agriculture news in marathi Some improvement in the price of citrus in Kalmana | Page 2 ||| Agrowon

कळमण्यात मोसंबीच्या दरात काहीशी सुधारणा

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 17 ऑगस्ट 2021

नागपूर ः कळमणा बाजारात मोसंबीची आवक नियमित आहे. गेल्या आठवड्याच्या तुलनेत आवक काहीशी वाढली आहे. दरात देखील तेजी अनुभवली जात आहे.

नागपूर ः कळमणा बाजारात मोसंबीची आवक नियमित आहे. गेल्या आठवड्याच्या तुलनेत आवक काहीशी वाढली आहे. दरात देखील तेजी अनुभवली जात आहे. गेल्या आठवड्यात मोठ्या आकाराच्या फळांची आवक ५०० क्विंटल होती. या आठवड्यात ती हजार क्विंटलपर्यंत पोचली आहे. मोसंबीच्या दरात देखील सुधारणा झाली आहे. गेल्या आठवड्यात मोसंबीचे दर ३००० ते ३३०० रुपये होते. या आठवड्यात ते ३१०० ते ३४०० रुपयांवर पोचले आहेत. 

मोसंबीच्या दरात महिनाभरापासून चढ-उतार आहे. आवक देखील स्थिर आहे. जुलै महिन्यात ३३०० ते ३८०० रुपये दर होते. त्यानंतर ते ३००० ते ३५०० रुपयांपर्यंत खाली आले. आता पुन्हा दर ३१०० ते ३३०० रुपयांवर पोचले आहेत. लहान आकाराच्या फळांचे व्यवहार १००० ते १२०० रुपये आणि मध्यम आकारांच्या फळांना १७०० ते २३०० रुपये दर मिळत आहे. 

प्रक्रिया उद्योजकांची मागणी वाढल्याने सोयाबीन दरात तेजी आली होती.  ८५०० ते १०१५० रुपये दराने त्याचे व्यवहार झाले. बाजारात नव्या हंगामातील सोयाबीन येण्यास बराच कालावधी आहे. त्यामुळे दरातील तेजी कायम राहण्याचा अंदाज होता. मात्र केंद्र सरकारने सोयाबीन आयातीचा निर्णय घेतल्यानंतर दर घसरले. आता ७३०० ते ७६०० या दराने व्यवहार होत आहेत. बाजारात गव्हाची आवक ३०० क्‍विंटल आणि दर १७०० ते १९३८ होता. तांदूळ आवक १९ क्‍विंटलची आहे. दर २६०० ते ३००० रुपयांप्रमाणे आहेत. 

बाजारात हरभऱ्याची सरासरी आवक ५२४ क्‍विंटलची आहे. दर ४६०० ते ४८५० होते. भुईमूग शेंगाचे व्यवहार ४००० ते ४५०० रुपयांनी होत आहेत. आवक अवघी ५५ क्‍विंटल झाली. आंब्यांची आवक १००० क्‍विंटल, तर दर १९०० ते २२०० रुपये, बटाटा १००० ते १३०० रुपये आणि आवक २९२१ क्‍विंटलची राहिली. कांद्यांची आवक ११०० क्‍विंटल आणि दर १३०० ते १८०० रुपये होते. आल्याची आवक ८७४ क्‍विंटल, तर दर १४०० ते ३८०० रुपये क्‍विंटल राहिले.

टोमॅटोला १००० ते १२०० रुपये 

टोमॅटोची आवक २६० क्‍विंटल आणि दर १००० ते १२०० रुपये राहिले. भेंडीचे दर १५०० ते १८०० रुपये, आवक ५० क्‍विंटल राहिली. हिरव्या मिरचीचे दर २००० ते २२०० रुपये, आवक ३५० क्‍विंटल, ढोबळ्या मिरचीचे दर १५०० ते १६००, तर आवक १२० क्‍विंटल, कारल्याचे दर १२०० ते १५०० रुपये, आवक ४० क्‍विंटल, तर काकडीचे दर ७०० ते ८०० रुपये आणि आवक ७० क्‍विंटल झाली.


इतर बाजारभाव बातम्या
नगरमध्ये हिरवी मिरची, भेंडी, दोडक्याला...नगर : नगर येथील दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न...
पुण्यात पालेभाज्यांच्या दरात वाढ पुणे : खरीप हंगामानंतर भाजीपाल्याचे रब्बीचा हंगाम...
राज्यात सोयाबीन ३००० ते ६७०० रुपये...अकोल्यात प्रतिक्विंटलला ४५०० ते ५५०० रुपये...
बेदाण्याला उठाव असल्याने दर स्थिरसांगली ः सणांमुळे बेदाण्याला चांगली मागणी आहे....
दोन आठवडे अगोदरच खरीप कांदा बाजारातनाशिक : जिल्ह्यातील चांदवड,देवळा, मालेगाव, येवला...
सोलापुरात डाळिंबाला उठाव; दरात सुधारणासोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
नाशिकमध्ये वाटाण्याच्या आवेकसह दरातही...नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये ...
नगरमध्ये फ्लॉवर, दोडक्याच्या दरात तेजीनगर : ः नगर येथील दादा पाटील शेळके कृषी...
उडदाचा दर ६ हजार; सोयाबीन ८ हजाराच्या...लातूर : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गत...
राज्यात उडीद ३३०१ ते ७०१० रुपयेहिंगोलीत प्रतिक्विंटल ५५९५ रुपयांचा दर हिंगोली...
नाशिकमध्ये हिरव्या मिरचीच्या आवकेत घट...नाशिक : नाशिक बाजार समितीत गत सप्ताहात हिरव्या...
नगरमध्ये हिरवी मिरची, टोमॅटोची आवक...नगर  ः नगर येथील दादा पाटील शेळके कृषी...
सोलापुरात गवार, भेंडी, वांग्यांना...सोलापूर ः सोलापूर बाजार समितीच्या आवारात...
पुण्यात  दोडका, फ्लॉवर, मटार तेजीत पुणे : पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये रविवारी...
राज्यात टोमॅटो प्रतिक्विंटल ४०० ते १५५०...औरंगाबाद येथे सरासरी ४५० रुपये प्रतिक्विंटल...
खानदेशात केळी दरांवर दबावजळगाव : खानदेशात केळीची आवक गेल्या पाच-सहा...
राज्यात मूग ४००० ते ८५०० रुपये क्विंटललातुरात सरासरी ६५०० ते ६८२० रुपये  लातूर :...
औरंगाबादमध्ये बटाटे स्थिर, वांगी, मिरची...औरंगाबादमध्ये : भाजीपाल्याचे दर सगळीकडेच...
नाशिकमध्ये वाटाण्याची आवक, दर स्थिरनाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
नगरमध्ये उडदाला ५००० ते ६८०० रुपयेनगर ः नगर येथील दादा पाटील शेळके कृषी...