agriculture news in Marathi solution on pollution will be soon Maharashtra | Agrowon

प्रदूषणावर तोडग्यासाठी लवकरच कायदा : केंद्र

वृत्तसेवा
मंगळवार, 27 ऑक्टोबर 2020

शेतातील काडीकचरा जाळण्याचे प्रकार रोखण्याच्या उद्देशाने उपाय योजना सुचविण्यासाठी निवृत्त न्या. मदन बी. लोकूर यांची एक सदस्यीय समिती स्थापन करण्याच्या आपल्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी (ता.२६) स्थगिती दिली आहे.

नवी दिल्ली : शेतातील काडीकचरा जाळण्याचे प्रकार रोखण्याच्या उद्देशाने उपाय योजना सुचविण्यासाठी निवृत्त न्या. मदन बी. लोकूर यांची एक सदस्यीय समिती स्थापन करण्याच्या आपल्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी (ता.२६) स्थगिती दिली आहे. 

प्रदूषणाबाबत एक सर्वसमावेशक कायदा केंद्र सरकार आणणार असून यात काडीकचरा जाळण्याबाबतही धोरण ठरविण्यात येणार आहे, अशी भूमिका केंद्र सरकारने न्यायालयात मांडल्यानंतर सरन्यायाधीश शरद बोबडे यांच्या अध्यक्षतेखालील समितीने स्थगितीचा आदेश दिला. 

उत्तर प्रदेश, पंजाब आणि हरियाना या राज्यांमध्ये शेतातील काडीकचरा जाळल्यामुळे मोठ्या प्रमाणावर धूर निर्माण होऊन दिल्लीतील प्रदूषणात भर पडत असल्याचे दिसून आले आहे. प्रदूषणामुळे लोकांचा जीव गुदमरत असल्याने ही समस्या सोडविण्यासाठी लवकरात लवकर प्रयत्न करायला हवेत, असे खंडपीठाने सांगितले. यावर केंद्र सरकारतर्फे महाधिवक्ता तुषार मेहता म्हणाले की, याबाबत केंद्र सरकारने सर्वसमावेशक दृष्टीकोन स्वीकारला असून प्रदूषणाला आळा घालणाऱ्या प्रस्तावित कायद्याचा मसुदा चार दिवसांतच न्यायालयात सादर केला जाईल. यानंतर सर्वोच्च न्यायालयाने १६ ऑक्टोबरला समिती स्थापन करण्याबाबतच्या आपल्या निर्णयाला स्थगिती दिली. 


इतर बातम्या
चक्रीवादळांचा तडाखा यंदा वाढलापुणे : चक्रीवादळ निर्मिती नैसर्गिक असली, तरी...
खानदेशात यात्रांअभावी अनेकांवर...सोनगीर, जि. धुळे  : खानदेशात पावसाळा वगळता...
नाशिक जिल्ह्यात रब्बीच्या पेरणीसाठी...गिरणारे, जि. नाशिक : खरीप हंगामातील भात, भुईमूग,...
खांबाळे, पडवणे येथील आंबा, काजूची ६००...सिंधुदुर्ग ः जिल्ह्यातील खांबाळे (ता....
बोडखा येथे ‘स्वाभिमानी’चे झाडावर...बुलडाणा : केंद्र सरकारने पारित केलेले शेतकरी...
औरंगाबादमध्ये केंद्राच्या कृषी...औरंगाबाद : केंद्र सरकारने पारित केलेले तीन कृषी...
खानदेशात सव्वा लाख हेक्टरवर पेरणीजळगाव : खानदेशात मक्याची लागवड सुरूच आहे. रब्बी...
परभणी जिल्ह्यात कापूस विक्रीच्या...परभणी : ‘‘राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन...
नाशिक विभागात रोज एक लाख टन उसाचे गाळपनगर  ः नाशिक विभागातील ३२ पैकी २५ साखऱ...
औरंगाबाद, नगर जिल्ह्यात कापसाची ३४ हजार...औरंगाबाद : राज्य कापूस उत्पादक पणन महासंघाच्या...
कृषी कायद्यांविरोधात साताऱ्यात धरणेसातारा : शेतकरी विरोधी कायदे मागे घेण्यासाठी...
साखरेची ‘एमएसपी’पेक्षा कमी किमतीने मागणीकोल्हापूर : देशांतर्गत बाजारात साखरेची विक्री...
जालना जिल्ह्यात दहा हजार क्‍विंटलवर...जालना : ‘‘जिल्ह्यात मक्याची किमान आधारभूत...
काजू उत्पादकांना दिलासामुंबई : महाविकास आघाडी सरकारने राज्यातील काजू...
का येताहेत चक्रीवादळे? भारताच्या पूर्व भागात असलेला बंगालचा उपसागर,...
कृषी कायद्यांविरोधात राज्यात...पुणे ः केंद्र सरकारने मंजूर केलेल्या कृषी आणि पणन...
किसान समन्वय समितीचा अकोले येथे मोर्चा नगर ः केंद्र सरकारने केलेल्या कृषी कायद्यांना...
महिनाभर जमीन आरोग्य सुधार अभियानऔरंगाबाद : जमिनीच्या सुपीकतेवर भर देण्याची गरज...
दक्षिण भारतात मुसळधार पाऊसपुणे ः बंगालच्या उपसागरात तयार झालेले बुरेवी...
खत विक्रीत वाढपुणे : देशात कोविड १९ ची समस्या तसेच लॉकडाउन...