कोल्हापूर : महाराष्ट्रातील साखर कारखान्यांना वाहतूक अनुदान देण्याबाबत हालचाली सुरू झाल्या
ताज्या घडामोडी
घनकचरा पथदर्शी प्रकल्पांसाठी सिंधुदुर्ग जिल्ह्याची निवड
स्वच्छ भारत मिशनच्या दुसऱ्या टप्प्यातर्गंत राबविण्यात येणाऱ्या गावोगावी घनकचरा व सांडपाणी पथदर्शी प्रकल्पासाठी राज्य शासनाने सिंधुदुर्ग जिल्ह्याची निवड केली आहे.
वैभववाडी : स्वच्छ भारत मिशनच्या दुसऱ्या टप्प्यातर्गंत राबविण्यात येणाऱ्या गावोगावी घनकचरा व सांडपाणी पथदर्शी प्रकल्पासाठी राज्य शासनाने सिंधुदुर्ग जिल्ह्याची निवड केली आहे. या प्रकल्पातर्गंत प्रकल्प व्यवस्थापनाकरीता लोकसंख्येनुसार प्रतिव्यक्ती निधी दिला जाणार आहे.
स्वच्छ भारत मिशनच्या दुसऱ्या टप्प्यात ग्रामीण भागातील जीवनमानाचा दर्जा सुधारण्याच्या दृष्टीने वैयक्तिक स्वच्छता, शाळा व अंगणवाडीमध्ये शौचालय सुविधा, घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन आदी घटकांची अंमलबजावणी केंद्र शासनाच्या सूचनांनुसार करण्यात येत आहे. दरम्यान, सिंधुदुर्ग जिल्ह्यासह वर्धा, सातारा, कोल्हापूर या जिल्ह्यांची देखील निवड केली आहे.
असा येईल निधी
सिंधुदुर्ग जिल्ह्यात एकूण ७४४ महसुली गावे असून ४३१ ग्रामपंचायती आहेत. या सर्व गावांमध्ये घनकचरा आणि सांडपाणी प्रकल्प राबविण्यात येणार आहे. यातील घनकचरा व्यवस्थापनाकरीता गावाच्या लोकसंख्येनुसार प्रती व्यक्ती रक्कम दिली जाणार आहे. ५ हजारांपर्यंत लोकसंख्या असलेल्या गावांकरिता व्यवस्थापनकरिता प्रती व्यक्ती ६० रुपये तर त्यापेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या महसुली गावांकरिता प्रतिव्यक्ती ४५ रुपये निधी देण्यात येणार आहे. सांडपाणी व्यवस्थापनाकरीता ५ हजार लोकसंख्येपर्यंतच्या गावांना प्रती व्यक्ती २८० रुपये तर त्यापेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या महसुली गावांना प्रती व्यक्ती ६६० रुपये देण्यात येणार आहेत. महसुली गावांना सांडपाणी व्यवस्थापनाकरीता किमान ५० हजार रुपये व घनकचरा प्रकल्प व्यवस्थापनाकरीता किमान ५० हजार रुपये निधी दिला जाणार आहे.
अशी होतील कामे
या प्रकल्पांतर्गत वैयक्तिक स्तरावर खत खड्डे, तर सार्वजनिक स्तरावर खत खड्डे, गांडूळखत या शिवाय विविध तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे. शोषखड्डे, मॅजिक पिट, तलाव, पाझर खड्डे आदी गोष्टी करता येणार आहेत. कचरा एकत्र करण्याकरिता बॅटरी ऑपरेटेड व मॅन्युअल सायकल देण्यात येणार आहे. प्लास्टिक निमुर्लनकरीता प्लास्टिक कलेक्शन युनिट गावस्तरावर उभारण्यात येणार आहे. महसुल आणि गावस्तरावर गोळा केलेले प्लास्टिक प्रक्रियेसाठी तालुका स्तरावर प्लास्टिक प्रकिया युनिट उभारण्यात येणार आहे. त्याकरिता १६ लाखांचा निधी देण्यात येणार आहे. या प्रकल्पातर्गंत गावनिहाय आराखडे तयार करण्याचे काम सध्या जिल्ह्यात सुरू झाले आहे.
वैभववाडी : स्वच्छ भारत मिशनच्या दुसऱ्या टप्प्यातर्गंत राबविण्यात येणाऱ्या गावोगावी घनकचरा व सांडपाणी पथदर्शी प्रकल्पासाठी राज्य शासनाने सिंधुदुर्ग जिल्ह्याची निवड केली आहे. या प्रकल्पातर्गंत प्रकल्प व्यवस्थापनाकरीता लोकसंख्येनुसार प्रतिव्यक्ती निधी दिला जाणार आहे.
स्वच्छ भारत मिशनच्या दुसऱ्या टप्प्यात ग्रामीण भागातील जीवनमानाचा दर्जा सुधारण्याच्या दृष्टीने वैयक्तिक स्वच्छता, शाळा व अंगणवाडीमध्ये शौचालय सुविधा, घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन आदी घटकांची अंमलबजावणी केंद्र शासनाच्या सूचनांनुसार करण्यात येत आहे. दरम्यान, सिंधुदुर्ग जिल्ह्यासह वर्धा, सातारा, कोल्हापूर या जिल्ह्यांची देखील निवड केली आहे.
असा येईल निधी
सिंधुदुर्ग जिल्ह्यात एकूण ७४४ महसुली गावे असून ४३१ ग्रामपंचायती आहेत. या सर्व गावांमध्ये घनकचरा आणि सांडपाणी प्रकल्प राबविण्यात येणार आहे. यातील घनकचरा व्यवस्थापनाकरीता गावाच्या लोकसंख्येनुसार प्रती व्यक्ती रक्कम दिली जाणार आहे. ५ हजारांपर्यंत लोकसंख्या असलेल्या गावांकरिता व्यवस्थापनकरिता प्रती व्यक्ती ६० रुपये तर त्यापेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या महसुली गावांकरिता प्रतिव्यक्ती ४५ रुपये निधी देण्यात येणार आहे.
सांडपाणी व्यवस्थापनाकरीता ५ हजार लोकसंख्येपर्यंतच्या गावांना प्रती व्यक्ती २८० रुपये तर त्यापेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या महसुली गावांना प्रती व्यक्ती ६६० रुपये देण्यात येणार आहेत. महसुली गावांना सांडपाणी व्यवस्थापनाकरीता किमान ५० हजार रुपये व घनकचरा प्रकल्प व्यवस्थापनाकरीता किमान ५० हजार रुपये निधी दिला जाणार आहे.
अशी होतील कामे
या प्रकल्पांतर्गत वैयक्तिक स्तरावर खत खड्डे, तर सार्वजनिक स्तरावर खत खड्डे, गांडूळखत या शिवाय विविध तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे. शोषखड्डे, मॅजिक पिट, तलाव, पाझर खड्डे आदी गोष्टी करता येणार आहेत. कचरा एकत्र करण्याकरिता बॅटरी ऑपरेटेड व मॅन्युअल सायकल देण्यात येणार आहे.
प्लास्टिक निमुर्लनकरीता प्लास्टिक कलेक्शन युनिट गावस्तरावर उभारण्यात येणार आहे. महसुल आणि गावस्तरावर गोळा केलेले प्लास्टिक प्रक्रियेसाठी तालुका स्तरावर प्लास्टिक प्रकिया युनिट उभारण्यात येणार आहे. त्याकरिता १६ लाखांचा निधी देण्यात येणार आहे. या प्रकल्पातर्गंत गावनिहाय आराखडे तयार करण्याचे काम सध्या जिल्ह्यात सुरू झाले आहे.
- 1 of 1098
- ››