हमाल, मापाडी तोलणारांचे प्रश्‍न सोडवा ः बाबा आढाव

पुणे ः राज्यातील अनेक भागांत हमाल तोलाईदारांना काम नाकारणे व त्यांची मजुरी आणि लेव्ही माथाडी मंडळात जमा करण्यास नकार देणे आदी प्रकार सुरू आहेत. याप्रश्‍नी महाराष्ट्र राज्य हमाल मापाडी महामंडळाचे अध्यक्ष डॉ. बाबा आढाव यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेतली. यावेळी संबंधित खात्याचे मंत्री उपस्थित होते.
Solve the problems of porters and weighers: Baba Adhav

हमाल, मापाडी, तोलणारांच्या विविध प्रश्‍नांची सोडवणूक करण्यासाठी संबंधित विविध खात्यांच्या मंत्र्यांसोबत बैठक घेण्याची मागणी बाबा आढाव यांनी शरद पवार यांच्याकडे केली होती. त्यानुसार गुरुवारी (ता. ९) पुण्यात ही बैठक झाली. यावेळी अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ, कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील, आमदार शशिकांत शिंदे, पणन संचालक सतीश सोनी, पणन मंडळाचे कार्यकारी संचालक सुनील पवार, माथाडी मंडळाचे अधिकारी उपस्थित होते.

बैठकीत डॉ. आढाव यांनी हमाली, तोलाई, मापाडी यांचे प्रश्‍न मांडले. यावेळी संबंधित तीनही विभागाच्या मंत्र्यांनी हमाल, मापाडी कामगारांच्या समस्या तसेच त्यांच्या मागण्यांबाबत सर्वंकष विचार करून त्यांच्या प्रश्नांच्या सोडवणुकीबाबत सकारात्मक भूमिका घेतल्याचे आढाव यांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com