Agriculture news in Marathi, Some Congress-NCP MLAs soon become BJP: Chandrakant Patil | Agrowon

कॉंग्रेस-राष्ट्रवादीचे काही आमदार लवकरच भाजपात ः चंद्रकांत पाटील

टीम अॅग्रोवन
शनिवार, 20 जुलै 2019

सोलापूर : कॉंग्रेस-राष्ट्रवादीतील अनेक विद्यमान आमदार भाजप, शिवसेनेमध्ये येण्यासाठी इच्छुक आहेत. येत्या आठ ते दहा दिवसांत इच्छुक आमदार राजीनामा देऊन भाजपात प्रवेश करतील, असा गौप्यस्फोट भाजपचे नवे प्रदेशाध्यक्ष, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी गुरुवारी (ता. १८) केला. पण ते आमदार कोण व त्यांची नावे काय? हे विचारता, ते गुपित आहे, गुपितच राहू द्या, वेळ आली की समजेल, असे उत्तर त्यांनी दिले. 

सोलापूर : कॉंग्रेस-राष्ट्रवादीतील अनेक विद्यमान आमदार भाजप, शिवसेनेमध्ये येण्यासाठी इच्छुक आहेत. येत्या आठ ते दहा दिवसांत इच्छुक आमदार राजीनामा देऊन भाजपात प्रवेश करतील, असा गौप्यस्फोट भाजपचे नवे प्रदेशाध्यक्ष, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी गुरुवारी (ता. १८) केला. पण ते आमदार कोण व त्यांची नावे काय? हे विचारता, ते गुपित आहे, गुपितच राहू द्या, वेळ आली की समजेल, असे उत्तर त्यांनी दिले. 

भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर मंत्री पाटील हे पहिल्यांदाच सोलापूरच्या दौऱ्यावर आले. त्यानंतर त्यांनी शासकीय विश्रामगृहात पत्रकारांशी संवाद साधला. तुम्ही भाजपचे प्रदेशाध्यक्ष झालात म्हणजे मुख्यमंत्रिपदावरचा दावा संपला का? असा थेट प्रश्न विचारता तेव्हा ते म्हणाले, आपण काम करत राहायचं, पदं अनपेक्षितपणे मिळतात. आज प्रदेशाध्यक्ष झालो, पाच वर्षापूर्वी मंत्री झालो, तेव्हा मला काहीच माहीत नव्हतं. पण हे सर्व अनपेक्षितच होतं. मुख्यमंत्रिपदावर मी कधीही दावा केला नाही, त्यामुळे दावा किंवा डावलण्याचा प्रश्‍नच येत नाही, असेही मंत्री पाटील यांनी सांगितले. 

आगामी निवडणुकीत युतीचा २२० जागांवर विजय होईल, असा पुनरुच्चारही त्यांनी केला. कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्यांचा आपल्या कर्तृत्वावरचा विश्‍वास उडाला आहे. त्यामुळेच त्यांचे संघटन भरकटत चालले आहे. असा निशाणाही त्यांनी यावेळी साधला.


इतर ताज्या घडामोडी
रब्बी पेरणीपूर्वी जल, मृद संधारणसपाट जमिनीवर पेरणी पूर्व बांधणी करण्यासाठी व...
नाशिकमध्ये ढोबळी मिरची ३७५० ते ६८७५...नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये ढोबळी...
जेएनपीटी बंदराच्या खासगीकरणाचे प्रयत्न? मुंबई: उरण परिसरातील जेएनपीटीच्या मालकीच्या एकमेव...
सोलापूर जिल्ह्यात पावसामुळे महावितरणचे...सोलापूर ः महावितरणच्या अकलूज, पंढरपूर व...
वळण योजना प्रकल्प पूर्ण करा : भुजबळनाशिक : ‘‘जिल्ह्यातील पाणी पश्चिमेकडे वाहून...
कृषीकन्येकडून शेतकऱ्यांना मार्गदर्शनबदलापूर (जि.ठाणे) ः कृषी कार्यानुभव...
मालेगावात कांदा निर्यातबंदीच्या...मालेगाव, जि. नाशिक : गेल्या महिन्यात कांद्याला...
सोलापुरातील शेतकऱ्यांनो कृषी...सोलापूर : यंदाच्या वर्षासाठीची कृषी यांत्रिकीकरण...
जीवामृत निर्मितीचे प्रात्यक्षिकनशिराबाद, जि. बुलडाणाः येथील कृषीकन्या भाग्यश्री...
हिंगोलीतील सहा मंडळात अतिवृष्टीहिंगोली :जिल्ह्यात मंगळवारी (ता.२२) सकाळी...
द्राक्ष उत्पादकांची व्यापारी,...नाशिक : सुमारे ९५ टक्के द्राक्ष व्यापारी हे...
जळगाव जिल्ह्यात केळी उत्पादकांना विमा...जळगाव : शेतकरी प्रश्‍नी शरद जोशी प्रणित शेतकरी...
दुधना नदीला पूर, पिकांत पाणीच पाणीपरभणी : सेलू तालुक्यातील ब्रम्हवाकडी येथील निम्न...
उदगीरमधील ‘देवर्जन’ सात वर्षांनंतर भरलाउदगीर : देवर्जन (ता. उदगीर) येथील मध्यम...
बीड, लातूरमधील मंडळांत दमदार पाऊसऔरंगाबाद : औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद,...
गिरणा पट्ट्यात पूर ओसरताच वाळूचा उपसा...जळगाव : गिरणा परीसरातील शेतकऱ्यांना पूर,...
सेस रद्द करा, अन्यथा बंद पुकारूपुणे ः केंद्र सरकारच्या कृषी आणि पणन विषयक तीन...
जळगावात बाजार समित्या बरखास्तीचे राजकारणजळगाव ः जिल्ह्यात दोन्ही काँग्रेस, शिवसेनेची...
शेतकऱ्यांसाठी सुखावणारा कायदा ः...कोल्हापूर ः शेती उत्पन्न व्यापार आणि वाणिज्य...
बुलडाण्यात दहा हजार हेक्टरवर क्षेत्र...बुलडाणा ः जिल्ह्यात शनिवार (ता. १९) व रविवारी (ता...