नगर : ऊसदराच्या पहिल्या हप्त्याचा तिढा सोडवा

नगर: साखर कारखान्यांनी जाहीर केलेली ‘एफआरपी’ नियमानुसार कमी आहे. ‘एफआरपी’चा तिढा तातडीने सोडवावा. अन्यथा, आंदोलन करण्यात येईल, असा इशारा शेतकरी संघटनांनी दिला आहे.
Solve the first installment of sugarcane
Solve the first installment of sugarcane

नगर : साखर कारखान्यांनी जाहीर केलेली ‘एफआरपी’ नियमानुसार कमी आहे. ‘एफआरपी’चा तिढा तातडीने सोडवावा. अन्यथा, आंदोलन करण्यात येईल, असा इशारा शेतकरी संघटनांनी दिला आहे. साखर कारखाने मात्र जाहीर केलेल्या ‘एफआरपी’वरच ठाम आहेत. 

चालू हंगामातील ऊसदराच्या पहिल्या हप्त्याचा तोडगा काढण्यासाठी प्रादेशिक सहसंचालक (साखर) नगर यांच्या मध्यस्थीने सर्व शेतकरी संघटना व साखर कारखाने यांच्यात समन्वयासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक झाली. जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले, शरद जोशी विचार मंच शेतकरी संघटनेचे अध्यक्ष विठ्ठल पवार, उपाध्यक्ष अनंत निकम, शेतकरी संघटनेचे पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष बाळासाहेब पटारे, प्रहार संघटनेचे विनोद सिंह परदेशी, सहायक सहसंचालक (साखर) राजेंद्रकुमार जोशी, रावसाहेब लवांडे, प्रशांत भरड, संदीप बामदळे, हरिभाऊ तुवर आदी उपस्थित होते. 

या बैठकीनंतरही ऊस दराचा तिढा कायम राहिला. शेतकरी संघटनांनी प्रतिटन २८५० रुपये पहिल्या हप्त्याची मागणी केली. मात्र साखर कारखान्यांनी एफआरपी पेक्षा अधिक रकमेचा हप्ता देण्यास असमर्थता दाखविली. त्यामुळे शेतकरी संघटना व साखर कारखाने यांच्यात संघर्षाची ठिणगी पडली आहे.

बैठकीच्या सुरवातीला पटारे यांनी सर्व साखर कारखान्यांना पहिल्या हप्त्यापोटी २८५० रुपये देणे शक्य असल्याचे सांगितले. मागील सलग दोन हंगामात एफआरपी व तोडणी वाहतूक खर्च चालु हंगामातील जाहीर केलेल्या ‘एफआरपी’च्या तुलनेने कमी असताना शेतकऱ्यांना प्रतिटन २५०० रुपयांपेक्षा अधिक दर मिळाला. मात्र चालू हंगामात ‘एफआरपी’मध्ये २८५० रुपयांपर्यंत वाढ होऊनही बहुतेक कारखान्यांचा ‘एफआरपी’चा पहिला हप्ता २००० ते २२०० इतका कमी जाहीर करण्यात आला.

याबाबत आक्षेप घेण्यात आला. गत हंगामात कार्यक्षेत्रात अत्यंत कमी ऊस उपलब्ध होता. तरीही कारखान्यांनी गाळपाचा अट्टहास धरल्याने साखर उताऱ्यात घट झाली. नियमबाह्य गाळप परवाने देण्यात आले. परिणामी, यंदाचा एफआरपी दर घसरला असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. 

अन्यथा, कारखान्यांसमोर गेटबंद आंदोलन

पंधरा दिवसांत प्रतिटन २८५० रुपयांप्रमाणे पहिला हप्ता देण्याचा निर्णय न झाल्यास संघर्ष अटळ आहे. सर्व कारखान्यांसमोर गेट बंद आंदोलन करण्यात येईल, असा इशारा सर्व शेतकरी संघटनांनी दिला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com