यातील सवडद येथील विनोद देशमुख यांनी...
विपरीत परिस्थितीत तग धरणाऱ्या...नागपूर ः दुष्काळी भागात नाचणी पीक तग धरू शकते....
दिवाळीनंतरच कृषी महाविद्यालये गजबजणारपुणे ः राज्यात कोविडमुळे बंद पडलेले कृषी...
यूपी सरकारची भूमिका वेळकाढूपणाचीनवी दिल्ली ः उत्तरप्रदेशातील लखीमपूर खिरी येथील...
पावसाची उघडीप राहणारपुणे : बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या...
हरभरा बियाणे वितरणासाठी कृषी विभागाची...पुणे ः राज्यातील रब्बी हंगामात हरभऱ्याचे क्षेत्र...
इथेनॉलनिर्मिती १५० कोटी लिटरच्या पुढे...पुणे ः राज्याची एकूण इथेनॉलनिर्मिती क्षमता येत्या...
‘सिबिल’वर ठरतेय कर्जदाराची पतसोलापूर : रिझर्व्ह बॅंकेच्या निकषांनुसार आता...
पूर्णाथडी म्हशीला राजमान्यतेचा प्रस्ताव...अकोला ः पूर्णा नदीच्या खोऱ्यात आढळणाऱ्या फिकट...
देशी गाईंच्या प्रजातींचे संवर्धन गरजेचेपुणे : देशात गाईच्या पारंपरिक जाती नष्ट...
पहिली उचल ३३०० द्यावी ः राजू शेट्टी...कोल्हापूर : यंदा तुटणाऱ्या उसाला पहिली उचल ३३००...
कृषी पदव्युत्तर प्रवेशासाठी १३...पुणे ः राज्यातील कृषी विद्यापीठांमधील पदव्युत्तर...
ट्रॅक्टरचलित विविध यंत्रांद्वारे वेळ,...ट्रॅक्टरचलित यंत्राच्या साह्याने पेरणी वा कोळपणी...
हमीभाव खरेदी केंद्राचा चेंडू राज्य...नागपूर ः भारतीय कापूस महामंडळाने खुल्या बाजारातून...
हातातोंडाशी आलेला घास पावसाने हिरावलाअकोला ः मागील ४८ तासांत वऱ्हाडातील अकोला, वाशीम,...
हेकेखोर विमा कंपन्यांनी वेठीस धरलेपुणे ः शेतकऱ्यांना विमा भरपाई मिळण्यासाठी...
खानदेशात केळीला ११८० रुपये दरजळगाव ः खानदेशात केळीचे दर कमी अधिक होत आहेत....