Solve power consumer issues as a matter of priority: Energy Minister Raut
Solve power consumer issues as a matter of priority: Energy Minister Raut

वीज ग्राहकांचे प्रश्‍न प्राधान्याने सोडवा ः ऊर्जामंत्री राऊत

कोल्हापूर : सर्व वर्गवारीतील वीज ग्राहकांच्या अखंडित वीजपुरवठ्यासाठी प्रभावी उपाययोजना कराव्यात. त्यात कोणत्याही प्रकारची हयगय करू नये. सातत्याने वीजपुरवठा खंडित होत असल्यास संबंधित जबाबदार अधिकारी, कर्मचाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्यात यावी, असे आदेश राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी दिले.

कोल्हापूर : सर्व वर्गवारीतील वीज ग्राहकांच्या अखंडित वीजपुरवठ्यासाठी प्रभावी उपाययोजना कराव्यात. त्यात कोणत्याही प्रकारची हयगय करू नये. सातत्याने वीजपुरवठा खंडित होत असल्यास संबंधित जबाबदार अधिकारी, कर्मचाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्यात यावी, असे आदेश राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी दिले.

पुणे, कोल्हापूर, सांगली, सोलापूर व सातारा जिल्ह्यातील विविध कामांचा ऊर्जामंत्री राऊत यांनी शुक्रवारी (दि. २९) व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आढावा घेतला. यावेळी ते बोलत होते. ऊर्जा विभागाचे प्रधान सचिव आणि महावितरण कंपनीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. दिनेश वाघमारे यावेळी उपस्थित होते.

ऊर्जामंत्री डॉ. राऊत म्हणाले की, कोरोना विषाणूच्या सावटामुळे बंद असलेले व्यवसाय, उद्योग हळूहळू सुरू होत आहेत. यासोबतच शासकीय व खासगी संस्थांच्या कर्मचाऱ्यांचे वर्क फ्रॉम होम देखील सुरू आहे. सध्या उन्हाळा असल्याने अखंडित व सुरळीत वीजपुरवठ्याची अत्यंत गरज आहे. ज्या भागात सातत्याने वीजपुरवठा खंडित होत आहे त्याची गंभीर दखल घेऊन संबंधित जबाबदार व अकार्यक्षम कर्मचारी, कर्मचाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करावी. प्रसंगी वरिष्ठ अधिकाऱ्यांना सुद्धा अशा कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशारा यावेळी त्यांनी दिला.

बारामती परिमंडलामध्ये ‘एक गाव- एक दिवस’ हा वीजयंत्रणेच्या देखभाल व दुरुस्तीचा, नवीन वीजजोडणी व वीजबिल दुरूस्ती मोहिमेचा उपक्रम सुरू आहे. या उपक्रमाचे डॉ. राऊत यांनी कौतुक केले. हा उपक्रम राज्यभरात राबविण्याचे त्यांनी निर्देश दिले. वीजग्राहकांना प्रामुख्याने वीजपुरवठ्याबाबतची माहिती ‘एसएमएस’द्वारे मिळालीच पाहिजे. देखभाल व दुरुस्तीसाठी वीज बंद ठेवण्याची पूर्वसूचना असेल किंवा इतर कारणामुळे वीजपुरवठा खंडित झाल्यास त्याची ग्राहकांना पूर्वसूचना न मिळाल्यास गंभीर दखल घेतली जाईल असे त्यांनी स्पष्ट केले.

आढावा बैठकीत महावितरणचे कोकण विभागाचे सहव्यवस्थापकीय संचालक गोविंद बोडके, संचालक (संचालन) दिनेशचंद्र साबू, संचालक (प्रकल्प) भालचंद्र खंडाईत, संचालक (मानव संसाधन) ब्रिगेडियर (सेवानिवृत्त) पी. के. गंजू, प्रभारी संचालक (वित्त) स्वाती व्यवहारे, पुणे प्रभारी प्रादेशिक संचालक अंकुश नाळे, मुख्य अभियंता सुनील पावडे (बारामती), सचिन तालेवार (पुणे), अंकुर कावळे (प्रभारी, कोल्हापूर) आदींसह पश्चिम महाराष्ट्रातील वरिष्ठ अभियंते, अधिकारी यांची उपस्थिती होती.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com