काेकणात काही ठिकाणी पावसाचा अंदाज

काेकणात काही ठिकाणी पावसाचा अंदाज
काेकणात काही ठिकाणी पावसाचा अंदाज

पुणे : राज्यात धो-धो कोसळणाऱ्या पावसाचा जोर बुधवारी (ता. २२) ओसरला. शनिवारपर्यंत (ता.२५) कोकणात काही ठिकाणी पावसाची शक्यता असून, उर्वरित मुख्यत: पावसाची उघडीप राहणार आहे. रविवारी (ता.२६) कोकणासह मध्य महाराष्ट्रात पुन्हा पावसाला सुरवात होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला अाहे.    राज्यात पावसाने उघडीप दिली असून, अनेक ठिकाणी ढगाळ हवामानासह हलक्या सरी येत होत्या. बुधवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये कोकण, घाटमाथा आणि मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी जोरदार पाऊस पडला. तर विदर्भ, मराठवाड्यात हलक्या पावसाने हजेरी लावली. ठाणे जिल्ह्यातील मुरबाड येथे सर्वाधिक २२२ मिलिमीटर पाऊस पडला; तर ठाण्यातील सरळगाव १०५ मिलिमीटर, साताऱ्यातील महाबळेश्‍वर येथे १३२ मिमी, तापोळा १६९ मिमी आणि लामज येथे १७३ मिलिमीटर पावसाची नोंद झाल्याचे कृषी विभागातर्फे सांगण्यात आले. 

 मध्य प्रदेशातील कमी दाबाचे क्षेत्र विरून गेले असून, मॉन्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टाचा पूर्व भाग उत्तरेकडे सरकला आहे. बंगालच्या उपसागरात शनिवारी (ता. २५) कमी दाब क्षेत्राची निर्मिती होण्याची शक्यता आहे. त्यामुळे रविवारपासून कोकणासह राज्यात पुन्हा पाऊस सक्रिय होण्याचा अंदाज आहे.   बुधवारी (ता. २२) सकाळी साडेआठ वाजेपर्यंतच्या २४ तासांमध्ये पडलेला पाऊस (मिलिमीटरमध्ये), स्राेत ः कृषी विभाग :  कोकण : टिटवाळा ७२, मुरबाड २२२, न्याहडी ९०, सरळगाव १०५, किन्हवळी ८८, उल्हासनगर ७६, पनवेल ७२, खालापूर चौक ९०, वौशी ७३, खोपोली ७०, मेंढा ७०, शिरगाव ९५, खेड ८५, अंबवली ८४, कुलवंडी ८३, भरणे ७३, दाभील ७२, फुणगुस ८२, फणसावणे ८२, अंगवली ७१, कोडगाव ९५, देवरुख ७०, तुलसानी ७१, माभले ७४, तेरहे ७१, विलवडे ८०, तलसरी ७६.  मध्य महाराष्ट्र : बोरगाव ६०, इगतपुरी ९०, घोटी ६०, धारगाव ७०, वेळुंजे ६७, मुठे ९९, भोलावडे ९५, काले १०२, लोणावळा ८६, राजूर ९४, बामणोली ६१, हेळवाक ६४, महाबळेश्‍वर १३२, तापोळा १६९, लामज १७३, करंजफेन ७२, आंबा १०५, राधानगरी ८४, कसबा ६६, साळवण ८८, गवसे ७२.  मराठवाडा : आनवा २८, जामखेड २२, ढवळवडगाव २२, मडळमोही २०, उमापूर ३०. विदर्भ : बावनबीर ३६, मलकापूर ४१, धरणगाव ३०, नांदूरा ३०, बार्शीटाकळी ३०, किन्हीराजा ३२, गिरोली ३५, धारणी ३०, सावळीखेडा ३४, सोमडोह ४१, खोलापूर ३६, धारगाव ३२, लाखंदूर ३०. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com