नगर जिल्ह्यातील पाचशे शेतकऱ्यांनी मागितले सौरपंप

नगर जिल्ह्यातील पाचशे शेतकऱ्यांनी मागितले सौरपंप
नगर जिल्ह्यातील पाचशे शेतकऱ्यांनी मागितले सौरपंप

नगर  : शेतकऱ्यांना विनाविघ्न व शाश्‍वत वीजपुरवठा करण्यासाठी सरकारने ‘मुख्यमंत्री सौरयोजना'' आणली. शेतकऱ्यांचे ऑनलाइन अर्ज मागवून, मागणीप्रमाणे त्यांना तीन किंवा पाच अश्‍वशक्ती क्षमतेचे सौरपंप देण्यात येणार आहेत. या योजनेला जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी चांगला प्रतिसाद दिल्याचे दिसत असून, अवघ्या दीड महिन्यात ५०० शेतकऱ्यांनी ऑनलाइन अर्ज भरले. त्यांतील दहा जणांना कोटेशनही देण्यात आले.

बिघाड होऊन वारंवार वीजपुरवठा खंडित होणे, विद्युत अपघात, विद्युतचोरी आदी प्रकारांमुळे सरकारला अखंडित व शाश्‍वत वीजपुरवठा करण्याचे उद्दिष्ट साध्य करता येत नाही. याला पर्याय म्हणून शेतकऱ्यांना कृषी वापरासाठी पारेषणविरहित सौर कृषिपंप देण्यात येणार आहेत. पाच एकरांपेक्षा कमी शेतजमीन असलेल्या शेतकऱ्यांना तीन, तर त्यापेक्षा अधिक शेतजमीन असलेल्या शेतकऱ्यांना पाच अश्‍वशक्ती क्षमतेचा सौरपंप देण्यात येत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दिवसा सिंचन करणेही शक्‍य होईल. हा सौरपंप सवलतीत उपलब्ध करून देण्यात येत असून, त्यासाठी महावितरणच्या पोर्टलवर ऑनलाइन अर्ज मागविण्यात येत आहेत. या योजनेचा जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी फायदा घेण्याचे आवाहन महावितरणच्या वित्त व लेखा विभागाचे व्यवस्थापक विश्‍वनाथ निर्वाण यांनी केले.

किती भरावी लागणार रक्कम? तीन अश्‍वशक्तीच्या सौरपंपाची किंमत दोन लाख ५५ हजार रुपये आहे. या योजनेद्वारे हा पंप सर्वसाधारण गटातील लाभार्थींना २५ हजार व अनुसूचित जाती- जमातीच्या शेतकऱ्याला १२ हजार ७०० रुपयांना मिळेल. पाच अश्‍वशक्तीच्या पंपाची किंमत तीन लाख ८५ हजार आहे. सर्वसाधारण गटातील लाभार्थींना तो ३८ हजार ५००, तर अनुसूचित जाती- जमातीच्या लाभार्थींना १९ हजार २५० रुपयांना मिळेल.

संचासोबत आणखी काय? परंपरागत वीजजोडणी नसलेले शेतकरी या योजनेसाठी पात्र आहेत. महावितरणने यासाठी स्वतंत्र पोर्टल बनविले असून, सातबारा उतारा आणि आधार कार्ड या किमान कागदपत्रांवरून ऑनलाइन अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. लाभार्थींना सौरऊर्जा संचासमवेत विद्युतपंप व कंट्रोल पॅनल मिळणार आहेत. याशिवाय गरज लक्षात घेऊन दोन एलईडी, मोबाईल आणि बॅटरी चार्जिंग सॉकेटही देण्यात येणार आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com