‘सोनहिरा’ राज्यात सर्वाधिक ऊसदर देणारा कारखाना ः डॉ. कदम

सर्वाधिक दर देणारा डॉ. पतंगराव कदम सोनहिरा कारखाना हा राज्यातील कारखाना ठरला आहे, असा दावा कृषी व सहकार राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम यांनी काढले.
Sonhira is the highest paid rate sugarcane factory in the state: Dr. Kadam
Sonhira is the highest paid rate sugarcane factory in the state: Dr. Kadam

कडेगाव, जि. सांगली : डॉ. पतंगराव कदम सोनहिरा साखर कारखान्याने चालू हंगामात एकरकमी एफआरपी ३ हजार १७६ रुपये या प्रमाणे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केली आहे. त्यामुळे उसाला सर्वाधिक दर देणारा डॉ. पतंगराव कदम सोनहिरा कारखाना हा राज्यातील कारखाना ठरला आहे, असा दावा कृषी व सहकार राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम यांनी काढले.

डॉ. पतंगराव कदम सोनहिरा सहकारी साखर कारखान्याची २७ वी वार्षिक सर्वसाधारण सभा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ऑनलाइन पद्धतीने पार पडली. या वेळी डॉ. विश्वजित कदम बोलत होते. कारखान्याचे अध्यक्ष आमदार मोहनराव कदम, संचालक रघुनाथ कदम, उपाध्यक्ष पोपटराव महिंद, दीपक भोसले, कार्यकारी संचालक शरद कदम आदी उपस्थित होते.

कदम म्हणाले, ‘‘कारखान्याने प्रतिकूल परिस्थितीतून मार्ग काढत देशात नावलौकीक मिळविला आहे. कारखान्याने राष्ट्रीय व राज्यातील अनेक पुरस्कार प्राप्त केले असून, हा देशातला सर्वोत्कृष्ट कारखाना ठरला आहे. यामध्ये सर्व सभासद, बिगर सभासद, ऊस पुरवठादार शेतकरी, अधिकारी, कर्मचारी, पुरवठादार, ऊस तोडणी मजूर, कंत्राटदार यांचा मोलाचा वाटा आहे. सोनहिरा हा देशांतील सर्वोत्कृष्ट कारखाना व्हावा, असे स्वप्न डॉ. पतंगराव कदम यांनी पाहिले होते. ते आता पूर्ण झाले आहे.’’

प्रयोगशील शेतकऱ्यांचा सन्मान गळीत हंगाम २०१९-२० मध्ये आडसाली, पूर्व हंगामी व खोडवा प्रकार यामध्ये उच्चांकी उत्पन्न काढणाऱ्या शेतकऱ्यांना डॉ. पतंगराव कदम ऊस भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यामध्ये आडसाली हंगामासाठी प्रथम क्रमांक पार्वती परशुराम गोरे (रा. कडेगाव), द्वितीय क्रमांक प्रकाश शंकराव कदम (रा. खेराडे वांगी), तृतीय क्रमांक दत्तात्रय शंकर ननवरे (रा. येवलेवाडी), तर खोडवा हंगामासाठी प्रथम क्रमांक नितीन शामराव सूर्यवंशी (रा. वांगी), द्वितीय जनार्दन सोना यादव (रा. उपाळे वांगी) या शेतकऱ्यांना रोख रक्कम व सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com