टोळधाडीमुळे सोमालियात अन्नधान्याचा भयंकर तुटवडा

वाळवंटीय भागात सध्या असलेल्या हवामान स्थितीत टोळचे नवीन प्रजनन होणे शक्य नाही. ही स्थिती त्यांच्यासाठी पोषक नाही. त्यामुळे काही टोळ हे पश्‍चिमी चक्रावातासोबत भारतात परत येण्याची शक्यता आहे. — अमित के. मिना, लोकस्ट वॉर्निंग ऑर्गयाझेशन
locust
locust

नवी दिल्ली ः आफ्रिकेत टोळांचे मोठ्या प्रमाणात प्रजनन होत असल्याने येथील अन्नसुरक्षा धोक्यात आली आहे. विशेषतः सोमालिया देशात अन्नधान्याचा भयंकर तुटवडा निर्माण झाला असून, अनेक भागांत तातडीने मदतीची गरज आहे. तसेच येणाऱ्या हंगामात लोकांची उपजीविकाच धोक्यात येण्याची शक्यता आहे, अशी माहिती संयुक्त राष्ट्रसंघाच्या अन्न आणि कृषी संस्थेने दिली.  आफ्रिकेतील अनेक देशांमध्ये टोळधाडीचा परिणाम जाणवत आहे. सोमालियातील जवळपास ४१ लाख लोकांना भयंकर अन्नधान्याचा तुडवडा जाणवत आहे. या देशातील तब्बल १३ लाख लोकांना तातडीने मानवतावादी दृष्टिकोनातून मदतीची गरज आहे, असे यापूर्वीच संयुक्त राष्ट्रसंघाने सांगितले आहे. देशातील अन्नसुरक्षेला धोका निर्माण होत असल्यामुळे मागील महिन्यात पाकिस्ताननंतर सोमालियाने टोळधाडीला राष्‍ट्रीय आपत्ती जाहीर केली होती.  पाकिस्तानमधील ओकरा, डेरा इस्माइल खान, लक्की मारवट जिल्ह्यांमध्ये आणि बलुचिस्तानच्या काही भागांत नुकतेच जन्मलेले आणि वाढ झालेले टोळधाडीचे थवे पाहावयास मिळाले आहेत. फेब्रुवारी महिन्याच्या शेवटी येथील प्रशासनाने ४ हजार ४९० हेक्टरवर टोळ निर्मूलनाचे काम केले आहे. टोळधाडीचा मागील तीन दशकांतील सर्वात मोठा फटका बसल्याने अन्नधान्याचे दर वाढले असून नकदी पिकांचे नुकसान झाले आहे. टोळधाडीने मागील काही महिन्यांमध्ये भारतातील राजस्थान, गुजरात आणि पंजाबच्या काही भागांत पिकाचे मोठे नुकसान केले. विशेषतः रब्बीतील पिकांना याचा जास्त फटका बसला. हजारो हेक्टरवरील पिके टोळधाडीने फस्त केली होती. जाणकारांच्या मते पश्‍चिमी चक्रावाताबरोबर टोळधाड भारतात परत येण्याची शक्यता आहे. सोमालियाला सर्वाधिक फटका सोमालियातील जवळपास ४१ लाख लोकांना अन्नधान्याचा भयंकर तुडवडा जाणवत आहे. या देशातील तब्बल १३ लाख लोकांना तातडीने मदतीची गरज आहे. वाढत्या नुकसानीमुळे सोमालियाने मागील महिन्यातच टोळधाडीला राष्‍ट्रीय आपत्ती जाहीर केले आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com