सोनहिराला देशातील सर्वोत्कृष्ट साखर कारखाना

सोनहिराला देशातील सर्वोत्कृष्ट साखर कारखाना
सोनहिराला देशातील सर्वोत्कृष्ट साखर कारखाना

कडेगाव, जि. सांगली : सोनहिरा साखर कारखान्याला नवी दिल्ली येथील राष्ट्रीय साखर कारखाना संघाचा २०१७-१८ चा  देशांतील सर्वोत्कृष्ट साखर कारखाना हा पुरस्कार जाहीर झाला आहे.

कडेगावसारख्या कायम दुष्काळी तालुक्याच्या कृषी व औद्योगिक प्रगतीसाठी व शेतकऱ्यांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी डॉ. पतंगराव कदम यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत सोनहिरा साखर कारखान्याची उभारणी केली. आमदार मोहनराव कदम यांच्या मार्गदर्शनानाखाली सुरवातीपासून कारखान्याने काटकसरीने नियोजन केले.

या जोरावरच कारखान्याने प्रगतीचे अनेक टप्पे पूर्ण केले. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत ही कारखान्याने शेतकऱ्यांना उसाला चांगला दर दिला. सर्वोत्तम नियोजनामुळे कारखान्याला सन २०१७-१८ मधील देशातील सर्वोत्कृष्ट साखर कारखाना हा पुरस्कार जाहीर झाला असून या राष्ट्रीय पुरस्काराने कारखान्याचा आता देश पातळीवर लौकिक निर्माण झाला आहे.

कारखान्याचे अध्यक्ष आमदार मोहनराव कदम म्हणाले, ‘‘सहकारी साखर कारखानदारीत सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या साखर कारखान्यांना राष्ट्रीय साखर कारखाना संघ लि.नवी दिल्ली यांच्या मार्फत प्रतिवर्षी पुरस्कार दिले जातात. तर या वर्षीचा २०१७-१८ मधील देशातील सर्वोत्कृष्ट साखर कारखाना पुरस्कार सोनहिराला जाहीर झाला.

पुरस्काराचे वितरण २० सप्टेंबर रोजी दिल्ली येथे होणार आहे. तर यापूर्वी सोनहिराला वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट यांच्याकडील राष्ट्रीय पातळीवरील उत्कृष्ट तांत्रिक कार्यक्षमता दक्षिण विभाग पुरस्कार, महाराष्ट्र शासनाचा राज्यस्तरीय ऊर्जा संवर्धन व व्यवस्थापन पुरस्कार आदी पुरस्कार प्राप्त झाले आहेत. त्यासाठी सभासद, अधिकारी, कर्मचाऱ्यांचे मोलाचे योगदान लाभलेल्याचे कदम यांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com