Agriculture news in marathi Like soldiers, the safety of doctors is important: Chhagan Bhujbal | Agrowon

सैनिकांप्रमाणे डाॅक्टरांचीही सुरक्षितता महत्त्वाची ः छगन भुजबळ

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 21 एप्रिल 2020

नाशिक : देशभरात ‘कोरोना’चा प्रादुर्भाव वाढत असून सीमेवर लढणाऱ्या जवानांप्रमाणे रुग्णांच्या जीवासाठी ‘कोरोना’शी लढा देणाऱ्या डॉक्टरांची सुरक्षितता तेवढीच महत्त्वाची आहे. त्या दृष्टीने राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या पुढाकाराने राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्टच्या वतीने देणगी नव्हे तर डॉक्टरांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी फेस शिल्ड मास्कचे वितरण करण्यात येत आहे, असे प्रतिपादन अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी केले.

नाशिक : देशभरात ‘कोरोना’चा प्रादुर्भाव वाढत असून सीमेवर लढणाऱ्या जवानांप्रमाणे रुग्णांच्या जीवासाठी ‘कोरोना’शी लढा देणाऱ्या डॉक्टरांची सुरक्षितता तेवढीच महत्त्वाची आहे. त्या दृष्टीने राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या पुढाकाराने राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्टच्या वतीने देणगी नव्हे तर डॉक्टरांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी फेस शिल्ड मास्कचे वितरण करण्यात येत आहे, असे प्रतिपादन अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी केले.

इंडियन मेडिकल असोसिएशनच्या नाशिक शाखेत खासगी सेवा देणाऱ्या डॉक्टरांच्या सुरक्षेच्या दृष्टीने राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्टच्या वतीने कृतज्ञता म्हणून रविवारी (ता. १९) फेस शिल्ड मास्कचे वितरण श्री. भुजबळ यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी माजी खासदार समीर भुजबळ, आमदार हेमंत टकले, जिल्हाध्यक्ष अॅड. रवींद्र पगार, कोंडाजी आव्हाड, शहराध्यक्ष रंजन ठाकरे, राष्ट्रवादी डॉक्टर सेलचे शहराध्यक्ष डॉ. अमोल वाजे, इंडियन मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. समीर चंद्रात्रे, सचिव डॉ. सुदर्शन आहिरे, उपाध्यक्ष डॉ. प्राजक्ता लेले, खजिनदार डॉ. प्रशांत सोनावणे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

‘कोरोना’च्या बचावासाठी खासगी रुग्णालये सुरू ठेवण्याच्या सूचना राज्य शासनाच्या वतीने देण्यात आल्या आहेत. संपूर्ण जग ‘कोरोना’शी लढत असताना डॉक्टर आपला जीव धोक्यात घालून रुग्णांचे प्राण वाचविण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावत असून त्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्टच्या वतीने फेस शिल्ड मास्क तयार करण्यात आले आहे. 
खासगी डॉक्टर आणि त्यांच्या स्टाफला राष्ट्रवादी डॉक्टर सेल व इंडियन मेडिकल असोसिएशनच्या समन्वयातून साहित्य वाटप करण्यात येत आहे. राज्यभरातील दीड लाख डॉक्टरांना फेस शिल्ड मास्कचे वाटप करण्यात येत असून याची सुरवात नाशिक येथून करण्यात आल्याचे यावेळी सांगण्यात आले. 
 


इतर ताज्या घडामोडी
सोलापूर जिल्ह्यात पावसामुळे महावितरणचे...सोलापूर ः महावितरणच्या अकलूज, पंढरपूर व...
वळण योजना प्रकल्प पूर्ण करा : भुजबळनाशिक : ‘‘जिल्ह्यातील पाणी पश्चिमेकडे वाहून...
कृषीकन्येकडून शेतकऱ्यांना मार्गदर्शनबदलापूर (जि.ठाणे) ः कृषी कार्यानुभव...
मालेगावात कांदा निर्यातबंदीच्या...मालेगाव, जि. नाशिक : गेल्या महिन्यात कांद्याला...
सोलापुरातील शेतकऱ्यांनो कृषी...सोलापूर : यंदाच्या वर्षासाठीची कृषी यांत्रिकीकरण...
जीवामृत निर्मितीचे प्रात्यक्षिकनशिराबाद, जि. बुलडाणाः येथील कृषीकन्या भाग्यश्री...
हिंगोलीतील सहा मंडळात अतिवृष्टीहिंगोली :जिल्ह्यात मंगळवारी (ता.२२) सकाळी...
द्राक्ष उत्पादकांची व्यापारी,...नाशिक : सुमारे ९५ टक्के द्राक्ष व्यापारी हे...
जळगाव जिल्ह्यात केळी उत्पादकांना विमा...जळगाव : शेतकरी प्रश्‍नी शरद जोशी प्रणित शेतकरी...
दुधना नदीला पूर, पिकांत पाणीच पाणीपरभणी : सेलू तालुक्यातील ब्रम्हवाकडी येथील निम्न...
उदगीरमधील ‘देवर्जन’ सात वर्षांनंतर भरलाउदगीर : देवर्जन (ता. उदगीर) येथील मध्यम...
बीड, लातूरमधील मंडळांत दमदार पाऊसऔरंगाबाद : औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद,...
गिरणा पट्ट्यात पूर ओसरताच वाळूचा उपसा...जळगाव : गिरणा परीसरातील शेतकऱ्यांना पूर,...
सेस रद्द करा, अन्यथा बंद पुकारूपुणे ः केंद्र सरकारच्या कृषी आणि पणन विषयक तीन...
जळगावात बाजार समित्या बरखास्तीचे राजकारणजळगाव ः जिल्ह्यात दोन्ही काँग्रेस, शिवसेनेची...
शेतकऱ्यांसाठी सुखावणारा कायदा ः...कोल्हापूर ः शेती उत्पन्न व्यापार आणि वाणिज्य...
बुलडाण्यात दहा हजार हेक्टरवर क्षेत्र...बुलडाणा ः जिल्ह्यात शनिवार (ता. १९) व रविवारी (ता...
सिंधुदुर्ग जिल्ह्याला मुसळधार पावसाने...सिंधुदुर्ग ः जिल्ह्याच्या काही भागाला सोमवारी (ता...
अखेर ६६५ शेतकऱ्यांना विम्याचा लाभअकोला ः  सन २०१९ च्या खरीप हंगामात पंतप्रधान...
संत्रा वाहतुकीसाठी रेल्वेकडून वरूड...अमरावती : किसान रेल्वेच्या माध्यमातून येत्या...