agriculture news in marathi, some fodder camps closed, aurangabad, maharashtra | Agrowon

मराठवाड्यातील चार जिल्ह्यांत चारा छावण्यांची संख्या घटली
टीम अॅग्रोवन
रविवार, 16 जून 2019

औरंगाबाद  ः दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर मराठवाड्यातील चार जिल्ह्यांत सुरू करण्यात आलेल्या चारा छावण्यांमधील जनावरांची व छावण्यांच्या संख्येतील घट कायम आहे. गत चार दिवसांत चार जिल्ह्यांतील चारा छावण्यांची संख्या ५० ने कमी झाली असून छावण्यांमधील जनावरांची संख्या जवळपास ५१ हजारांनी घटली आहे. पावसाचा कालावधी जवळ येत असल्याने चारा छावण्यांमधील जनावरांची व पर्यायाने चारा छावण्यांची संख्या कमी होत असल्याचे सूत्रांनी सांगितले.

औरंगाबाद  ः दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर मराठवाड्यातील चार जिल्ह्यांत सुरू करण्यात आलेल्या चारा छावण्यांमधील जनावरांची व छावण्यांच्या संख्येतील घट कायम आहे. गत चार दिवसांत चार जिल्ह्यांतील चारा छावण्यांची संख्या ५० ने कमी झाली असून छावण्यांमधील जनावरांची संख्या जवळपास ५१ हजारांनी घटली आहे. पावसाचा कालावधी जवळ येत असल्याने चारा छावण्यांमधील जनावरांची व पर्यायाने चारा छावण्यांची संख्या कमी होत असल्याचे सूत्रांनी सांगितले.

प्राप्त माहितीनुसार, १० जूनपर्यंत औरंगाबाद, जालना, उस्मानाबाद व बीड या जिल्ह्यांत यंदा दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर ११४८ चारा छावण्यांना मंजुरी देण्यात आली होती. मात्र प्रत्यक्षात ७४५ चारा छावण्या सुरू होत्या. त्यामध्ये मोठी ४,६१,५९४ तर लहान ४२,१३० अशी एकूण ५,०३,७२४ जनावरे चारा व पाण्याच्या सोयीसाठी आश्रयाला होती. १४ जूनअखेर चारा छावण्यांची संख्या घटून ६९५ वर आली तर सुरू असलेल्या या छावण्यांमधील जनावरांची संख्या ४ लाख ५३ हजार २६३ वर आली. ही संख्या पाहता चारा छावण्यांची संख्या चार दिवसांत ५० ने कमी झाली. मराठवाड्यात छावणीतील जनावरांची संख्या ५१ हजार ४६१ ने कमी झाली. 

कमी झालेल्या छावण्यांच्या संख्येत औरंगाबाद जिल्ह्यातील ३, जालनामधील ३, उस्मानाबादमधील ३ तर बीड जिल्ह्यातील ४१ चारा छावण्यांचा समावेश आहे. छावणीतील कमी झालेल्या जनावरांमध्ये औरंगाबाद जिल्ह्यातील ५९७८, जालनामधील ३७७४, बीडमधील सर्वाधिक ४०१९५ तर उस्मानाबाद जिल्ह्यातील सर्वांत कमी १५१४ लहान-मोठ्या जनावरांचा समावेश आहे.  
 

जिल्हानिहाय छावण्यांमधील  जनावरांची प्रत्यक्ष संख्या 
औरंगाबाद    १५,७६३
जालना १५,६६७
बीड ३,४७,२३२
उस्मानाबाद  ७३,६०१ 

 

जिल्हानिहाय सुरू असलेल्या चारा छावण्या 
जिल्हा मंजूर छावण्या   प्रत्यक्षात सुरू
औरंगाबाद   ६३   २३
जालना  ४८  ३५
बीड  ९३३  ५५३
उस्मानाबाद   १०५ ८७

 

इतर ताज्या घडामोडी
राज्यात गवार प्रतिक्विंटल १२०० ते ६०००...जळगावात प्रतिक्विंटल ५६०० रुपये जळगाव ः कृषी...
पीकविम्याला मुदतवाढ देण्याची ‘...अकोला ः या हंगामात पीकविमा भरण्यासाठी २४ जुलै ही...
परडा येथे मक्यावर लष्करी अळीचा...अकोला ः या हंगामात लागवड झालेल्या मक्यावर मोताळा...
अमरावती जिल्ह्यात पीककर्जाचा टक्का...अमरावती  : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी...
अकोल्यात सोयाबीन सरासरी ३६१० रुपये...अकोला ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत बुधवारी (...
सातारा जिल्हा परिषदेचा १०० कोटींचा...सातारा : जिल्हा परिषदेच्या इतिहासात प्रथमच मूळ...
पुण्यात पीकविम्यासाठी शिवसेना रस्त्यावरपुणे ः ‘कोण म्हणतो देणार नाय विमा घेतल्याशिवाय...
पुणे विभागातील कोरडवाहू पट्ट्यात टंचाई...पुणे : विभागातील पुणे, सातारा, कोल्हापूर...
नांदेड जिल्ह्यात शेतकऱ्यांनी उतरविला १...नांदेड : पंतप्रधान पीकविमा योजनेंतर्गंत खरिपासाठी...
मराठवाड्यातील पाच जिल्ह्यांत १५ चारा...औरंगाबाद : मराठवाड्यातील घटलेली चारा छावण्यांची...
अचूक पीक पेरणी अहवाल देणे शक्य नाही ः...बुलडाणा  ः जिल्ह्यातील पीक पेरणीचा...
आडसाली ऊस लागवडीला कोल्हापूर जिल्ह्यात...कोल्हापूर  : जिल्ह्यात गेल्या पंधरवड्यात...
परभणी कृषी विद्यापीठ उत्पादित अडीच हजार...परभणी : वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या...
‘शेतकरी सन्मान’साठी ९१.३३ टक्के ...अकोला  ः पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी (पीएम...
एचटी कापूस बियाण्यांबाबतचा अहवाल १५...मुंबई  : प्रतिबंधित एचटी (हर्बीसाइड टॉलरंट)...
शिवसेना शेतकऱ्यांची दिशाभूल करतेय ः...मुंबई  ः पीकविम्यासंदर्भात विमा कंपन्यांवर...
पीकविम्याचे पैसे पंधरा दिवसांत न...मुंबई  : कर्जमाफी दिलेल्या शेतकऱ्यांची...
फळपीक विमा योजनेला मुदतवाढ देण्याची...पुणे  : राज्यातील दुष्काळी स्थिती आणि...
सोलापूर जिल्ह्यात `सन्मान`ची पाच लाख...सोलापूर : जिल्ह्यात ‘आठ अ’नुसार असलेल्या ११...
सोलापुरात यंदाही खरीप कोरडाचसोलापूर : खरीप हंगाम सुरू होऊन दीड महिना उलटला....