agriculture news in marathi, Solve the crop insurance question in eight days: `Swabhimani` demand | Agrowon

पीकविमा प्रश्‍न आठ दिवसांत सोडवा : `स्वाभिमानी`ची मागणी
टीम अॅग्रोवन
शनिवार, 20 जुलै 2019

विमा कंपन्या सरकारपेक्षाही मोठ्या झाल्या आहेत का? सत्तेतील शिवसेनेने मोर्चे काढण्यापेक्षा मंत्र्यांना व विमा कंपन्यांना जाब विचारावा. जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या विम्याचा प्रश्‍न आठ दिवसांत सोडवा, अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले जाईल.
- विजय रणदिवे, जिल्हा संघटक, स्वाभिमानी शेतकरी संघटना
 

सोलापूर : शेतकऱ्यांनी विमा काढावा, यासाठी केंद्र सरकार एकीकडे कोट्यवधींच्या जाहिराती करत आहे. विम्याची रक्‍कम बॅंकेत भरून देखील बॅंकांच्या चुकीमुळे, विमा कंपन्यांच्या ढिसाळ कारभारामुळे शेतकऱ्यांना सरकारी कार्यालयाचे उंबरठे झिजवावे लागत आहेत. हा प्रश्‍न आठ दिवसांत सोडवा, अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येईल, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दिला.

स्टेट बॅंक ऑफ इंडिया, युनियन बॅंक ऑफ इंडिया आणि बॅंक ऑफ इंडिया या तीन बॅंकांच्या ढिसाळ कारभारामुळे सांगोला, पंढरपूर व माढा तालुक्‍यातील शेतकरी विम्यापासून वंचित राहिले आहेत. विमा कंपनी आणि राष्ट्रीयकृत बॅंका शेतकऱ्यांना दाद देत नाहीत. त्यामुळे निराश शेतकरी आता जिल्हाधिकारी कार्यालय व कृषी विभागाच्या कार्यालयाची वाट धरू लागले आहेत.

माढा तालुक्‍यातील शेतकऱ्यांनी विम्याची भरलेली रक्कम परत त्यांच्या खात्यावर जमा झाल्याची तक्रार केली. ती घेऊन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा कार्याध्यक्ष शिवाजी पाटील यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात धाव घेतली.

माढा तालुक्‍यातील काही शेतकऱ्यांनी विम्याची रक्कम चुकीच्या खात्यावर भरल्याने त्यांना या योजनेचा लाभ घेता आला नाही. त्यांना या योजनेचा लाभ द्यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली. सांगोला आणि पंढरपुरातही असेच काही प्रकार घडले आहेत, असेही त्यांनी सांगितले.

इतर ताज्या घडामोडी
सिंधूताई विखे पाटील यांचे निधनशिर्डी, जि. नगर : दिवंगत माजी खासदार बाळासाहेब...
महाजनादेश यात्रेला बुधवारपासून नंदूरबार...नंदुरबार ः राज्यातील पूरस्थितीमुळे स्थगित झालेली...
पुणे बाजार समिती प्रशासकपदी वर्णी...पुणे  : पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे...
प्रतिकूल हवामानामुळे जुन्नर तालुक्यातील...नारायणगाव, जि. पुणे  : दोन महिन्यांपासून...
नगर जिल्ह्यातील दहा ते अकरा तालुक्यांवर...नगर  ः राज्याच्या काही भागांत जोरदार पावसाने...
पीक नुकसानीबाबत शेतकऱ्याने मांडली कृषी... कऱ्हाड, जि. सातारा ः घरात हुतं नव्हतं...
खानदेशात कापूस पिकात मर रोग, मूळकूजजळगाव ः खानदेशात जळगाव, धुळे व नंदुरबार...
...अन् नारायण राणे काँग्रेसमध्ये गेले...मुंबई  ः कोणताही अन्याय सहन करायचा नाही, या...
सिंधुदुर्ग जिल्ह्यात केळी, नारळ, सुपारी... सिंधुदुर्ग  ः कुणी तीन लाख तर कुणी दोन...
राष्ट्रपतींनी घेतला सूतकताईचा अनुभववर्धा  ः राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी...
पीएच.डी.साठी गुरुवारी सामाईक प्रवेश...पुणे ः  राज्यातील चारही कृषी विद्यापीठांतील...
विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस-... भंडारा  ः विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेस...
कोयना धरणातून ६७ टीएमसी पाण्याचा विसर्गसातारा : या महिन्याच्या सुरवातीपासून मुसळधार...
मराठवाड्यात पाणीसाठ्याची स्थिती विदारकऔरंगाबाद : अर्धा पावसाळा लोटला तरीही मराठवाड्यात...
बुलडाणा जिल्ह्यात निर्माण झाली १३२५...बुलडाणाः जिल्हा प्रशासन व भारतीय जैन संघटना...
कोकणात नुकसानभरपाईचे वेगळे निकष लावा :...रत्नागिरी : ‘‘सांगली, कोल्हापूरप्रमाणेच कोकणातील...
सिंधुदुर्गात अतिवृष्टीने महावितरणचे चार...सिंधुदुर्ग : जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टी आणि...
शेतीमध्ये रासायनिक खतांचा वापर...जालना : सेंद्रिय शेतीमध्ये रासायनिक खतांचा...
परभणी जिल्ह्यात पाण्याअभावी फळबाग...परभणी : जिल्ह्यात गतवर्षीची दुष्काळी स्थिती आणि...
औरंगाबादेत कांदे १००० ते १६०० रुपये...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...