Agriculture news in marathi Some brokers try to buy cashew nuts at low rates | Agrowon

कमी दरात काजू खरेदीचा काही दलालांचा प्रयत्न

टीम अॅग्रोवन
बुधवार, 1 एप्रिल 2020

सिंधुदुर्ग ः ‘कोरोना’मुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा फायदा उठविण्याचा प्रयत्न जिल्ह्यात काही दलालांकडून सुरू असून शेतकऱ्यांकडून ५० ते ६० रूपये दराने काजू बी खरेदी केली जात आहे. ‘कोरोना’मुळे आणखी दर कमी होईल, अशी भीती दाखवून काजू खरेदी करण्याचा त्यांचा हेतु आहे. दलालांच्या या भूमिकेमुळे शेतकरी चितेंत आहेत.

सिंधुदुर्ग ः ‘कोरोना’मुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा फायदा उठविण्याचा प्रयत्न जिल्ह्यात काही दलालांकडून सुरू असून शेतकऱ्यांकडून ५० ते ६० रूपये दराने काजू बी खरेदी केली जात आहे. ‘कोरोना’मुळे आणखी दर कमी होईल, अशी भीती दाखवून काजू खरेदी करण्याचा त्यांचा हेतु आहे. दलालांच्या या भूमिकेमुळे शेतकरी चितेंत आहेत.

जिल्ह्यात उत्पादनक्षम काजूचे क्षेत्र ४९ हजार हेक्टर आहे. काजू हे जिल्ह्यातील एकमेव फळपीक आहे. जे जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात घेतले जाते. त्यामुळे काजूला जिल्ह्याचा आर्थिक कणा मानला जातो. काजू व्यवसायातून जिल्ह्यात बाराशे ते पंधराशे कोटीची आर्थिक उलाढाल होते. परंतु यावर्षी लांबलेला पाऊस आणि वातावरणातील सतत बदल काजू उत्पादनाच्या मुळावर आले आहेत. यावर्षी काजूचे उत्पादन जेमतेम २५ टक्केच येईल, अशी अपेक्षा आहे.

मात्र, असे असले तरी जिल्ह्यात गेल्या महिनाभरापासून काजू उत्पादनाला सुरुवात झाली आहे. अतिशय काटेकोर नियोजन केलेल्या शेतकऱ्यांच्या बागेतून काजूचे चांगले उत्पादन मिळत आहे. साधारणपणे फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात काजुला १३० ते १४० रूपये दर मिळत होता. त्यानतंर हा दर अखेरपर्यंत सुरू होता. काजू बी खरेदीची जिल्ह्यातील प्रकिया विविध स्तरावर होते. 

अधिकांश काजू खरेदीदार आठवडा बाजारांमध्ये जाऊन करतात. परंतु मार्चच्या पहिल्या आठवड्यांपासून देशात ‘कोरोना’चा प्रादुर्भाव जाणवू लागला. त्यानतंर तत्काळ जिल्ह्यातील आठवडा बाजारांवर निर्बंध घालण्यात आले. त्यामुळे आपसुकच काजू खरेदी थांबली. याचाच फायदा सध्या दलाल घेत आहे. कोरोनामुळे काजु बीचे दर घसरले आहेत. सध्या ५० ते ६० रूपयेच दर आहे, असे सांगून शेतकऱ्यांची फसवणूक करीत आहेत.

येत्या काही दिवसांत अजूनही काजूचे दर कमी होणार आहेत, असे चित्र शेतकऱ्यांसमोर उभे करून अधिकाधिक काजू कमी दराने खरेदी करण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यामुळे काही बागायतदार कवडीमोल दराने काजूची विक्री करीत आहेत.

‘कोरोना’चा फायदा उठवित काही दलाल कमी दराने काजू बी खरेदी करीत आहेत. मयताच्या टाळू वरील लोणी लाटण्याचा हा प्रकार आहे. अशा दलालांवर शासनाने कडक कारवाई करणे आवश्‍यक आहे. शेतकऱ्यांनी कुणाही दलालांवर विश्‍वास ठेवू नये.
सुशांत नाईक, काजू उत्पादक शेतकरी

५० ते ६० रूपये काजू बी खरेदी करण्याचे प्रकार जिल्ह्यात काही ठिकाणी सुरू आहेत. परंतु जिल्ह्यातील कुणीही शेतकऱ्यांनी कवडीमोल दराने काजू विक्री न करता काजू बी सुकवून तिची व्यवस्थित साठवणूक करून ठेवावी. काजू विक्री करण्यासाठी अजिबात घाई करू नये. जिल्हा बँक शेतकऱ्यांच्या सोबत आहे.
- अतुल काळसेकर, संचालक, सिंधुदुर्ग जिल्हा बँक


इतर ताज्या घडामोडी
बार्शी बाजार समितीत उडीद, मूग हमीभाव...सोलापूर : बार्शी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
नाशिक जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे दाणादाणनाशिक : पावसाळा सुरू झाल्यानंतर अनेक ठिकाणी...
पीक कर्जासाठी बँकेत मुक्कामाची वेळ येऊ...बुलडाणा ः खरीप हंगामातील पिकांच्या काढणीची वेळ...
पाथरूड परिसरातील प्रकल्प तुडुंबपाथरूड, जि. उस्मानाबाद : पाथरूडसह परिसरात...
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ९० टक्के...सिंधुदुर्ग ः जिल्ह्यातील ९० टक्के भातपिकांना...
परभणी, हिंगोलीत अतिवृष्टीमुळे पिकांवर...परभणी : खरीप हंगामातील सोयाबीन काढणीच्या, कापूस...
हिंगोली जिल्ह्यात सोयाबीनच्या शेंगांना...हिंगोली : गतवर्षी प्रमाणे यंदाही सोयाबीनचे पीक ऐन...
‘जायकवाडी’तील विसर्गात घटऔरंगाबाद : जिल्ह्यातील जायकवाडी प्रकल्पातून...
निम्न दुधनातून ७१९० क्युसेकने विसर्गपरभणी : सेलु तालुक्यातील ब्रम्हवाकडी येथील दुधना...
अनुदानाअभावी मर्यादित लाभार्थ्यांना...सिंधुदुर्ग ः कोरोनामुळे शासनाने जिल्हा परिषदेच्या...
ऊसतोडणीच्या तिढ्यावर आज चर्चापुणे : दहा लाख ऊस तोडणी कामगारांच्या मागण्यांबाबत...
यवतमाळ जिल्ह्यात सोयाबीन शेंगांना फुटले...यवतमाळ : खोडकीड, चक्रीभुंगा त्यानंतर आता परिपक्व...
संत्रा उत्पादकांना हेक्टरी लाखाची भरपाई...नागपूर : विदर्भात नैसर्गिक आपत्तीमुळे संत्रा,...
पुण्यात विशिष्ट ठिकाणीच लिंबे विक्रीला...पुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीने...
गाय एका आठवड्यात दोनदा व्यायली नाशिक ः येथील डॉ. इरफान खान हे व्यवसायाने डॉक्टर...
हवामान बदलाचे सेंद्रिय कर्बावरील परिणामजागतिक हवामान बदल आणि जागतिक तापमान वाढ हे शब्द...
पुण्यात भाजीपाल्याच्या आवकेत घटपुणे : गुलटेकडी येथील पुणे कृषी उत्पन्न बाजार...
काही भागात पावसाच्या उघडिपीची शक्यता महाराष्ट्रावर बुधवार (ता.२३) पर्यंत  १००४...
राज्य द्राक्ष बागायतदार संघाची ...नाशिक: महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार...
पांगरी परिसरात पिकांवर आस्मानी संकटपांगरी, जि. सोलापूर ः पांगरी (ता. बार्शी) परिसरात...