सफेद चिप्पी कांदळवन वृक्ष घोषित

सफेद चिप्पी (sonneratia alba) या कांदळवन वृक्षाला महाराष्ट्राचा कांदळवन वृक्ष म्हणून घोषित करण्याचा निर्णय शुक्रवारी (ता.७) राज्य वन्यजीव मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.
सफेद चिप्पी कांदळवन वृक्ष घोषित
सफेद चिप्पी कांदळवन वृक्ष घोषित

मुंबई: सफेद चिप्पी (sonneratia alba) या कांदळवन वृक्षाला महाराष्ट्राचा कांदळवन वृक्ष म्हणून घोषित करण्याचा निर्णय शुक्रवारी (ता.७) राज्य वन्यजीव मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. कांदळवन वृक्ष घोषित करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी राज्य वन्यजीव मंडळाची १५ वी बैठक पार पडली. या बैठकीत मेरिटाईम झोन्स ॲक्ट अंतर्गत आंग्रीया पठाराला नियुक्त क्षेत्र म्हणून अधिसूचित करण्यासंदर्भात केंद्र सरकारकडे शिफारस करण्यास मान्यता देण्यात आली.  याशिवाय महाराष्ट्र राज्यातील भारतीय जलक्षेत्रातील अरबी समुद्रीय ''हम्पबॅक व्हेल''  च्या पुनरुज्जीवन  प्रकल्पातील संशोधन कार्यक्रमासह राखीव वन क्षेत्रात करावयाच्या विविध कामांची शिफारस करून ती केंद्राकडे मान्यतेसाठी पाठवण्याचे निश्चित करण्यात आले. तसेच चंद्रपूर जिल्ह्यातील वाघांच्या स्थलांतरणाच्या विषयावर अभ्यास गट स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला. राज्य सरकारसाठी विकास म्हणजे केवळ बांधकामे नसून वन, वन्यजीव आणि जंगल संवर्धनासाठी हे सरकार कटिबद्ध आहे.त्यामुळे राज्य वन्यजीव मंडळाच्या यापुढील बैठकीत सादर होणाऱ्या प्रस्तावासाठी यापुढे ड्रोन सर्व्हे बंधनकारक राहील. ज्या विभागाचा प्रस्ताव असेल त्या विभागाने त्या प्रकल्पाचे छायाचित्र सादर करणे, प्रकल्पाची वस्तुस्थितीजन्य माहिती देणे आणि त्याचा पर्यावरणीय परिणाम विशद करणे आवश्यक राहील, असे ठाकरे यांनी बैठकीत स्पष्ट केले. दूरदृष्य प्रणालीद्वारे झालेल्या या बैठकीला वनमंत्री संजय राठोड, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, आमदार धीरज देशमुख यांच्यासह राज्य वन्यजीव मंडळाचे सदस्य, वन विभागाचे अधिकारी आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

जंगल वाढणे आवश्यक राज्याचे जंगल वाढणे आवश्यक आहे. मुंबईतील फ्लेमिंगो ठाणे क्रिक अभयारण्याचे क्षेत्रही आपल्याला वाढवायचे आहे. कासवांचे जिथे जिथे संरक्षण करता येईल तिथे कासव संवर्धन प्रकल्प राबविण्यास मंजुरी देण्यात यावी, अशी सूचना ठाकरे यांनी केली. राज्यात वन विभागाच्या ११ सर्कलमध्ये जिथे वन्यजीव उपचार केंद्रे आहेत ते सोडून अन्यत्र असे संक्रमण उपचार केंद्र तातडीने सुरु करावीत, असे मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com