agriculture news in marathi, Some pumps are closed due to lack of demand | Agrowon

म्हैसाळ उपसाचे मागणीअभावी काही पंप बंद
टीम अॅग्रोवन
रविवार, 14 ऑक्टोबर 2018

सांगली ः म्हैसाळ उपसा सिंचन आठवडाभरापूर्वी पंप सुरू करण्यात आली. यामुळे दुष्काळी पट्ट्यातील शेतकऱ्यांना पाणी मिळत असल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानी वातावरण होते. मात्र, शेतकऱ्यांनी पाण्याची मागणी लेखी स्वरूपात पाटबंधारे विभागाकडे केलेली नाही. यामुळे उपसा करणारे पंप कमी करण्यात आले आहेत. पहिल्या टप्प्यातील काही पंप बंद करण्यात आले. अशीच स्थिती राहिली तर पुढील आठवड्यात योजना पूर्णतः बंद केली जाऊ शकते.

सांगली ः म्हैसाळ उपसा सिंचन आठवडाभरापूर्वी पंप सुरू करण्यात आली. यामुळे दुष्काळी पट्ट्यातील शेतकऱ्यांना पाणी मिळत असल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानी वातावरण होते. मात्र, शेतकऱ्यांनी पाण्याची मागणी लेखी स्वरूपात पाटबंधारे विभागाकडे केलेली नाही. यामुळे उपसा करणारे पंप कमी करण्यात आले आहेत. पहिल्या टप्प्यातील काही पंप बंद करण्यात आले. अशीच स्थिती राहिली तर पुढील आठवड्यात योजना पूर्णतः बंद केली जाऊ शकते.

जिल्ह्यात अपेक्षित पाऊस झाला नाही. यामुळे योजना सुरू करण्यासाठी शेतकरी आणि लोकप्रतिनिधींनी आग्रह धरला. यामुळे ताकारी, टेंभू आणि म्हैसाळ उपसा सिंचन योजना सुरू झाल्या. सध्या टेंभू आणि ताकारी योजना पूर्ण क्षमतेने सुरू आहेत. म्हैसाळ उपसा सिंचन योजना केल्या आठवड्यात सुरू झाली. या योजनेचे पाणी कवठेमहांकाळ तालुक्‍यांत गेल्या दोन दिवसांपूर्वी दाखल झाले आहे. मात्र, या योजनेचे पाणी मिळावे यासाठी शेतकऱ्यांनी पाटबंधारे विभागाकडे लेखी स्वरुपात मागणी केली नसल्याचे पाटबंधारे विभागाच्या सूत्रांनी सांगितले आहे.

शासनाच्या नवीन नियमानुसार शेतकऱ्यांना १९ टक्के पैसे भरायचे आहेत. परंतु असे असतानाही, शेतकरी पुढे येत नाहीत, अशी चर्चा पाटबंधारे विभागात सुरू आहे. विस्तारित गव्हाण योजनेचे क्षेत्र वगळता अन्य भागातून चार दिवसांत पैसे गोळा झाले नाहीत. पैसे न भरता फक्त अर्ज आले आहेत. जत, कवठेमहांकाळ, तासगाव आणि मिरज या चारही तालुक्‍यांत अशीच अवस्था आहे. म्हैसाळ उपसा सिंचन योजनेची पुरेशी पाणीपट्टी न झाल्याने पंपांची संख्या ३० वरून पाच किंवा दहावर आणण्याचा निर्णय खात्याने घेतला आहे. त्यानंतरही मागणी आली नाही तर नाईलाजाने आवर्तन बंद करावे लागेल असेही अधिकाऱ्यांनी सांगितले.  

पाच पंपांचा खर्च चार लाख
पाच पंपांनी एक दिवस उपसा केला तर चार लाख रुपये खर्च होतो, पण वसुली अवघी लाखभर रुपये होते. शेतकऱ्यांना फक्त सात रुपयांत तब्बल दहा हजार लिटर पाणी मिळते, तरीही प्रतिसाद नाही.
पंपांची आजची स्थिती
पहिला टप्पा ३, दुसरा ४, तिसरा २, चौथा २ व पाचवा ४

योजना बंद करण्याचा घाट
शेतकऱ्यांना पाण्याची गरज नाही का अशी शंका या निमित्ताने निर्माण झाली आहे. गव्हाण वगळता कोठेही कालपर्यंत अपेक्षित पैसे गोळा झालेले नाहीत. मिरज तालुक्‍यातील अनेक भागात अधिकाऱ्यांनी बैठका घेतल्या, त्यात मागणीचे अर्ज आले, मात्र शेतकऱ्यांनी पैसे भरले नाहीत. याचाच अर्थ असा की, पाणीपट्टी वसूल होत नसल्याने ही योजना बंद करण्याचा घाट पाटबंधारे विभागाने घातला असल्याचे दिसते आहे.

इतर बातम्या
अकोल्यात कृषी सहायकांचे पदोन्नतीच्या...अकोला  ः अमरावती विभागातील कृषी सहायकांच्या...
पुणे विभागात पाच लाख हेक्टरला पीकविमा...पुणे : नैसर्गिक आपत्ती, किडी आणि रोगांमुळे...
सांगलीच्या पूर्व भागातील अग्रणी कोरडीठाकसांगली  ः  सांगली जिल्ह्याच्या चार...
सातारा जिल्ह्यातील ‘मराठवाडी’च्या...ढेबेवाडी, जि. सातारा : गेल्या काही...
नगर जिल्ह्यात चार महसूल मंडळांत पावसाची...नगर : जिल्ह्यामध्ये गेल्या आठ दिवसांपासून पावसाने...
केडीसीसी बँकेकडून पूरग्रस्तांसाठी एक...कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी...
हलक्या सरींना सुकलेल्या पिकांना...उस्मानाबाद/ लातूर  : मराठवाड्यातील औरंगाबाद...
नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत...नांदेड : नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील काही...
सरकारच्या फसव्या आश्वासनांना बळी पडू...जिंतूर, जि. परभणी: शेतकऱ्यांना पीक कर्ज दिले जात...
‘पोकरा’तील शेतकऱ्यांनाही मिळणार सूक्ष्म...अकोला  ः राज्यात दुष्काळाच्या झळा सहन...
राज ठाकरे यांची दिवसभर चौकशीमुंबई ः कोहिनूर मिल कर्ज प्रकरणातील अनियमिततेबाबत...
मागासवर्गीय शेतकऱ्यांना विहिरींसाठी ३७४...पुणे  : राज्यातील मागास गटातील शेतकऱ्यांना...
बचत गटांची उत्पादने आता ‘ॲमेझॉन’वरमुंबई  : महाराष्ट्र आर्थिक विकास महामंडळ...
वनस्पतीतील विषारी अंशाने दगावली ४२...नगर : पावसाळ्यात शेती बांध, मोकळ्या रानात...
अजित पवार, मुश्रीफांसह ५० जणांवर गुन्हे...मुंबई  : महाराष्ट्र राज्य सहकारी बँक...
अतिवृष्टी, पुराचा चार लाख हेक्टरवरील...पुणे  : राज्यात अतिवृष्टी व पुरामुळे...
अतिवृष्टीमुळे सुपारी पीक धोक्यातसिंधुदुर्ग ः जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे आता...
मराठवाडा, विदर्भात तुरळक ठिकाणी हलक्या...पुणे ः विदर्भात चक्राकार वाऱ्याची स्थिती असल्याने...
`चांद्रयान २' चंद्राच्या कक्षेत दाखलनवी दिल्ली ः भारताची महत्त्वाकांक्षी...
अकोल्यातील प्रकल्पात अत्यल्पच साठाअकोला : यंदाच्या पावसाळ्याचे सुमारे अडीच महिने...